Showing posts with label M-प्रभाकर जोग. Show all posts
Showing posts with label M-प्रभाकर जोग. Show all posts

पोर मी लहान POR MI LAHAN

पोर मी लहान बालीका अजाण
माझ्या खिडकीत वाकून पाहु नका 
नगं दावूस तोरा माझ्या गुलमोहरा 
हात हातात सजनी देशील कां

आई बापाची लाडकी मी लेक
माझ्या दिमतीला नोकर अनेक
खड्या नजरेचा पहारा
असे माझ्या दारा
दाराच्या आत कधी येऊ नका 

मी बंगालचा  जादुगार
माझ्या मुठीत इद्या हजार   
किमयागारिणं पहारा करुनियां गार 
तुझ्या दरवाज्याला मी देईन धक्का 
कळी ज्वाणीची लागली फुलाया उरी
जीवन तेजात मोहरली काया सारी
माझ्या हृदयाची चिमनी चिवचिव करी
तिच्या नाजुक पंखांना डिवचु  नका
माझ्या ज्वाणीचा अवखळ भुंगा
तुझ्या कळी भवतीनं घालिल पिंगा

मायेचं पाखरू बघ लागलय झुरुं  
प्रीती वाचून ग जीव हा जाईल फुका



Lyrics -जगदीश खेबुडकर
Music -प्रभाकर जोग
Singer -लता मंगेशकर,जयवंत कुलकर्णी  
Movie / Natak / Album -आंधळा मारतो डोळा 

हसले फसले हरवून मला,Hasale Phasale Harvun Mala

हसले, फसले, हरवून मला मी बसले

कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
मी अंग चोरीले ग, हळुवार स्पर्ष झाला
क्षण ते दंवात विझले

देठातुनी फुलावे, हितगूज एक ओले
कुजबूज पाकळ्यांची, गंधास रंग बोले
सारे मनात ठसले

वेलीवरी धुक्याचा, उठता नवा शहारा
स्वप्नात जागले मी, छेडीत चंद्र तारा
स्वर ते अबोध कसले

ओशाळल्या मनाला, जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे, काही न आज माझे
म्हणुनी उगाच रुसले

स्वर आले दुरुनी,Swar Aale Duruni

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वाऱ्याचे
आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी

सांज रंगात रंगून जाऊ,Sanj Rangat Rangun Jau

सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला
मलमली रात येऊ दे थांब ना, चांदण्याचा घेऊन झुला

नभ फुलले, ढग झुलले, सागराच्या किनाऱ्यास खग भुलले
स्वप्नगंधात न्हाऊन आली धरा, अंग अंगे सुखाचाच वाहे झरा
आज आनंद पानाफुलाला
गोजिरे प्रीतीचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला

एक गाणे मनी या फुलपंखी, आळविते तुझी आज मधुवंती
शब्द माझे तुझी ही मधुगितीका, त्या स्वरांतून उमले जणू प्रीतिका
पश्चिमेला नवा रंग आला
त्याच रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला

स्वर जुळता, मन मिळता, रोमरोमी सतारीच झंकारती
या सुखाने आता प्राण ओलावले, पापण्यांना तुझे ओठ हे स्पर्षले
मीलनाचा असा सोहळा
गोजिरे प्रीतीचे गीत गाऊ लेउनी चांदव्याची दु:शाला

सांगू कशी प्रिया मी,Sangu Kashi Priya Mi

सांगू कशी, प्रिया, मी माझे मला कळेना
हळुवार भावना ही शब्दांस आकळेना

एकांत आगळा हा, ही वेगळीच रात
चाहूल काय बाई, बाहेर की मनात
संकोच लाजरीचा अजूनी कसा ढळेना

लज्जा अबोल झाली, डोळेच बोलु दे, रे
अपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे, रे
उकलून पाकळी ये परि, फूल हे फुलेना

नवखा तुझ्यापरी मी नवखी मनात धुंदी
माझ्यातुझ्या सभोवती भरले धुके सुगंधी
मधुरात मीलनाची फिरुनी अशी मिळेना

संसार-मंदिरी या आता,Sansar Mandiri Ya Aata

संसार-मंदिरी या आता उणे न काही
आनंद नाचतो ग आनंद गीत गाई

झाले सुवासिनी मी हातात राज्य आले
गृहिणीपदावरी मी साऱ्या सुखात न्हाले
ही ठेव वैभवाची नांदे दिशांत दाही

या श्याम-मंजिरीचा वृंदावनी पिसारा
दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा
हे झाड अंगणी या रखवालदार राही

पतिरूप देवा माझा सिंहासनी विराजे
गालात हासते मी डोळ्यांत प्रीत लाजे
भाग्यास आज माझ्या उपमा सुचे न काही

सोनियाचा पाळणा रेशमाचा,Soniyacha Palana

सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग
मधोमध विसावला माझा चित्तचोर ग

नीज नाहि डोळा, कसा टकमक बघतो
बाळमुठी वरखाली नाचवीत राहतो
याच्या चांदण्यांत माझे लोचन चकोर ग

याच्या दर्शनाने येई सुखाला फुलोरा
याच्या स्पर्शाने लाभे आशेला निवारा
याच्या प्रेमसूत्रे नाचे माझा मनमोर ग

कुणी गुणगुणा गाणे, कुणी हालवा हिंदोळ
झोपु द्या ग राजसाला, हीच विसाव्याची वेळ
शिरी कृपादृष्टी याच्या धरा सानथोर ग

सत्यात नाहि आले,Satyat Nahi Aale

सत्यात नाहि आले, स्वप्नात येउ का ?

विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का ?

हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाउ का ?

हसता नभात तारा, हसता फुलात वारा
प्राणात हासते ते उधळून जाऊ का ?

तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नीच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का ?

सती तू दिव्यरूप मैथिली,Sati Tu Divyaroop Maithili

दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भाळी
सती तू दिव्यरूप मैथिली !

सुमनाहुनि तू कुसुम कोमला
रामप्रभू तुज पती लाभला
वनवासाची चौदा वर्षे पतिव्रते भोगिली !

विजनवासिही रामप्रभूचे
सुख न लाभले सहवासाचे
वनवासातही लंकेमाजी वनवासी राहिली !

शेवट झाला दुष्ट रिपूंचा
कलंक उरला तुज परघरचा
म्हणुनि शुद्धते शुद्धीसाठी अग्निचिता स्पर्शिली !

रामराज्य ये आयोध्येवर
भाग्य अडखळे उंबरठ्यावर
लोकराधनेसाठी प्रभुने तुजलाही त्यागिली !

रामायणी तुज दिगंत कीर्ती
सोशिलेस तू; पावन मूर्ती
भुमिसुता तू, दिव्यहि अंती, धरणीने रक्षिली !

शुभंकरोति म्हणा मुलांनो,Shubhankaroti Mhana

दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योति तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा

या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना

दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना

वृंदावनात माझ्या ही तुळस,Vrindavanat Tulas Dolate

वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते
मी प्रीतभावभोळी पतिदेव पूजिते

घरकूल सानुलेसे या दोन जीवितांचे
येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे
सखयास मी मनाचे हे फूल वाहते

रघुनंद-श्याम-विष्णू त्यांच्यात मी पहाते
सानंद प्रीतिगंगा त्यांच्या हृदी वहाते
तृप्ती मनोरथांची त्यांच्यात राहते

गत जन्मिंच्या तपाचे हे पुण्य ये फळाला
या एक भाबडीला राजा गुणी मिळाला
दोघांस ईश्वराशी मी सौख्य मागते

लक्ष्मी तू या नव्या,Lakshmi Tu Ya Navya

नकोस नयनी भरु आसवे देऊ नको हुंदके
लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके

तुझ्या पाऊली येईल आता
आनंदाची अमोल सरिता
घरकुल आमुचे प्रसन्नतेने होईल ग बोलके

इथे अंगणी किती नाचतिल
तुझ्या स्मितासम सुमने चंचल
तुझ्याच वात्सल्यातुन येतिल या सदनी माणिके

नको बावारु मुली अशी तू
मनी न ठेवी कसला किंतू
तुझ्या गुणांची गंगा आम्हा पाहू दे कौतुके

लपविलास तू हिरवा चाफा, Lapavilas Tu Hirava Chafa

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का ?

रंगवि रे चित्रकारा,Rangavi Re Chitrakara

गुंजते सर्वांग माझे गोड उठती झंकृती
रंगवि रे चित्रकारा हीच माझी आकृती

काजळावाचून डोळे आज दिसती देखणे
गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे
अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्वीकृती
हीच माझी आकृती !

दाटला रे हर्ष ओठी हळूच वळते हनुवटी
रोमरोमी या शरिरी लाजरीची रोपटी
उमज माझी मज पडेना स्वप्न कि ही जागृती
हीच माझी आकृती !

अंगलटीची ऐट झाली आज का ही वेगळी
मधुप पुढती थांबलेला फूल लपवी पाकळी
अधीरले मी मीलनासी परि न करवे ती कृती
हीच माझी आकृती !

रवि आला हो रवि आला,Ravi Aala Ho Ravi Aala

आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला
रवि आला हो रवि आला

झाडे पाने फुलवेली हो थेंब दंवाचे ल्याली हो
प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला
रवि आला हो रवि आला

कवाड अंगण उजळावे फुलासवे मन उमलावे
हसली सदने हसली वदने तम विरुनी गेला
रवि आला हो रवि आला

करू आरती तेजाची, तेजाची रविराजाची
मंगल ऐका मंगल देखा मंगलमय बोला
रवि आला हो रवि आला

ये निद्रादेवी,Ye Nidradevi

ये निद्रादेवी
तुझे सावळे हात प्रियाच्या पाठीवर ठेवी

घाव घेऊनी शोककथांचे
अंगावरती वण मुक्या व्यथांचे
वत्सलतेचे लेप मुलायम तूच हळू लावी

दु:खभागल्या या डोळ्यांवर
चंदनशीतल घालुन फुंकर
थकलेल्या या दिठिस उद्याची सुखस्वप्ने दावी

कृष्णे तुझिया मांडीवरती
लाभु देत या लव विश्रांती
साद सुगंधित तुझा तूच या अंगाई गावी

या घरची मी झाले,Ya Gharchi Mi Jhale

नव्हे किशोरी किंवा रमणी
या घरची मी झाले गृहिणी

सान दिराची करिता सेना
नवी भावना येई अनुभवा
वात्सल्याने मन ओथंबे
चिमणे मुख पाहुनी

वडील दिराचे वाटतसे भय
दास्य जाणवे आठवते वय
स्वामित्वच ते घरी वावरे
नमते पदी धरणी

कष्ट उपसणे मिटल्या ओठी
सुसह्य मज हो एकासाठी
सौभाग्याचे धनी लाभले
प्रेमळ अन्‌ सद्गुणी

मीच माझ्या धामी रामा,Meech Majhya Dhami Rama

मीच माझ्या धामी रामा बंदिवान झालो
सख्या-सोय-यांच्या बेड्या हाति पायि ल्यालो

दुरावले सज्जन सारे, निंदतात पोरे-सोरे
घोट अमृताचा म्हणुनी चढी भांग प्यालो

बंद करून खिडक्या-दारे, मीच कोंडले रे वारे
फास घेउनी मायेचा, जितेपणी मेलो

आता समर्था रे बापा, तूच जाळ पापा तापा
नादरूप पस्तावा मी, तुझ्या पदी आलो

मी सुखाने नाहले,Mi Sukhane Nahale

मी सुखाने नाहले
काल जे स्वप्नात आले, आज डोळा पाहिले

बावरी, भोळी, खुळी ग, मी स्वतःशी बोलते
बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते
शब्द होता भावनेचे, मी सुरांतुन गाइले

लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता
नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता
लाडक्या देवासवे मी लीन हो‍उन राहिले

अमृताची ही घडी अन्‌ अमृताचे चांदणे
अमृताचा स्पर्श होता काय मागू मागणे
धन्य झाली आज काया धन्य जीवन जाहले

माझ्या भावाला माझी माया,Majhya Bhavala Majhi Maya

जीव भोळा खुळा, कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

आई बाबांची सावली सरं
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे

भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
माय लक्षुमी त्याच्या मागं पळू दे

बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची, डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वरशा वरशाला त्याचा पाळणा हलू दे