दिंडी चालली चालली,Dindi Chalali Chalali

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला


गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला

No comments:

Post a Comment