मी गुणगुणते अबोध काही बोल
डोलतो उरी हिंदोल !
कळी कळी उमलुनी आली
तारका उतरल्या खाली
हिरवाळ दंवाने न्हाली
करि घमघमता पारिजातही डोल
डोलतो उरी हिंदोल !
ओठांचा उघडे पडदा
ये अस्फुट दिडदा दिडदा
विस्तार स्वरांचा उमदा
या गीताचा अर्थ मनाहुन खोल
डोलतो उरी हिंदोल !
हे मनोगताचे गीत
शब्दांच्या पार अतीत
जाणते एक या प्रीत
ही प्रीति दे यास लाजरा ताल
डोलतो उरी हिंदोल !
डोलतो उरी हिंदोल !
कळी कळी उमलुनी आली
तारका उतरल्या खाली
हिरवाळ दंवाने न्हाली
करि घमघमता पारिजातही डोल
डोलतो उरी हिंदोल !
ओठांचा उघडे पडदा
ये अस्फुट दिडदा दिडदा
विस्तार स्वरांचा उमदा
या गीताचा अर्थ मनाहुन खोल
डोलतो उरी हिंदोल !
हे मनोगताचे गीत
शब्दांच्या पार अतीत
जाणते एक या प्रीत
ही प्रीति दे यास लाजरा ताल
डोलतो उरी हिंदोल !
No comments:
Post a Comment