नच सुंदरि करूं कोपा ।
मजवरि धरिं अनुकंपा ।
रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥
नारी मज बहु असती ।
परि प्रीती तुजवरती ।
जाणसि हें तूं चित्तीं ।
मग कां ही अशि रीती ।
करिं मी कोठें वसती ।
तरि तव मूर्ती दिसती ।
प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥
करपाशीं या तनुला ।
बांधुनि करि शिक्षेला ।
धरुनीयां केशांला ।
दंतव्रण करि गाला ।
कुचभल्ली वक्षाला ।
टोंचुनि दुखवीं मजला ।
हचि दंड योग्य असे सखये मत्पापा ॥
No comments:
Post a Comment