देवा बोला हो माझ्याशी,Deva Bola Ho Majhyashi

देवा बोला हो माझ्याशी
तुम्हीच मजवर रुसल्यावरती
बोलू मी कोणाशी ?

देह वाहिला तुमच्या पायी

जिवाशिवाची आशा नाही
कानी पडतिल बोल प्रभूचे
आशा हीच उराशी

तुम्हीच मजला बोल शिकविले

आज मौन का तुम्ही घेतले
बोल शिकवुनी माय अबोला
धरिते काय पिलाशी ?

बोलायाचे नसेल जर का

बोलु नका, पण इतुके ऐका
कमलाक्षातुन कटाक्ष फेका,
मजवरती अविनाशी

No comments:

Post a Comment