मी ही अशी भोळी कशी ग,Mi Hi Ashi Bholi Kashi Ga

मीही अशी भोळी कशी ग ?
भोळी खुळी !
मी लाजले
जे मना वाटले
ते राहिले माझ्याचपाशी !

मी जाणिले ना मनी काय आले ?
एका कळीचे कसे फूल झाले ?
अंग अंग माझे नवे रूप ल्याले
डोळ्यांमध्ये चांदणे धुंद ओले
आले कुठे मी स्वप्नदेशी ?

ओठांत आले मुके गूज बाई
मला बावरीला सुचेनाच काही
भरे कंप देही, झुके पापणीही
शब्दांविना अंतरी सूर गाई
ते गुंजते आता स्वतःशी

No comments:

Post a Comment