आताच अमृताची बरसून रात गेली

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली

No comments:

Post a Comment