पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
दयेचा सागर मायेचे आगर
आनंदाचे घर पांडुरंग
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा
श्रद्धेचा विसावा पांडुरंग
तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन
प्रकाश वर्धन पांडुरंग
अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग
देहीचा साष्टांग पांडुरंग
No comments:
Post a Comment