ऐकशील माझे का रे अर्थहीन गीत ?
दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत !
वाट तुझी बघता का रे पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनि जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत !
भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्ष तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलताच सुकले तरिही आयु हे पुनित !
सूर आर्त गीताचा या तुझ्या कधी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात !
No comments:
Post a Comment