Showing posts with label स्वयंवर झाले सीतेचे (१९६४). Show all posts
Showing posts with label स्वयंवर झाले सीतेचे (१९६४). Show all posts

स्नान करिती लोचने,Snan Kariti Lochane

स्नान करिती लोचने, अश्रुंनी पुन्हा पुन्हा
शेषशयन श्रीधरा दृष्टी अधिर दर्शना

नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होऊनी तनू निळ्या जळात पोहते
नील कमल पाहता तूच भाससी मना

तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेऊनी सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना

लोचनास लागले वेड रे निळे निळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सावळे
जन्मपुष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना

रम्य ही स्वर्गाहून लंका,Ramya Hi Swargahuni

रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तिच्या सागर लहरी नादविती डंका

सुवर्ण कमलापरी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका

लक्ष्मी-लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?



निघाले असतिल राजकुमार,Nighale Asatil Rajkumar

निघाले असतिल राजकुमार
पथ मिथिलेचा असतिल चुंबित कमळदळे हळुवार

कुठे पहाटे तृणांकुरांवर धुके पसरले असेल सुंदर
हिम रंगावर निळी पाऊले मिटवीत सुकुमार

कुठे तरुतळी सायंकाळी विसावेल ती मूर्त सावळी

तरुशाखांनी असेल केला तारासम झंकार

अंग थरथरे लवती लोचन समीप असतिल श्री रघुनंदन
आज स्मराने हळू उघडिले आर्त मनाचे द्वार