Showing posts with label L-विनायक रहातेकर. Show all posts
Showing posts with label L-विनायक रहातेकर. Show all posts

शुक शुक मन्या,Shuk Shuk Manya

शुक शुक मन्या, जातोस की नाही, का पाठीत घालू लाटणं ?
नको ग मने, तुला न शोभे, तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं !

निवांत आहे अवतीभवती तू संधी शोधली नामी
तुझ्या प्रीतिच्या लोण्यासाठी चोरून आलो ना मी !
बसेल बडगा पाठीत मिस्टर, भंगून जाईल स्वप्न
आता घालू का पाठीत लाटणं ?

बिलगाया मी तुजला येता उडवुनि का लाविसी ?
किती लोचटा, मागे मागे करुनी घोटाळसी ?
बरं नव्हे हं, मने प्रियतमे, फिस्कारून बोलणं
आता घालू का पाठीत लाटणं ?

भेटीगाठीला सोकावून तू फारच गेलास मन्या
काय करू मी, चैन पडेना, मुळिच मला तुजविना
मनात प्रीती तुझ्या खरं ना, वरवर रागावणं ?
शुक शुक !!

भारत अमुचा देश,Bharat Amucha Desh

भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
’भारत अमुचा सत्यधर्म हा’ मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक

आम्हि मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ

धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्नी त्याचा साकारू आलेख

प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे साऱ्या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख

ज्या हरीवर मी प्रिती केली,Jya Harivar Mi Preeti Keli

ज्या हरीवर मी प्रिती केली, जडले जयाचे पिसे
तयाला काळिज नाही कसे ?

रूप सुराला भुलुनी गेले
त्याच क्षणी मी त्याची झाली
सर्वस्वा मी वाहून बसले, करून घेतले हसे;
तयाला काळिज नाही कसे ?

एकांगी का प्रीत म्हणावी
फसगत माझी का समजावी
मीलन स्वप्ने किती बघावी, कुठवर सोडू उसासे;
तयाला काळिज नाही कसे ?

उघडा दार घराचे,Ughada Daar Gharache

उघडा दार घराचे, उघडा दार मनाचे
आत्मारामा जागे करुनी काम करा रे पुण्याचे
उघडा दर घराचे, उघडा दार मनाचे

अंधाराचा चोर पकडण्या, सूर्य-शिपाई आला
माणसातला चोर कशाने दिवस-उजेडी भ्याला
मुक्ति अशाने मिळते का रे रांजण भरता पापाचे

काल रात्रि तू पाप माणसा असशिल काही केले
वेळ असे ही अनुतापाची पातक जाई धुतले
सोनसकाळी कामा लागुन सोने कर तू जन्माचे

नफा आणखी तोटा यांचे गणित चालते जेथे

मंदिर कसले दुकान हे तर ढोंग विक्रिला येथे
हृदय शोधुनी पाही वेड्या आसन ते रे देवाचे

अरे दुःखी जीवा बेकरार,Are Dukhi Jeeva Bekarar

बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले
अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते

अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको
अकेला तू तुला या जगात समजू नको

मी बदनशीब असा दुःख मला सामोरी
कहाणी दर्दभरी लोक ऐकती लाखो

हे फूल उमलले नव्हतेची सावली सरली
कुणी ना हात दिला दूर राहिले धनको

तलाश रोज करी ध्यास घेतला पुरता
मला ते प्यार हवे आणखी काही नको