आई आणखी बाबा यातुन, Aai Anakhi Baba Yatun

सांग मला रे सांग मला

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी

तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !


आई आवडे अधिक मला !गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई

शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !

आवडती रे वडिल मला !घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही

चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !

आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही

मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !

आई आवडे अधिक मला !निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी

मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !

आवडती रे वडिल मला !आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते

तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !


आई आवडे अधिक मला !त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती

कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !

आवडती रे वडिल मला !बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी

रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !

आई आवडे अधिक मला !
बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !

बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !

आवडती रे वडिल मला !धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा

म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !

आवडती रे वडिल मला !

No comments:

Post a Comment