या डोळ्यांची दोन पाखरे,Ya Dolyanchi Don Pakhare

या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण, घरकुल तुमची छाती

सावलीतही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती

No comments:

Post a Comment