कोण दुजा आधार,Kon Duja Aadhar

कोण दुजा आधार ?
तुजविण, कोण दुजा आधार ?

अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन, व्याकुळले मी फार

वादळवारा झोंबत अंगा, झिंगुनि हा अनिवार
पदराखाली इवली दिवली, थरथरते हळुवार

कशि सावरू ? कुठे निवारा ? घालु कुणावर भार ?
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार

No comments:

Post a Comment