पाऊस आला, वारा आला
पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे
भर भर गारा वेचू !
गरगर गिरकी घेते झाड
धडधड वाजे दार कवाड
अंगणातही बघता बघता
पाणी लागे साचू !
अंगे झाली ओलीचिंब
झुलू लागला दारी लिंब
ओली नक्षी, पाऊसपक्षी
कुणी पाहतो वाचू !
ओसरुनी सर गेली रे
उन्हे ढगांतुन आली रे
इंद्रधनुष्यामध्ये झळकती
हिरे माणके पाचू !
No comments:
Post a Comment