भरे मनात सुंदरा,Bhare Manat Sundara

भरे मनात सुंदरा, तुझीच मूर्ति श्यामला
छंद लागला जिवास, धुंद जो करी मला

कोकिळेस लाभली सुरम्य गीत-माधुरी
गौरगाल भूषवी सुरेख तीळ साजरा

लाभता तुझ्या परी सुकांत कृष्ण-सुंदरी
म्हणेन मी नको मला, अप्सरा मनोहरा

खेद न करि श्यामले ! सावळाच रंग खुले
पहा, निशाच शोभवी सतेज चंद्र हासरा

1 comment:

  1. कै. विद्याधर गोखले यांची ही खूपच छान रचना आहे ही. मला फार आवडते.

    ReplyDelete