खेळ कुणाला दैवाचा कळला,Khel Kunala Daivacha Kalala

खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !

जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनीचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

हार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

सौभाग्याला मिळे सहारा

मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला ?

मी असो, तू असो, हा असो, कुणी असो

दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला ?



No comments:

Post a Comment