मनाला झाली कृष्णसख्याची,Manala Jhali Krishna

छुमछुम पायी वाजे घुंगुर, गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक्‌धिन भिनला अंगी, गोपी भिजल्या हरिच्या रंगी
वेडी झाली राधा;
मनाला झाली कृष्णसख्याची बाधा !

यमुनेच्या त्या तीरावरती गोपी अशा जलक्रिडा करिती
अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा
मनाला झाली कृष्णसख्याची बाधा !No comments:

Post a Comment