काजवा उगा दावितो दिवा,Kajava Uga Davito Diva

अंधारच मज हवा, काजवा उगा दावितो दिवा

काळे पातळ, काळी चोळी, भुवयांमध्ये रेखा काळी
काळा शेला पांघरले मी पाणकळ्याची हवा

शपथ तुम्हाला नकाच जागू, नकाच वार्ता कोणा सांगू
गावामध्ये पिकल भलती उजाडता बोलवा

नको काजव्या संगे येऊ, नको कमळणी रोखुन पाहू
अरे पारव्या प्रीतभेटिचा प्रकार तुज का नवा

दूर नदीच्या पल्याड माझा, उभा राहिला असेल राजा
अशा चोरट्या भेटीमधला अवीट हो गोडवा


या पायांच्या दाही बोटा, अंधारातहि दिसती वाटा
या मेघांनो आभाळातील काळेपण वाढवा

No comments:

Post a Comment