बैल तुझे हरणावाणी,Bail Tujhe Haranavani

बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा
तरूण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा

वाट नागमोडी वेडी, तुझी फुलोऱ्याची जोडी
ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा

समोरून येतो वारा, शिनभाग जातो सारा
दिठीपुढे येतो जातो गाव तो दहादा

गाव साजनीचा दूर, शहारून येता उर
सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा

परत साद देण्यासाठी, शीळ येऊ पाहे ओठी
पलीकडे खेड्यामाजी, वसे एक राधा

स्वप्न भारल्या एकांति, तिचा हात यावा हाती
जनी भेटवी रे मित्रा, राधिका मुकुंदाNo comments:

Post a Comment