आसवे डोळ्यात माझ्या, बोल हे येती मुखी
दु:ख हे माझे मला, हो सुखी, तू हो सुखी !
सूर सनई गुंफिते, फुलतात आशा अंतरी
सोनियाच्या पावलांनी येतसे लक्ष्मी घरी
धाडिते शुभकामना मी, ही जरी वाणी मुकी
मी मनाने पाहते तो मंगलाचा सोहळा
अक्षता त्या, मंत्र ते, वरमाळ ती पडते गळा
मी जरीही जाहले भाग्यास ऐशा पारखी
पावलांची सात तुजला साथ कोणी देतसे
लाजुनीया हातही हातात कोणी देतसे
त्या कुणाला यापुढे मी मागते सौभाग्य की
होम पेटे, त्यात माझा स्वार्थ सारा जाळिते
पाच प्राणांची तुला मी आरती ओवाळते
मी मनाने रंगले त्या मंगलाच्या कौतुकी
No comments:
Post a Comment