घन बरसत बरसत आले,Ghan Barasat Barasat Aale

घन बरसत बरसत आले

वनि मोराचा षड्ज लागला
झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले

शिवधनुष्य कडकडले वरती
सुखावली आशेने धरती
खग तोरण धरित उडाले

सजल धुंद आनंद चहुकडे
नभ रत्नांचे तृणांत उघडे
वन निथळत अमृत न्हाले

No comments:

Post a Comment