माय भवानी तुझे लेकरु,Maay Bhavani Tujhe Lekaru

माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई

तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई

तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई

तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही4 comments:

  1. सुंदर... गाणं डाऊनलोड कसं करू होत नाहीये.. प्लीज सांगा. 👍

    ReplyDelete