जाऊ देवाचिया गावा,Jau Devachiya Gava

जाऊं देवाचिया गांवां ।
देव देईन विसांवा ॥१॥

देवा सांगों सुख दुःख ।
देव निवारील भूक ॥२॥


घालूं देवासी च भार ।
देव सुखाचा सागर ॥३॥

राहों जवळी देवापाशीं
आतां जडोनि पायांसी ॥४॥

तुका म्हणे आम्ही बाळें
या देवाचीं लडिवाळें ॥५॥

No comments:

Post a Comment