अखेरचा हा तुला दंडवत - मराठा तितुका मेळवावा


अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव
गीत - योगेश
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - मराठा तितुका मेळवावा (१९६४)

No comments:

Post a Comment