रजनीगंधा जीवनी या,Rajani Gandha Jeevani Ya

रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला, तिच्या पाऊली

फुलल्या मनाच्या मुक्या पाकळ्या
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली, प्रीती ल्याली, नवी ही कळी

रजनी अशी ही निळीसावळी
किरणांत न्हाली धरा मल्मली
अशा वेळी, प्रिया येई, फुले लाजलीNo comments:

Post a Comment