कुहु कुहु मन बोले,Kuhu Kuhu Man Bole

कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे
निळे निळे घन ओले कुठे कसे वळले
उधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे
नशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले

नवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?

जिथे जिथे नेशील तू, तिथे तिथे येईन मी
ऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी

जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?

नको जाऊ तू दूर मनी उठे काहूर
सावली ही स्पर्षाची सोबतीस हे सूर
इतके सुंदर स्वप्न हवेसे, हवी हीच रात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात ?



1 comment: