नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू
नंदराणी तुला गातसे हल्लरू
विहगगण झोपला झोपि गेले तरू
वात हळुवारसा लागला वावरू
झोपली गाऊली झोपले वासरू
नीज वो श्रीधरे नीज वो सावळे
माझिया मांडिये स्वर्गसुख पेंगुळे
शांतरस त्यावरी घालिते पांघरू
आणखी जपतपा काय मी आचरू
ब्रम्ह ते माझिया पोटिचे लेकरू
आस मी कोणती आज चित्त्ती धरू
No comments:
Post a Comment