आला आला वारा, संगे पावसाच्या धारा

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई, लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं, जपलं
काळजाचं पानी किती शिपलं, शिपलं

चेतवून प्राण यांना, दिला गं उबारा"




L - Sudheer Moghe
S - Asha Bhosle - Anuradha Paudwal
M - Hridayanath Mangeshkar
Ha Khel Savlyancha

L - सुधीर मोघे
S - आशा - अनुराधा पौडवाल
M - पं. हृदयनाथ मंगेशकर
हा खेळ सावल्यांचा


 

1 comment: