देव माझा निळा निळा,Dev Majha Nila Nila

देव माझा निळा निळा, डोळे माझे निळे
माझा समुद्रही निळा, आभाळही निळे

श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या
तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे

अश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्या
नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे

फूलवेड्या वसंताची चाहूल लागली
निळ्यानिळ्या फुलांवरी पाखरू ये निळे


कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी ?
श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे

No comments:

Post a Comment