Showing posts with label M-वसंत देसाई.S-आशा भोसले. Show all posts
Showing posts with label M-वसंत देसाई.S-आशा भोसले. Show all posts

SNAN KARITI LOCHANE स्‍नान करिती लोचने

स्‍नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हापुन्हा
शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
नील कमल पाहता तूच भाससी मना

तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

लोचनांस लागले वेड रे निळेनिळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सांवळे
जन्मपूष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना


Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -वसंत देसाई VASANT DESAI
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -स्वयंवर झाले सीतेचे SWAYAMWAR ZALE SEETECHE

घेऊन मैफलीचा रात्रीतला,Gheun Maiphalicha Ratritala

घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा
इष्कात धुंद सारे, हा रंग आज न्यारा

डोळ्यांतले शराब, ओठांतला गुलाब
कैफात डोलतो हा वेडा कुणी नबाब
सुरईतल्या सुधेची पेल्यात ओत धारा

पायातुनी उठावा झंकार पैंजणांचा
गाण्यात सूर नाचे बेफाम भावनांचा
दाही दिशादिशांत खेळे गुलाब वारा

ही बाग यौवनाची आली जणू भराला
ही रात्र पौर्णिमेची भरतीच सागराला
वेड्या मुशाफिरा तू शोधू नको किनारा

घेऊन मैफलीचा रात्रीतला,Gheun Maiphalicha Ratritala

घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा
इष्कात धुंद सारे, हा रंग आज न्यारा

डोळ्यांतले शराब, ओठांतला गुलाब
कैफात डोलतो हा वेडा कुणी नबाब
सुरईतल्या सुधेची पेल्यात ओत धारा

पायातुनी उठावा झंकार पैंजणांचा
गाण्यात सूर नाचे बेफाम भावनांचा
दाही दिशादिशांत खेळे गुलाब वारा

ही बाग यौवनाची आली जणू भराला
ही रात्र पौर्णिमेची भरतीच सागराला
वेड्या मुशाफिरा तू शोधू नको किनारा

घनःश्याम सुंदरा श्रीधरा,Ghan Shyam Sundara

घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला



घनदाट रानी वाहे,Ghandat Rani Vahe

घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी

वेळुच्या बनात चाले वाऱ्याचे गायन

पाचोळ्याने भवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणी

दुरावर ऐकु येई सागराचे गीत

निळे निळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनी वाणी

वाऱ्यामध्ये ऐकु येई तुझे कान गूज
चंद्र सूर्य ताऱ्यामाजी प्रभू तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी

घडी घडी अरे मनमोहना,Ghadi Ghadi Are Man

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

भरम धरिल जन तुझा नि माझा पहा पुरती चौकशी
सजणा नको रे बोलु मशि

छबिदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी अवडलीस माझ्या मना
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा
सजणा तुजसम रे देखणा

तुझी प्रीत लाभली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झाले पिशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

दिसतेस चटक चांदणी अगे साजणी मनी तू ठसलीस अमुच्या गडे
छंद लागला तुझा अम्हाला रात्रंदिन फाकडे
नीज ध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी घरी मी सिद्ध करुनिया विडे
घरी मी सिद्ध करुनिया विडे
एकांति मुखि घालता चकाकतील माझ्या हातातील चुडे
इश्काची चटक लागली, जीवा चांगली, रंगली वृत्ती तुजपाशी
सजणा नको रे बोलु मशि
सजणि नको ग बोलु मशि

घडी घडी अरे मनमोहना हसुनी गुणिजना देखता नको रे बोलु मशि

गोल तुझ्या शरीराचा,Gol Tujhya Shariracha

गोल तुझ्या शरीराचा डौल वर गोरा रंग नवती कवळी
वय नूतन हाती निऱ्या, चालणे चपळगती, नागीण पिवळी


अधरकुटी बत्तीस हिरकण्या एकावळी नग विराजती
ओठ शुद्ध पवळ्याचा रंग, लाजावी पाहून जावेळी ग ती

मंजूळ स्वर ऐकून कोकिळा वृत्ती बसुनी मनी गजबजती
जानु-जंघ सुकुमार पोटऱ्या अति नाजूक ग कर्दळी

गुलजार गुलछडी नटून मी,Guljar Gulachadi Natun Mi

गुलजार गुलछडी नटून मी खडीखडी
नाचते मी घडीघडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा


सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी

चुणीवर चुणीचुणी उडवी पदरा पदरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा

डाळिंब फुटे ओठात गालामध्ये लाज
मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज
छुमछुम बोले चाळ, नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा

बेभान नाचते रूपगुणाची राणी
उर होतो खालीवर बाई पारव्यावाणी
अडवून जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा

गळ्यात घालुनी गळा,Galyat Ghaluni Gala

गळ्यात घालुनी गळा गाऊ या प्रीतिची गाणी
तू राजा अन्‌ मी राणी !
मी राजा अन्‌ तू राणी !

चल बिलगूनी चालू अधांतरी, या डोंगर माथ्यावरती
हे निळे निळे आभाळ येईल तुझ्या नि माझ्या हाती
कसे उरावे भान मला तू मिठीत ग साजणी
तू राजा अन्‌ मी राणी !
मी राजा अन्‌ तू राणी !

सूर बिलगले तुझ्या सुरांना, राहू रे मी कशी एकटी
मी तुझ्या रूपातच रे एकरूप झाले शेवटी
तू माझा अनुराग तुझी मी अनुरागी रागिणी

मी राजा अन्‌ तू राणी !
तू राजा अन्‌ मी राणी !

कृष्णा कशी रे लागली,Krishna Kashi Re Lagali

तुझिया बोटाला,
कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार ?

माझ्या मंदिरी नाही एकही चिंधी, शालू शेले अपरंपार !
तुझिया बोटला !

दारी धावली कृष्णा ऐकुनी श्रीकृष्णाची हाक
करांगुलीचे रक्त पाहुनी कळवळली क्षण एक
डोळा ये पाणी, फाडिली जरतारी पैठणी
तुझिया बोटाला !

कृष्ण माझी माता,Krishna Majhi Mata

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।
उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥

कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥

तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा ।
वाटो ना करावा परता जीवा ॥४॥

कशी झोकात चालली,Kashi Jhokat Chalali

कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
उरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर

टाकून टाकशील किती रं जाळी

मेघाची सावली कुणाला घावली
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर



कशि नाचे छमाछ्म्,Kashi Nache Chamacham

कशि नाचे छमाछम्‌‌, मत्त मयुरी ।
दरि दरी झंकारित करि ही मदनधनूची दोरी ॥

निर्झर खळखळ आज घुमवि पखवाज
करित हा वनवात मुरलिची साथ
वदत महेश्वर, "अशि न पाहिली, नर्तन कुशल किशोरी" ॥

एकवार तरी राम दिसावा,Ekvaar Tari Ram Disava

हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा,
राम दिसावा

मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राम्हण
शाप तयाचा पाश होऊनी,

आवळितो जिवा

पुत्रसौख्य या नाही भाळी
परि शेवटच्या अवघड वेळी
राममूर्ति मज दिसो सावळी

पुत्र नव्हे तो अंश विष्णूचा,
वरदाता व्हावा

मुकुट शिरावर कटि पीतांबर
वीर वेष तो शाम मनोहर
सवे जानकी सेवातत्पर
मेघःशामा, हे श्रीरामा,
रूप मला दावा



उठि उठि गोपाला,Uthi Uthi Gopala

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला


रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन
सान पाउली वाजति पैंजण छुन छुनुन छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला


राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला


तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला

आज गूज सांगते तुला, Aaj Guj Sangate Tula

आज गूज सांगते तुला
छंद एक लागला मला
पहाटची उठुन मी, उगिच चुंबिते फुला फुला

धुक्यात धुंद हिंडते, स्वप्नलोक धुंडते
हळुच फुंक घालुनी, फुलविते दला-दला

फुलापरीस कोमले, चुंबितेस तू फुले
सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला

त्या फुलात कल्पना दावि दोन लोचना
याही लोचनास सखी, तोच ध्यास लागला

आज आपुल्या प्रथम प्रितीचा, Aaj Aapulya Pratham

आज आपुल्या प्रथम प्रितीचा संगम हा झाला
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा ॥

नाचति झाडे, नाचति हो वेली,
रानपाखरे वेडी झाली !
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला,
भेटाया आला !

पहा कोयना इकडून येई
समोरून ही कृष्णामाई !
प्रीतीसंगम सखे असा हा,
जगामध्ये पहिला !