घेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा ?
का लाजले अशी मी, माझे मला कळेना
माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे
या कमललोचनांनी कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभुचे का ठाउके न कोणा ?
स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले
या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले,
शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा ?
मज रूप लक्षुमीचे तू नाथ शेषशायी
माझी अनन्य प्रीति झाली विलीन पायी
माझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा
No comments:
Post a Comment