Showing posts with label S-आशा खाडिलकर. Show all posts
Showing posts with label S-आशा खाडिलकर. Show all posts

साम्य तिळहि नच दिसत,Samya Tilahi Nach Disat

साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ।
नाव तरी कोरवा शिरावर ।
ओळखु येइल चित्र कुणाचें ॥

मजजवळि असे याहुनि सुंदर ।
प्रीतिचितारिणी करिचें ।
प्रतिबिंब सुबक या मूर्तींचें ॥

लेऊ कशी वल्कला,Leu Kashi Valkala

लेऊ कशी वल्कला
ते जुळे न बाई मला

नीट निरीची गाठ न जुळते
निरीवरती निरी न मिळते
कटीवरुनी सरते ओघळते असोवरी मेखला

हवी कशाला मणी-भूषणे
जवळी असता अहेव लेणे
डागतील मज सये दागिने माळीन चंपक फुला

मी अधना न शिवे भीती,Mi Adhana Na Shive Bhiti

मी अधना, न शिवे भीती मना;
योग्या धना चौर्यचिंतना ॥

रवि हिमकरही भययुत ग्रहणी,
भय नच ते दीपमना,
समयी त्या दीपमना ॥

मजवरी तयांचें प्रेम,Majvari Tayanche Prem

मजवरी तयांचें प्रेम खरें ।
जें पहिलें जडलें तें उरे ॥

कसास लावुनि अंत पाहिला ।
परि न जराही ओसरे ॥

संशय-पटला दूर सारितां ।
प्रकाशेल कीं मग पुरें ॥

नाहि दयिता मी,Nahi Dayita Mi

नाहि दयिता मी ।
नच कुणा पतिची कांता विधियुता ॥

तुटलि सकल माया ।
हटली विकल काया ।
दिगंता वरिन मी आतां ॥

दारुणा स्थिती,Daruna Sthiti

दारुणा स्थिती । ती जाचि तयांप्रती ॥

प्रियजनपक्षा स्वीकारावे । न तरी मुख पुढती ॥


प्रतिपक्षाते मिळता न मिळे । अंगा स्पर्श रती ॥

त्वरा करा नाथा,Tvara Kara Natha

त्वरा करा नाथा, तुझिया नावा मळवितो राहू खरा ॥

जगविल आशा मजला नच आता, गमविता वेळ जरा ॥

जा जा न वचना,Ja Ja Na Vachana

जा जा न वचना । बोला थांबवीत कोणी न आपणा ॥

कसा थाट मांडिला । लव जरी खेळतां या पला ।
त्यांत थोरपण उरतेची ना ॥

घाई नको बाई अशी,Ghai Nako Baai Ashi

घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला
देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला

कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा विसरले न मी तुला

पिऊनि चांदणेच रात चांदरात ओसरता
खुणावीत मधुनलिनी बोलविती हळूच मला