तुझे रूप राणी, कुणासारखे ग ?
तुझे रूप राणी, तुझ्यासारखे ग !
तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा
बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तिला कोण रोधू शके ?
तुझे दोन डोळे शराबी शराबी
हसे लाज गाली गुलाबी गुलाबी
असे रूपलावण्य मी प्राशितो हे
मला लाभले ते तुला पारखे !
उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकीता रिते बाण-भाते
विधाता करी काय हेवा तुझा गे
न्याहळून पाही तुला कौतुके !
No comments:
Post a Comment