बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे, भेट घडे.
दुःख न उरले सरली भीती
अंगांगांतुन भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे, चहूकडे.
गीत फुले कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे, उंच कडे.
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे, गगन बुडे.
No comments:
Post a Comment