बिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून
तुझ्या गालाचि खुलली लाली ग
जणु डाळिंब फुटतंय गाली
लइ घुटमळतंय् माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून
आलं ऊन ग भवती फुलुनी
कुठं जाशी तु ग फुलराणी ?
काटं ग बोचतिल बाई
नाजुक तुझ्या पायी
तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून !
रानी वा-याची ऐकून गाणी
नाचे झ-याचं झुळुझुळु पाणी
लइ घुटमळतंय् माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून
गीत | - | श्रीनिवास खारकर |
संगीत | - | गोविंद कुरवाळीकर |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
No comments:
Post a Comment