धन्य ती पंढरी धन्य भीमातीर,Dhanya Ti Pandhari Dhanya

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर ।
आणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥

धन्य तो हि लोक अवघा दैवांचा ।

सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥२॥

धन्य ते ही भूमी धन्य तरुवर ।
धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥३॥


धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान ।
आनंदे भवन गर्जतसे ॥३॥

धन्य पशु पक्षी कीटक पाषाण ।

अवघा नारायण अवतरला ॥४॥

तुका म्हणे धन्य संसारातें आलीं ।
हरिरंगी रंगली सर्वभावें ॥५॥

No comments:

Post a Comment