Showing posts with label S - चंद्रशेखर गाडगीळ. Show all posts
Showing posts with label S - चंद्रशेखर गाडगीळ. Show all posts

अन्‌ हल्लगीच्या तालावर ढोल An Hallagichya Talavar

अवं लढाईवरनं आला ....... आला
माझ्या अर्जुनाचा गाडा ....... गाडा
त्याला बगायाला जमं ....... जमं
सारा धनगर वाडा ....... सारा धनगर ....... वाडा

अवं थांबा जरा, मागं सरा
रिंगण धरा अन्‌ बोला माझ्या भावांनो
'बिरोबाच्या नावानं चांगभलं'

अन्‌ हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं सोंड फिरं गरारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ प्वाट वाजं नगारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अवं लाडं लाडं मारतो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसा आबाळात फव्वारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ ढग्गाच्या या रूपानं ह्यो पानी पाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं ठुम्मक ठुम्मक बशितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ नादामंधी उठितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
आरं खेळाची ही नशा रं ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसं दोनी डोळं मिटितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ इंदराचा ऐरावत येला लाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा


L - जगदीश खेबूडकर
M - राम कदम
S - चंद्रशेखर गाडगीळ

अजून आठवे ती रात Ajun Aathave Ti Raat

अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंद आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी


L - मधुसूदन कालेलकर,
M - राम कदम,
S - चंद्रशेखर गाडगीळ,
पारध (१९७७)