बा रे पांडुरंगा केव्हा,Ba Re Panduranga Kevha

बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी ।
झालो मी परदेशी तुजविण ॥१॥

ओवाळावी काया चरणावरोनि ।

केव्हा चक्रपाणी भेटशील ॥२॥

तुका म्हणे माझी पुरवावी आवडी ।
वेगें घाली उडी नारायणा ॥२॥

1 comment:

  1. श्रीपादराव नेवरेकर यानी गायलेला हा अभंग सापडत नाही. कृपया समावेश करावा.

    ReplyDelete