निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो दिसला अन् मी पाहिले -- पाहिले परी ते कुरऱ्याने डोळ्यात इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोऱ्याने हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने ओठ न हलले शब्द न जुळले थोडे चुकले रे
का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय् ! -- काय ? हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ? अन् तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
तो भाव प्रीतीचा दिसला -- दिसला मग संशय कसला ? हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा ! प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडले रे
नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली
कोण होतीस तू, काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू
सुंदर रूप तुझे निर्मळ भारी होतीस अशी तू पवित्र नारी
डोईवर पदर, पदरात चेहरा, डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा होती यशोदा तू, होतीस तारा तू, होतीस राधा तू, होतीस मीरा तू पार्वती ती महान झाली राज्य वैभव टाकून आली काळ बदलला तूही बदलली सा-यांना भुलवीत रसत्याने चालली पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही सडक लैला अशी बदनाम झालीस तू तू अशी नारी होती, लाखात भारी होती मर्दानी झाशीवाली होउन लढलीस तू
कोण होतीस तू, काय झालीस तू
पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली
कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू
तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा होतास असा तू मर्दाचा राणा सिंव्हाची छाती होती, उरात आग होती वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती होतास राम तू, होतास बुद्ध तू होतास कृष्ण तू, विवेकानंद तू भगतसिंग तो महान झाला देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला
काळ बदलला, तूही बदलला करीत इशारे तू रस्त्याने चालला पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी सडक मजनू असा बदनाम झालास तू तू असा शूर होता, लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
लाजवंती कालची तू चंचल छछोर होई बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही कोण होतीस तू, काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू
आखुड केस हे आखुड कपडे पाठ ही उघडी, पोट हे उघडे कालची सीता आज डॅडींची रीटा झाली साडी बिचारी खाली घसरली नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा पुढून मुलगी मागून मुलगा लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू तू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू
काल तुझ्या हाती तलवार होती लढवय्याचा तू वारसा आज तुझ्या हाती कंगवा घडीघडी बघसी तू आरसा कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू
काय तुझी वेषभुषा आता कहर झाला कालचा हिरो हा आज झिरो झाला कमरेला बेलबॉटम अंगात पोलका लांबलांब केस हे मिशिला चटका तऱ्हा तुझी बायकी, बघण्याजोगी पुढून मुलगा हा मागून मुलगी मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू तू असा शूर होता लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू