Showing posts with label तू तिथं मी. Show all posts
Showing posts with label तू तिथं मी. Show all posts

साद कोकिळ घालतो,Saad Kokil Ghalato

साद कोकिळ घालतो कधी वसंत येईल
पान गळल्या तरूला नवी पालवी देईल

कसा मोहराच्या आधी चोहिकडे परिमळ
वाऱ्यातून तरंगत येई वसंत चाहूल

शोधीत गाव आलो,Shodhit Gaav Aalo

शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले
किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले

कधी ऊन झेलले अन्‌ कधी तृप्त चांदण्यात
साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत

दिस मावळेल आता उजळेल चांदरात
जाता सरून रजनी येते नवी पहाट
चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत

शब्दाविना ओठांतले,Shabdavina Othatale

शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला
शब्दाविना कळले मला
ओठांतले कळले मला

डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला
हृदयातले कळले मला

जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला
झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला

तू छेडियल्या तारांतुनी जन्मास या स्वर लाभले
माझ्या तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला
आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला

युगायुगांचे नाते अपुले,Yuga Yuganche Nate Apule

युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा !
सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा !

भासे सारे सुने तुझ्यावीण, तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या कधी आपुले होईल मीलन
ऊन-सावल्या झेलत हासत जन्म सरावा !

जो तो आहे ज्याचा त्याचा परके झाले सारे जीवलग
देह दोन परी एकच आत्मा कुणा कळावी आपुली तगमग
एकच आशा शेवटचा दिस गोड करावा !



जळ डहुळले बिंब,Jal Dahulale Bimba

जळ डहुळले बिंब हरपले
चंद्राला सोडून चांदणे चालले

दाटल्या साऊल्या कातर उदास
गडद धुक्यात कोंदले आकाश