नकोस नौके परत फिरूं,Nakos Nauke Parat Phiru

नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं

जय गंगे, जय भागिरथी
जय जय राम दाशरथी

ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं

श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊं, पदस्पर्षांनें सर्व तारुं

जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतिल कल्पतरू

कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण, कां मग कर्तव्यासी परत सरूं ?

अतिथि असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेंबुरें तें राम जाणता, आपण अपुलें काम करूं

गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूंही-दक्षिण देशा अमर करूं

पावन गंगा, पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरूं

नको विसरू संकेत,Nako Visaru Sanket

नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा

दिवस मावळता धाव किनाऱ्याशी
तुझे चिंतन मी करिन तो मनाशी !

नको विवाहचि हा मजला,Nako Vivahachi Ha Majala

नको विवाहचि हा मजला ।
सोंग नको हे श्रीमंतीचें,
कीर्ति नको सन्मानही असला ॥

धूर्त तो भद्रेश्वर वेंची ।
द्रव्य किती या नाहिं मिती ।
पाहोनि अती । जिव घाबरला ॥

नको वाजवू श्रीहरी,Nako Vajavu Shrihari

नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ
जल स्थिरावली

घागर घेऊन पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली

नको वळुन बघू माघारी,Nako Valun Baghu Maghari

नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी

तुझ्या नि माझ्या प्रीतीची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची

तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी

नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतिल वरती रत्‍नं सुंदर किती
त्यामधे नाही तुझी राणी, पाहुनी होशिल खिन्न मनी


कशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रं ही तुला हेरूनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे

आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी

नको रे बोलूस माझ्याशी,Nako Re Bolus Majhyashi

नको रे बोलूस माझ्याशी
प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसऱ्याशी
तू नको रे बोलूस माझ्याशी

शीळ घालिशी चंद्रावळीशी
गूज बोलिशी राधेपाशी
नट मुलखाचा तू हृषिकेशी
गोकुळवासी मुली भुलविसी
खेळशी दिवस, निशी

गोकुळातील द्वाड पोरटी
दहीदुध चोरीती तुझ्याचसाठी
गोपी फिरती तुझ्याच पाठी
अप्पलपोट्या तू मुलखाचा
कळे न कोणाशी

नको रे नंदलाला,Nako Re Nandalala

नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !

भरुनिया रंग पिचकारी
भीजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा, हरे रामा

अंगणि माझ्या करिसी दंगा
वेळिअवेळी तू, श्रीरंगा

भलत्या ठायी झोंबसि अंगा
गौळणी भवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारद रात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !
खुदुखुदु हससी, रे गिरिधारी
कशि रागावू तुजसि, मुरारी ?
अवचित अडविसि यमुनातीरी
किती सोसावी ही शिर्जोरी ?

मागशील भलते काही

हरि, तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !

नको रे नंदलाला,Nako Re Nandalala

नको रे नंदलाला, नंदलाला !
धरू नको हरी रे पदराला
नको रे नंदलाला, नंदलाला !

भरुनिया रंग पिचकारी
भीजवलीस गौळण गोरी
हरे कृष्णा, हरे रामा

अंगणि माझ्या करिसी दंगा
वेळिअवेळी तू, श्रीरंगा

भलत्या ठायी झोंबसि अंगा
गौळणी भवती घालिसी पिंगा
चांदण्यात शारद रात्री
बासरी भिनविली गात्री
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !
खुदुखुदु हससी, रे गिरिधारी
कशि रागावू तुजसि, मुरारी ?
अवचित अडविसि यमुनातीरी
किती सोसावी ही शिर्जोरी ?

मागशील भलते काही
हरि, तुझा भरवसा नाही
हरे कृष्णा, हरे रामा

नको रे नंदलाला, नंदलाला !

नको रे जाउं रामराया,Nako Re Jau Ram Raya

उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया
नको रे जाउं रामराया

शतनवसांनीं येउन पोटीं
सुखविलेंस का दुःखासाठीं ?
प्राण मागतो निरोप, रडते कासाविस काया

कशी मूढ ती सवत कैकयी
तीही मजसम अबला, आई
आज्ञा देइल का भरता ती कांतारीं जाया ?

तृप्त हो‍उं दे तिचीं लोचनें
भरत भोगुं दे राज्य सुखानें
वनीं धाडिते तुजसि कशास्तव वैरिण ती वाया ?

सांगुं नये तें आज सांगतें
मजहुन ह्यांना ती आवडते
आजवरी मी कुणां न कथिल्या मूक यातना या

तिच्या नयनिंच्या अंगारांनीं
जळत जगलें मुला, जीवनीं
तुझिया राज्यीं इच्छित होतें अंतिं तरी छाया

अधर्म सांगूं कसा बालका
तुष्ट ठेव तूं तुझिया जनका
माग अनुज्ञा मात्र जननितें कांतारीं न्याया

तुझ्यावांचुनी राहुं कशी मी ?
वियोग रामा, सांहु कशी मी ?
जमदग्नीसम तात तुझें कां कथिति न माराया

तुझ्या करें दे मरणच मजसी
हो राजा वा हो वनवासी

देहावांचुन फिरेन मग मी मागोवा घ्याया

नको मारूस हाक,Nako Marus Haak

नको मारूस हाक, मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करिशी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा

द्वाड सासरचा गाव
माझं जाईल नाव
तू माहेरचा मैतर जुना

का रे भरतोस शीळ
पडे काळजाला पीळ
गूढ कळेल साऱ्या जना

नको धरूस राग
जरा समजून वाग
तुझ्या डोळ्यात अवखळपणा

लाख लोकांचा हाट
नको अडवूस वाट
धर आवरून आपल्या मनानको भव्य वाडा,Nako Bhavya Vada

नको भव्य वाडा, नको गाडि-घोडा
अनाडी असे मी, तुझा प्रेमवेडा

तुझ्या आणि माझ्या घडू दे ना भेटी

तुला या दिलाची, येईल कसोटी
बेहोश मन हे तुझा त्यास ओढा

मला वाचु दे ना तुझी नेत्रभाषा

किती काळ सोसू उरी मी निराशा
बेचैन हृदया तू दे धीर थोडा

तुझ्या संगतीची जिवा ओढ भारी

हे देवी तुझा मी असे ग पुजारी
नाजूक दिल हे नको ना बखेडा

नको बावरूनि जाऊ,Nako Bavaruni Jau

एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

पंख नाहि दिधले मनुजा जरि ईश्वराने
खंत काय धरिली त्याचि कधी मानवाने
अधांतरि उडति त्याच्या यशाचि विमाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

सूर्य चंद्र नसता गगनि काजळे धरित्री
प्रकाशास कोंडी मानव वीज काचपात्री

तारकास लाजविते ते दीप शामदाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

तुझ्या मागुति मी यावे असे स्वप्न होते
पुढे हो‍उनिया आता तुला हात देते
ऊठ चाल बघसि का रे असा विस्मयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

नको प्रिया छेड काढू,Nako Priya Ched Kadhu

नको प्रिया छेड काढू, नको मला ओढू
माझ्या अंतरीचे नको सूर छेडू

अनामिक ओढ माझ्या मनामध्ये जागे
तुला पुन्हा भेटायाची हुरहुर लागे
तुझ्या रेशमी बंधांनी अशी नको नको प्रित जोडू

फुलायाची हौस नाही; कळी गोड वाटे
स्वप्न एक मंतरलेले लोचनात दाटे
प्रिया छेड हा रंग ना असा नको नको खंड पाडू

नको नको रे पावसा,Nako Nako Re Pavasa

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन

नको देवराया अंत आता,Nako Devaraya Anta Aata

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई

मोकलूनी आस, जाहले उदास

घेई कान्होपात्रेस हृदयातनको दूर देशी जाऊ,Nako Dur Deshi Jau

नको दूर देशी जाऊ सजणा !

हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
नको दूर देशी जाऊ सजणा !
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !

समक्ष तुमच्या बसुनी तुम्हासी
नाही आजवर भाषण केले

सजणा, लाजण्यामध्ये रे दिन गेले
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !

मर्जी मिळाली असता अलिकडे

तुम्ही जाता टाकून वहिले
सजणा, वाटते जिवंत असुनि मि मेले
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा !

नको ताई रुसू,Nako Tai Rusu

नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येउ दे ग गालात खुदकन हसू

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग

देऊ काय तुला, हवे ते ग माग
नवरा हवा का, लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू

लग्नात बुंदीचे लाडू आता वळू
नवीन कपड्यात छान छान दिसू

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
केशरीभात केला, आहे मोठा थाट
ओठात आले बाई लडिवाळ हसू

नको करूंस वल्गना रावणा,Nako Karus Valgana Ravana

नको करूंस वल्गना रावणा निशाचरा !
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां

वंद्नास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा

नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा ?

जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा


योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा !
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा

सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा

इंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा

ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधर्म काममूढ तूं, विचार हा करी जरा

बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त हो‌उं दे एकदां वसुंधरा

नको आरती की,Nako Aarati Ki

नको आरती की नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला

खगांच्या मुखाने प्रभू गाइ गाणे
फुलांतून उधळी सुगंधी उखाणे
गगनांत फुलवी, नवरंग-लीला

सदासर्वकाळी दुज्यांसाठि झिजतो
पुण्यवान जगती खरा तोच जगतो
त्यागात मनुजा, उभा स्वर्ग भरला

प्रकाशात फुलतो अंधार काळा
उन्हापाठि पळतो कसा पावसाळा
बुडे प्रेमरंगी, कळे खेळ त्याला

नका विचारू देव कसा,Naka Vicharu Dev Kasa

नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा

सगुण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा,
चराचराचर असे ठसा

रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ती प्रभुची तोषवि नयना
दिसे कधी का कुणास सांगा
गंध फुलाचा मोहकसा

दर्पणास का रूप स्वत:चे
असती का आकार जलाचे
साक्षात्कार जसा तो दाखवि
दिसेल त्याला प्रभू तसा

नका मारु खडा,Naka Maru Khada,

नका मारु खडा, शिरी भरला घडा, सख्या जाइल तडा,
हे भिजेल गोरे अंग !
ऐके न बाइ तरी हसे खदखदा, असा कसा श्रीरंग ?

नको धरू हात रे, पिचेल माझा चुडा
सुटेल बाइ जुडा, अवखळा, भिजतिल काजळकडा
ऐके न बाइ तरि, करि नयन वाकडा !

थंडीत भरे हुडहुडी, थरकापे माझी कुडी
ती खरी सुखाची घडी
घे बळेच ओढुनि कवळि रेशमी शेला

अधरिचा मधुर मधु मेवा, मुरलीस वाटला हेवा

हे असे काय हो देवा ?
आता फुटु द्या घडा, खुशाल मारा खडा
यापुढे कधि न मी करीन हो ओरडा

नका तोडू पावणं जरा,Naka Todu Pavana Jara

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड, खुणावतो आंबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

अहो टोपीवाले तुम्ही फेटेवाले
टकमक टकमक बघू नका हो
मागं मागं लागू नका

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू, पावणं जरा थांबा

वान अस्सल तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला
हिरवट गोडी आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा
नका तोडू, पावणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा थोडक्यात आवरा
कईकांनी धरला दबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

आधी वाजवत होता चुटक्या
आता कशाला मारतोय मिटक्या
लघळपणाला लागाम घाला
गावात होईल शोभा
नका तोडू, पावणं जरा थांबानका गडे माझ्याकडे,Naka Gade Majhyakade

नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू
लाजरिच्या रोपटिला दृष्ट नका लावू

घोटाळते पायामाजी तुरुतुरु चाल
आडतात ओठांवरी मनातले बोल
नका बाई माझ्यामागे नदीवरी येऊ

पाहील ना कुणीतरी सोडा माझी वाट
मुलुखाचे द्वाड तुम्ही निलाजरे धीट
इतुक्यावरि हासुनिया वेड नका लावू

माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन
छंदिफंदि डोळियांचे त्यात आगबाण
बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ

नकळत होते तुझी आठवण,Nakalat Hote Tujhi Aathavan

नकळत होते तुझी आठवण !

कळ्या फुलांना हळुच हसविते
प्रेमळ निर्मळ उषा उगवते
दिवसाचे ते बघुन बालपण
नकळत होते तुझी आठवण !

हास्याचा कल्लोळ भोवती
भोजन करिता भरल्या ताटी
घास अडकता उचकी लागुन
नकळत होते तुझी आठवण !

सरे प्रीतिचे स्वप्न कोवळे
दोन सानुले विहग पांगले
चित्रपटांतिल प्रसंग पाहुन
नकळत होते तुझी आठवण !

करुनि जागरण कलिका सुकली
म्लान मुखाने घरी निघाली
चंद्रकोर गगनातिल देखुन
नकळत होते तुझी आठवण !

नकळत सारे घडले,Nakalat Sare Ghadale

नकळत सारे घडले
मी वळता पाउल अडले

ती पहिली क्षण ओझरती
परिचयात ओळख नुसती

संभाषण ओठांवरती,
लाजण्यात राहुन गेले

नजरेला नजरेमधला
हसताना भाव उमगला
प्रीतीचा डावहि पहिला
मी क्षणात मोहुन हरले

सोन्याहुन अति मोलाचे
हे माझे गुपित मनीचे
मनि सुगंध उधळित नाचे
क्षण मलाच का हे नकळे

न कळता असे ऊन,Na Kalata Ase Oon

न कळता असे ऊन मागून येते
सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते

कितीदा हसूनी नव्याने जगावे ?

कितीदा रंग या जीवनाचे पहावे ?

जुई-मोगऱ्याला जसा गंध येतो
नवा गार वारा वनी वाहताना
मनासारखी मी तुझी होत जाते
तुला सांजवेळी पुन्हा पाहताना
पुन्हा एकमेकांस आधार होता
तुला मी, मला तू, अता पांघरावे

तुझ्यावाचुनी मी इथे राहताना
तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे
घरासारखे वाटतो रे तरीही
नसे या घराला जुना गोडवा रे
घरी लोक माझेच सारे तरीही
असे एकटेपण कसे मी सहावे ?

जरी आपुले रक्त गोठून गेले
जरी भोवती सुन्न अंधार आहे
तुझा हात हातात आहे अजुनी
तुझी ज्योत जगण्यास आधार आहे
सुखालाच नाकारताना कशाला;
उगा आज डोळ्यांतुनी पाझरावे ?

कितीदा हसूनी नव्याने जगावे
कितीदा रंग या जीवनाचे पहावे

नदी जीवनाची तरी वाहते रे
कधी ऊन वा सावली लागते रे
नवे गाव, वाटा नव्या शोधुनीया
दिशा तांबडी रोजची सांगते रे
पुन्हा एकदा तू जगावे जगावे
नवे रंग या जीवनाचे पहावे

ध्यान करु जाता मन,Dhyan Karu Jata Man

ध्यान करु जाता मन हरपले ।
सगूण ते झाले गुणातीत ॥१॥

जेथे पाहे तेथे राघवाचे ध्यान ।
करी चापबाण शोभतसे ॥२॥

राम माझे मनी राम माझे ध्यानी
शोभे सिंव्हासनी राम माझा ॥३॥


रामदास म्हणे विश्रांती मागणे
जीवीचे सांगणे हीतगूज ॥४॥

धौम्य ऋषी सांगतसे,Dhaumya Rushi Sangatase

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा

रामा संगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी
सीता म्हणे लाडकी, मारा त्यासी राघवा
कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा

राम गेले धावुनी ग बाण भाता घेऊनी
सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी
साद आला दूरचा कोणी मला वाचवा
ओळखिला साद तो बावरली सुंदर
रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा
काय झाले काय की ग चित्ती उठे कालवा

आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली
रावणाने पाऊले तोच पुढे टाकली
बैराग वेषाने मागे तिला जोगवा
डोळ्यामधी आगळा भाव त्याच्या पेटला
जानकीचा धीर सारा हाती पायी गोठला
राक्षसाच्या हाती देह तिचा ओणवा

धूलियता पदिं तुझ्या,Dhuliyata Padi Tujhya

धूलियता पदिं तुझ्या पापनाश या जनांत ॥

नाहि दुजी कांहि वासना । ठाव चरणि विभव मजसि ।

दैवहता हीच भावना । दैव दिसलि सदय रमणी ।

धुंदीत गाऊ मस्तीत राहू,Dhundit Gau Mastit Rahu

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा

थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हांत, धुके दाटलेले
दुधी चांदणे हे, जणु गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दंवाने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची, फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी,
अशी मीलनाची आहे रीत साजणी

अशी हिरवळीची शाल पांघरावी
लाली फळांची गाली चढावी
हळूहळू वारा, झंकारि तारा
आळवित प्रीतीचे संगीत साजणा


जळी यौवनाच्या, डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्य काली, नशा आज आली

एकांत झाला, जणू आज पाहुणाधुंदी कळ्यांना धुंदी फुलांना,Dhundi Kalyana Dhundi

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले, मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली

माळरानि या, प्रीतिची बाग झाली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की, थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की, हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा, किती हा बहाणा

चिरंजीव होई, कथा मीलनाची

तृषा वाढते, तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे, रूप या क्षणांना

धुंदित गंधित होवुनि,Dhundit Gandhit Hovuni

धुंदित, गंधित, होवुनि सजणा
प्रितीत रंगुनि जावु या
छेडीत ये प्रीत-संगित सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
ये सजणा !

कुंजात या गंधलेली फुले, माळुनि जाई झुले
गंधात ही धुंद झाली चमेली, गुलमोहराला भुले
तुझी सखी तुझ्या सवे ही !

पानांतुनी रेशमी चांदणे हे, मोहून येई करी
गाण्यातले सूर हे अमृताचे, दाटुन आले उरी
अशी घडी युगायुगाची !

धुंद होते शब्द सारे,Dhund Hote Shabd Sare

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सइ ये रमुनी साऱ्या या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे ?
धुंद होते शब्द सारे !

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !धुंद ही हवा तरी फूल,Dhund Hi Hava Tari Phool

राग म्हणू की अनुराग कळेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

रूप लाडकी एक वल्लरी
अंग चोरिते लाज बावरी
लहर खेळवी, तरी पान हलेना

धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जीव भाबडा जाण नसावी
मुक्या मनी का प्रीत हसावी
भेटलो तरी सहवास मिळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

मिठी दिठीचा फुले फुलोरा
स्पर्शसुखाचा उठे शहारा
आज वाटते का दिवस ढळेना

धुंद ही हवा तरी फूल फुलेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना


Lyrics -जगदीश खेबुडकर  JAGADISH KHEBUDAKAR
Music -एन. दत्ता N.DATTA
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album - मामा भाचे MAMA BHACHE

धुंद येथ मी स्वैर,Dhund Yeth Mi Swair

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याच वेळि तू असशिल तेथे बाळा पाजविले

येथ विजेचे दिवे फेकती उघड्यावर पाप
ज्योत पणतिची असेल उजळित तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी
ओठांवरती असेल तुझीया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशिल शोधित सखे, स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप ?
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप !

धुंद मधुमती रात रे,Dhund Madhumati Raat Re

धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे

जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे


ये रे ये का मग दूर उभा ?
ही घटिकाहि निसटुन जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे

धुंद एकांत हा,Dhund Ekant Ha

धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता, तार झंकारली

जाण नाही मला, प्रीत आकारली

सहज तू छेडिता, तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला, आज शृंगारली

गोड संवेदना, अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी, मूर्त साकारली

रोमरोमांतुनी, गीत मी गाइले
दाट होता धुके , स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता, रात्र अंधारली

आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडिता, तार झंकारली

धुंद आज डोळे,Dhund Aaj Dole

धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली ?

जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली !

नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी
तुझी पापणी का झुके आज खाली ?
घडी मीलनाची तुषारांत न्हाली !

तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा
फुटावा कळीला दवाचा शहारा
हवे ते मिळाले अशा रम्य काली
नवी रूपराणी नवा साज ल्याली

धुके दाटलेले उदास उदास,Dhuke Datalele Udas Udas

धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन्‌ फिरे आर्त वारा
कुणीही न येथे दिसे आसपास

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ?
कुणा शोधिती या उदासीन लाटा ?
दिशांतून दाटे तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो तुझे सूर येती
जिवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास

धीर धरि धीर धरी जागृत,Dheer Dhari Dheer Dhari

धीर धरि धीर धरी जागृत गिरीधारी
तारितसे भाविकांस तोच चक्रधारी ॥

अढळ पदी अंबरात बसविले धृवाला
संकटात पीतांबर दिला द्रौपदीला
दिधली वैकुंठपेठ सकल गोकुळाला
ऐसा दाता थोर कुंजवन-विहारी ॥


होसी का भयकंपित धरसि का शंका ?
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका
'जय गोविंद जय मुकुंद जय जय सुखकारी' ॥

धिनक धिताम्‌ ढोलक बोले,Dhinak Dhitam Dholak Bole

धिनक धिताम्‌ ढोलक बोले मनातले बोल ग
विझत विझत रातीला पडे पैंजणांची भूल ग

पुनव रातीला जागर चाले
आभाळावरती चांदण झुले
झुलत झुलत गळून जाती मनातले सल ग

रात साजरी रात जागवी

आठवणींची रेघ लाघवी
जागत जागत ओटीत यावे प्राजक्ताचे फूल ग

जोगीण धावे जाराच्या मागे

गतकाळाचे पाशवी धागे
धावत धावत विणून जाई प्रारब्धाची वीण ग

धिक्कार मन साहिना,Dhikkar Man Sahina

धिक्कार मन साहिना ॥
अपमानशल्य ते । विषसमचि जीवना ॥
चढवीन विभवा । अधनाची ललना । हा मार्ग बरवा । मानापमाना ॥

धावत येई सखया,Dhavat Yei Sakhaya

धावत येई सखया । यदुराया ।
नातरी महिमा जाईल विलया ॥

बघ आचरिला । धर्म जगी मी ।
शिकविलासि जो । तूचि कासया ॥

जर शासन मज । लाज तुला ती ।
ब्रीद राख नीज । समयी अशा या ॥

धाव-पाव सावळे विठाई,Dhav Paav Savale Vithai


धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी

एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसे घडी

जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिसि उडी

धागा धागा अखंड,Dhaga Dhaga Akhand

धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया

अक्षांशाचे रेखांशाचे
उभे आडवे गुंफुन धागे

विविध रंगी वसुंधरेचे
वस्त्र विणिले पांडुरंगे
विश्वंभर तो विणकर पहिला
कार्यारंभी नित्य स्मरुया
करचरणांच्या मागावरती
मनामनांचे तंतू टाका
फेकुन शेला अंगावरती
अर्धिउघडी लाज राखा
बंधुत्वाचा फिरवित चरखा
एकत्वाचे सूत्र धरूया

धागा जुळला जीव फुलला,Dhaga Julala Jeeva Phulala

धागा जुळला, जीव फुलला
वेड्या बहिणीला भाऊ मिळाला

ओढ लागे तुला कोटराची
भेट दोन्ही पिला-पाखरांची
दैवलीला खरी, भाग्य आले घरी
अमृताने देह जणू न्हाला

माया ममतेची जुळतील नाती

राखी बांधीन रे आज हाती
उभी राहीन मी, वाट पाहीन मी
दृष्ट लागेल या सोहळ्याला

देवदूतापरी आज येई
रक्षणाला पुढेपाठि राही
स्वप्न साकारले, भाव झंकारले
मोल येईल या जीवनाला

धवल लौकिका,Dhaval Laukika

धवल लौकिका । मलिन करीत मम जनता ॥

विमला मम कांता । जी जगता दे शुचिता ॥

पतियश नाशील ती का ॥

धरिला वृथा छंद,Dharila Vrutha Chand

धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद ?

जरि जीव हो श्रान्त
नाही तृषा शान्त
जलशून्य आभास शोधीत मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले श्वास
माझीच मज आस घाली असा बंध


पथ सर्व वैराण
पायी नुरे त्राण
माझेच घर आज झाले मला बंद

धरित्रीच्या कुशीमधे,Dharitrichya Kushimadhye

धरित्रीच्या कुशीमधे
बियबियाणं निजली
वर पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय डरारे भुईत

सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं
अंगावरती शहारं

ऊनवाऱ्याशी खेळता
एका एका कोंबांतून

प्रगटली दोन पानं
जसे हात ते जोडून

टाळ्या वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा
होऊ दे रे आबादनी

दिसमासा होय वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाला बहर

झाली शेतामध्ये दाटी

कशी वाऱ्यानं डोलती
दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी
देव अजब गारुडी

धर धर धरा,Dhar Dhar Dhara

धर धर धरा धर धर धरा
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा

या आंधळ्यास द्या डोळा
हा सांब सदाशिव भोळा
मी मंतर मारिन काळा ..... छू:

अंतर मंतर जंतर मंतर
आले मंतर कोले मंतर
झुम्मक झिय्या काजुच्या बिया
विठोबाचा विठुमियाँ ..... छू:

विठुमियाँला या तर बाई
आवडतो हा पिंजरा
धर धर धरा

तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरु तुजला
मग होइल अस्सा खोकला
खोकला खोकला, बक्कन खोकला
टाकळा टाकळा - किनई भाजीचा टाकळा
पापडात पापड - पोह्याचे पापड
विठोबाचा आजा माकड
फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा
धर धर धरा

तू गर फेकुनि बी खाशी
जगावेगळी रीत अशी
दांडीवरती डुलकी घेशी

डुल डुल डुलकी वाऱ्याच्या झुळकी

चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
कावळ्या कावळ्या काव काव
आंधळ्या आंधळ्या धाव धाव

पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा
धर धर धरा

धन्य मी शबरी,Dhanya Mi Shabari

धन्य मी शबरी श्रीरामा !
लागलीं श्रीचरणें आश्रमा

चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षतळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा

या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमां

गुरुसेवेंतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा

निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन, आत्मनिवेदन

अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा

नैवेद्या पण काय देउं मी ?
प्रसाद म्हणुनी काय घेउं मी ?
आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा

सेवा देवा, कंदमुळें हीं
पक्व मधुरशीं बदरिफळें हीं
वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा ?

क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा
गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा

कां सौमित्री, शंकित दृष्टी ?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं
या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा

धन्य मी शबरी,Dhanya Mi Shabari

धन्य मी शबरी श्रीरामा !
लागलीं श्रीचरणें आश्रमा

चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षतळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा

या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमां

गुरुसेवेंतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा

निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन, आत्मनिवेदन

अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा

नैवेद्या पण काय देउं मी ?
प्रसाद म्हणुनी काय घेउं मी ?
आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा

सेवा देवा, कंदमुळें हीं
पक्व मधुरशीं बदरिफळें हीं

वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा ?

क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा

गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा

कां सौमित्री, शंकित दृष्टी ?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं

या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा,Dhanya Dhanya Ho

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्‍गुरूरायाची
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरूनि काशी
मृदंग-टाळ-ढोल-भक्त भावार्थे गाती
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती

कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला

श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर,Dhanya Ti Pandhari Dhanya

धन्य ती पंढरी धन्य भीमातीर ।
आणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥

धन्य तो हि लोक अवघा दैवांचा ।

सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥२॥

धन्य ते ही भूमी धन्य तरुवर ।
धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥३॥


धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान ।
आनंदे भवन गर्जतसे ॥३॥

धन्य पशु पक्षी कीटक पाषाण ।

अवघा नारायण अवतरला ॥४॥

तुका म्हणे धन्य संसारातें आलीं ।
हरिरंगी रंगली सर्वभावें ॥५॥

धन्य तूचि कांता,Dhanya Tuchi Kanta

धन्य तूचि कांता । गमसी करिता क्षमा कांता ॥
नवजन्म घेता । त्वदीय सहवास लाभो । दुजी नच वांछा ॥

धन्य आनंददिन पूर्ण मम,Dhanya Aanand Din Purna

धन्य आनंददिन पूर्ण मम कामना ।
मुदित कुलदेवता सफल आराधना ॥

लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा ।
प्राप्त मज होय ती युवति मधुरानना ॥

धन्य आजि दिन,Dhanya Aji Din

धन्य आजि दिन ।
जालें संतांचें दर्शन ॥१॥

जाली पापा-तापा तुटी ।
दैन्य गेलें उठाउठीं ॥२॥


जाले समाधान ।
पायीं विसावलें मन ॥३॥

तुका म्हणे आले घरा ।
तोचि दिवाळी दसरा ॥४॥

धनी मी पति वरिन,Dhani Mi Pati Varin

धनी मी, पति वरिन कशी अधना ।
पति जरि अधन, निधनसम,
मानी भामा विफल इतर सुगुणा ॥


प्रखर पराक्रम वीर भानु भुलवित उषा रक्तवदना ।
तोचि निकट मग जातां जाळी तिजला, ऐशी भीति मना ॥

धनसंपदा न लगे मला ती,Dhan Sampada Na Lage

धनसंपदा न लगे मला ती
मी मानितो गुणसंपदेला

ती चंचला कमला कशाला
मद-धुंद जी करिते मतिला
मी वंदितो माधवाला

धनराशी जाता,Dhanarashi Jata

धनराशी जाता मूढापाशी, सुखवी तुला, दुखवी मला ।

शस्त्र जसे अबलाकराला, रूप जसे ते जोगिणीला
सत्ता सुखरत अधमाला, धन जडजना, मदत पतना ॥

धनगराची मेंढरं गा,Dhanagarachi Mendhara Ga

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

अवो साजिरी दिसत्यात

ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती !
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं सरावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदत्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली !
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड

आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते सारं घडलं !
आन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला
उरलं त्याचं नाव

आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघाल तिथं दिसतंया सारं काळं !
आन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

धक्का लागला ग,Dhakka Lagala Ga

धक्का लागला ग मघाशी कुणाचा
तोल सावरेना बाई, अजुनी मनाचा !

उगा हासला तो, उगा लाजले मी
करी वीज त्याच्या, उरी भाजले मी
ठसा राहीला ग मुक्या भाषणाचा !

पुढे चालले मी, फिरे पाय मागे
कशाची कळेना अशी ओढ लागे
सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा !

झरू लागल्या ग ढगातून धारा
मनीच्या विजेचा मनी कोंडमारा
ठिकाणा तरी ग कुठे साजणाचा ?

भिजे पावसाने जरी अंग सारे

उफाळून येती उरीचे निखारे
शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा !

दृष्ट लागण्याजोगे सारे,Drusht Laganya Joge Sare

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट

घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !दिंडी चालली चालली,Dindi Chalali Chalali

दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला


गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला

दोन रात्रीतील आता संपला,Don Ratriteel Aata Sampala

दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा

वाजली वेडी कडी अन्‌ दार हे शहाण्यापरी
मोगरा माळून आला देखणा वेडेपणा

उंबरा ओलांडताना धीट हे झाले धुके
ही धिटाई झेलताना लाजला वेडेपणा

अजून मजला कळत नाही वेड कोणी लाविले
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा

दोन बोक्यांनी आणला हो,Don Bokyani Aanala Ho

दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरून लोण्याचा गोळा
वाट्यामध्ये झाला हो त्यांच्या, परंतु सारा घोटाळा !


एक म्हणे, "म्याँव, म्याँव, नको पुढे येऊ !"
दुसरा म्हणतो, "म्याँव, म्याँव, हात नको लावू !"
खाण्यासाठी होता हो होता, लोण्यावर दोघांचा डोळा !

( या दोन मांजरांचं भांडणं माकडानं झाडावरून पाहिलं,
म्हणून तो टुणकन्‌ उडी मारुन खाली आला, आणि म्हणाला- )

"हुप्प, हुप्प, हुप्प, माझ्या शेपटीला तूप !
अरे, लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप ?
ऐका माझं, नका भांडू, रहा थोडे चूप."


बोके म्हणती, "माकड भाऊ, शकाल का हे भांडण मिटवू ?"

माकडदादा मान हलवूनी, एक तराजू येई घेऊनी
एक लहान तर एक मोठा !
लहान-मोठे केले त्याने वाटे, ठेवून लोण्यावर डोळा !

( पुढे तर माकडानी आणखीनच मज्जा केली बाबा !)

दोन बाजुला टाकून लोणी, माकड पाहू लागे तोलुनी.

एक पारडे खाली जाई, हळूच त्यातले काढून खाई.
म्हणती मांजरे, "तू का रे लोणी ऐसे खासी बरे ?"
माकड म्हणालं, "दोन सारखे वाटे होण्या असेच करणे योग्य ठरे."

माकडाने ते खाऊनी सारे लोणी, टुणकन्‌ पोबारा केला.

मज्जा झाली माकडाची, पुढे फजिती बोक्यांची !
दोघांमध्ये भांडण होता, होते चंगळ तिसऱ्याची.

त्या बोक्यांना आपल्या भांडणाचा, अस्सा धडा मिळाला !

दोन ध्रुवांवर दोघे आपण,Don Dhruvanvar Doghe

दोन ध्रुवांवर दोघे आपण
तू तिकडे अन्‌ मी इकडे
वाऱ्यावरती जशी चुकावी
रानपाखरे दोहिकडे


दिवस मनाला वैरि भासतो
तारा मोजित रात गुजरितो
युगसम वाटे घडीघडी ही
कालगती का बंद पडे ?


वसंतासवे धरा नाचते
तांडव भीषण मज ते गमते
गजबजलेल्या जगात जगतो
जीवन एकलकोंडे


नि:श्वसिते तव सांगायाला
पश्चिमवारा बिलगे मजला
शीतल कोमल तुझ्या करांचा
सर्वांगी जणु स्पर्श घडे

स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते
प्रीतपाखरू तुझ्याच भवते
मुक्या मनाचे दु:ख सागरा
सांग गर्जुनी तू तिकडे

तोच असे मी, घर हे तेही
तोच सखी, संसार असेही
तुझ्यावाचुनी शून्य पसारा
प्राण तिथे अन्‌ देह इथे

दोन घडीचा डाव,Don Ghadicha Daav

दोन घडीचा डाव
याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण
खेळ खेळु या सारे आपण
रंक आणखी राव

माळ यशाची हासत घालू
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव

मनासारखा मिळे सौंगडी
खेळाला मग अवीट गोडी
दुःखाला नच वावदो नयनांचे हितगुज झाले,Do Nayananche Hitguj Jhale

दो नयनांचे हितगुज झाले
तुला समजले मला उमजले

क्षणभर गेले तेज लकाकुन
अंतरातला कणकण उजळून
गात्रागात्रांतुनी निथळले

स्वप्नांनी आकार घेतला
मौनांतुन हुंकार उमटला
शब्दांना माधुर्य गवसले

दोन मनांचे झाले मीलन
खुले जीवनी नवीन दालन
त्यात चांदणे धुंद पहुडले

अंतर्यामी येत कोरिता
मरणाला जे न ये चोरिता
काही तरि जे जगावेगळेदो दिसांच्या संगतीची,Do Disanchya Sangatichi

का असा गेलास तू ? ना बोलता ना सांगता
दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता ?

भावमाला लोपल्या ओठिंच्या ओठीच का ?
फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का ?
पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता !

दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरे ?
ये पुन्हा ये राजहंसा, पंखि जीवा झाक रे !
हाक मारू मी कशी रे, गूज फुटते बोलता !

ठाऊका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
गे उदारा, राजसा रे, आसरा दे मागता !

दैव जाणिले कुणी,Daiv Janile Kuni

दैव जाणिले कुणी ? हो, दैव जाणिले कुणी ?
लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी

मृग सोन्याचा जगी असंभव
तरीहि तयाला भुलले राघव
श्रीरामाला चकवून गेल्या, शक्ती मायाविनी

आपद मस्तक विशुद्ध सीता
पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी

राजपुत्र जे नृपती उद्याचे

शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्‍नकंदुका जागी हाती, मातीची खेळणीदैव किती अविचारी,Daiv Kiti Avichari

दैव किती अविचारी
उधो ! जीवनगति ही न्यारी !

शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळतनु अंधारी;

कृष्णलोचने सुंदर हरिणे
वनि वनि भ्रमति बिचारी !

मूर्ख भोगितो राजवैभवा
पंडित फिरत भिकारी;

सूरदास विनवितो प्रभूला
क्षणक्षण हो जडभारी !

देहाची तिजोरी,Dehachi Tijori

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिति चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राऊळाचा, मला तो कळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्या सौख्याचाही करील तो हेवादेह शुद्ध करुनी,Deh Shuddha Karuni

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।

सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

म्हणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

देह मंदिर चित्तमंदिर,Deh Mandir Chitta Mandir
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खिताचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

देह देवाचे मंदिर,Deh Devache Mandir

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥

देह जावो अथवा राहो,Deh Javo Athava Raho

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥

चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥

नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥

देशिल का रे मजला क्षणभर,Deshil Ka Re Majala

देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर

मधुर फळांवर मोहरलेली
पर्णांतरी ही पल्लवलेली
चुंबीत राहीन लज्जीत लाली
तुझ्यासवे मी वृक्षलतेवर

तव स्पर्शाने पुष्पकवीणा
भाव मधुर ही सुस्वरताना
हास्य सुगंधीत सख्या मोहना
उधळीत राहू गीत फुलावर

दमयंतीच्या प्रेमळ दूता

पंख तुझे ते मला लाभता
प्रिया भेटण्या ही आतुरता
घेत भरारी बघ वायुवर

देश हीच माता,Desh Heech Mata

देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हा जात गोत नाही

मुले माणसाची आम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञानविज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न आम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हा यशोदाता

देश हा देव असे माझा,Desh Ha Dev Ase Majha

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातुन तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची भरुनी ओंजळ
प्राणज्योतिने ओवाळिन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होइल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजादेवापुडं मानूस पालापाचोळा,Devapudha Manus Pala

आरं आरं मानसा, तू येडा का खुळा रं ?
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

घडीभरी न्हाई कोनाचा भरोसा

तुला कोन देई मनाचा दिलासा ?
वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांगळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रंसाऱ्या दुनियेचा देव जन्मदाता
आम्ही बनवितो त्यास भगवंता
देवाघरी मानसाचा न्याय आंधळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

मीठ-साखरेचं रूप जरी गोरं
एक होई गोड, एक होई खारं
दुधासंगं दोघांचा बी, धर्म येगळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

नको अभिमान, नको ही निराशा
जल्माचा जुगार, नशिबाचा फासा
हिम्मतीनं होई तुजा, मार्ग मोकळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

ऊस पिळीतो पिळीतो, रस गळीतो गळीतो
तहानल्या जीवा तुला, गारवा मिळीतो
म्हनू नको शिक्शा ही, सत्याची परक्शा ही

अमृताचं रूप घेई, रस पिवळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

देवाघरच्या फुला,Devagharachya Phula

देवाघरच्या फुला सोनुल्या, देवाघरच्या फुला !

अपुले मंगल सांगत नाते बाळ घरी हे रांगत येते
आनंदाने हसत खेळतो, झुलवित वारा झुला !

दुडुदुडु धावत हसे चिमुकला, असा जिवाचा माझा छकुला
अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला !

मायपित्याने तुला सोडिले, हृदयाने मम जवळ घेतले
भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला !

देवाघरचे ज्ञात कुणाला,Devagharache Dnyat Kunala

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम ?
कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम

मी निष्कांचन, निर्धन साधक
वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम?

देवाचिये द्वारीं उभा,Devachiye Dwari Ubha

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।

पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥


ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥

देवा मला रोज एक अपघात,Deva Mala Roj Ek Apaghat

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर !

कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर !

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये कुठे असतो असर !

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला ?"
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर !

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय ? पडे जगाचा विसर !

देवा बोला हो माझ्याशी,Deva Bola Ho Majhyashi

देवा बोला हो माझ्याशी
तुम्हीच मजवर रुसल्यावरती
बोलू मी कोणाशी ?

देह वाहिला तुमच्या पायी

जिवाशिवाची आशा नाही
कानी पडतिल बोल प्रभूचे
आशा हीच उराशी

तुम्हीच मजला बोल शिकविले

आज मौन का तुम्ही घेतले
बोल शिकवुनी माय अबोला
धरिते काय पिलाशी ?

बोलायाचे नसेल जर का

बोलु नका, पण इतुके ऐका
कमलाक्षातुन कटाक्ष फेका,
मजवरती अविनाशी

देवा धरिले चरण,Deva Dharile Charan

देवा धरिले चरण ।
भक्ति सुगति जगि मजला ।
भाव बोल सुचवि कोण ?
सकल तुज विभो मान ॥


सान थोर जीवांसि ।
रक्षितोसि हृषिकेशी ।
अचल तुझ्या पदी दीन ।
भय नुरवी होत लीन ॥

देवा दया तुझी की,Deva Daya Tujhi Ki

देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला !

भाळावरी बसे या निष्ठूर ही कुठार
घावांतुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा त्या अमृतात न्हाला

माझ्या मुलास लाभे सुख छत्र रे पित्याचे
ही प्रीतिची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे ?
जे नामशेष झाले ते काय साठवावे ?
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला ?

देवा तुझी आठवण होते,Deva Tujhi Aathavan Hote

देवा तुझी आठवण होते
सुख मावळते आणि शिरावर संकट कोसळते

सुंदर सुमने मुकती प्राणा उरात घुसती काटे
आग धगधगे वरती-खाली वाळवंट रखरखते

दुबळ्या जीवा कळे न जेंव्हा काय खरे अन्‌ खोटे
पिचते अंतर अन्‌ रक्ताचे पाणी-पाणी होते
केवळ ढळढळ अश्रू ढाळणे हेच नशिबी येतेदेवा तुझे किती सुंदर,Deva Tujhe Kiti Sundar

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर, असशील

देवरूप होऊ सगळे,Devroop Hou Sagale

देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे

सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची, युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पाचामुखी ईश्वर बोले

भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवून पंखी, एकरूप पक्षी झाले
गळ्यामधे घालुनी गळे, मृत्युलाच मारून गेले

वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जिवा, अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा, एकलक्षी लावुनी डोळे

देवमानुस देवळात आला,Devmanus Devalat Aala

धरमशाळंचं देऊळ झालं, चिमित्कार झाला
देवमानुस देवळात आला !

या उजाड माळावरती, माझ्या देवानं केली पिरती
फुलबागेचं रूप पाहुनी, हरपून जीव गेला
देवमानुस देवळात आला !

गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात
दळिंदराच्या अंगावरती, किरणांचा शेला
देवमानुस देवळात आला !

वस्तीवाडी ही खुळी झोपडी, मायलेकरं ही येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा, उद्धार लई केला
देवमानुस देवळात आला !

देवतुल्य बाबा माझे,Devatulya Baba Majhe

देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई
पुजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही

पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योती
लावुनिया पावन होतो चरणधूळ माथी
सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई

शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम
वचन सत्य बोलायाचा असे नित्य नेम
भल्याबुऱ्या परिणामांचा खेदखंत नाही


नभाहून मोठी माया, हृदय सागराचे
समाधान खेळे सदनी शांति-वैभवाचे
प्रपंचात राहूनीया सत्वशील राही

देवता कामुकता रहिता,Devata Kamukata Rahita

देवता कामुकता रहिता । कां न होय कार्य वरद ॥

जी रुसते प्रेमलता । शांतकाल पाहता । कालगुणे कठिण बने ।
धांवे निजबले परि हरि भया । निरामया करित ॥

देव माझा विठू सावळा,Dev Majha Vithu Savala

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा

विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा


भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा

देव माझा निळा निळा,Dev Majha Nila Nila

देव माझा निळा निळा, डोळे माझे निळे
माझा समुद्रही निळा, आभाळही निळे

श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या
तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे

अश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्या
नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे

फूलवेड्या वसंताची चाहूल लागली
निळ्यानिळ्या फुलांवरी पाखरू ये निळे


कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी ?
श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे

देव देव्हाऱ्यात नाही,Dev Devharyat Nahi

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरूनिया राही


देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

देव जरी मज कधी भेटला,Dev Jari Maj Kadhi Bhetala

देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला


कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवु दे तुजला


शिवरायाच्या मागिन शौर्या, कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा, लाभु दे चिमण्या राजालादेते तुला हवे ते,Dete Tula Have Te

देते तुला हवे ते, देते दहा दिशा रे
नेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे

हे मेघ घेउनी जा जे कोष अमृताचे

हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रे
जा चंद्र घेउनी हा मज वाट दावणारा
संपेल चांदणीचा अभिसार हा कसा रे ?

घे अंग कांचनाचे, घे रंग कुंतलांचे
हृदयांत या सलू दे दु:खाचिया कुसा रे
घे एवढे सभोवती मी राहणार नाही
होईन अमर परि मी पिऊनी अशा विषा रे

देते कोण देते कोण,Dete Kon Dete Kon

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग

पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देते कोण देते कोण देते कोण देते ?

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देते कोण देते कोण देते कोण देते ?

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि अळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देते कोण देते कोण देते कोण देते ?

आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
भुईतून येतो तरी नितळ हा झरा
चिखलात उगवून तांदूळ पांढरा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

मुठभर बुल्बुल, हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे का रे दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

भिजे माती आणि तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर पुढे दहा फाटे
देते कोण देते कोण देते कोण देते ?

देतसे बहु उत्साह मना,Detase Bahu Utsah Mana

देतसे बहु उत्साह मना
विमल हिचा हर्षातिरेक नवचि जीवना ॥

निर्मल मंगल पावन पुण्यद ।
जे त्रिभुवनि तद्भवन सतीमन ।
प्रसाद त्याचा जनि करि न काय ॥

देखावे बघण्याचे वय,Dekhave Baghanyache Vay

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

देखावे बघण्याचे वयनिघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
का हा आला वसंत
हाय्‌, फुले टिपण्याचे वय निघून गेले

देऊळातल्या देवा या हो,Deulatlya Deva Ya Ho

देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी

अंगण देवा प्रकाश उजळे, येथे कीर्तन गायन चाले
रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी

बघ येती या संत विभूती, समचरणावरी ठेउनी भक्ती

हरिनामाची होत आरती, पाही सोहळा बाहेरी

मी तर आले स्वये न्यावया, भक्ताची ही वेडी माया
स्वये निघावे दर्शन द्याया, टाळ चिपळ्या झंकारती

दे हाता या शरणागता,De Hata Ya Sharanagata

दे हाता या शरणागता ॥
मदविलासित नदगता पंकयुता मुखमलिना धना हो त्राता ॥

संपदा चपलचरणा । आपदा भोगि नाना । परत ये पद्मसदना ॥
कुवलय तव मुख तिला; अजि कमला विनवि तुला, मला घे आतां ॥

दे साद दे हृदया,De Saad De Hridaya

दे साद दे, हृदया
जन्मांतरींचा ध्यास हो, हृदया

तृष्णेचा घट हा, धन हे माझे;
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया

जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया

जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया

दे रे कान्हा चोळी,De Re Kanha Choli

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किसनाने भुलविल्या यमुनेवर गौळणी

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी

बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?

ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती, मदनाची लालडी?

तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना, शरणागत बापुडी !


हात जोडिता बंधन तुटले
अता जिवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला, अर्पण केली कुडी !दे मला गे चंद्रिके,De Mala Ge Chandrike

दे मला गे चंद्रिके, प्रीती तुझी
रानहरिणी, दे गडे भीती तुझी

मोहगंधा पारिजाता सख्या
हासशी कोमेजता रीती तुझी

तुज कळंका छेदिता जीवनी
सुस्वरे जन भारिते गीती तुझी

सोशितोसी झीज कैसी चंदना
मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी

दे मज देवा जन्म हा,De Maj Deva Janma Ha

दे मज देवा, जन्म हा ।
भासे जरी मी पतिता कुणा ॥

असुनि कलंकित अंतरि अपुल्या
मिरविती कां हे व्यर्थचि कुलशिला ॥

दे चरणि आसरा,De Charani Aasara

दे चरणि आसरा, देवा
नाहि तुझ्याविण थारा दुसरा
कटु संसार असार-पसारा
दे चरणि आसरा

मी अजाण रे बालक दुर्बल
थोर परि मनी भक्तिभाव-बल
जपत रुचिर तव नाम सुमंगल
वितरी चिरसुखशांति अंतरा

दे रे कान्हा चोळी,De Re Kanha Choli

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किसनाने भुलविल्या यमुनेवर गौळणी

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी

ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग

गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी

बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?

ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती, मदनाची लालडी ?

तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना, शरणागत बापुडी !

हात जोडिता बंधन तुटले
अता जिवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला, अर्पण केली कुडी !दे मला गे चंद्रिके,De Mala Ge Chandrike

दे मला गे चंद्रिके, प्रीती तुझी
रानहरिणी, दे गडे भीती तुझी

मोहगंधा पारिजाता सख्या
हासशी कोमेजता रीती तुझी

तुज कळंका छेदिता जीवनी
सुस्वरे जन भारिते गीती तुझी

सोशितोसी झीज कैसी चंदना
मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी

दे मज देवा जन्म हा,De Maj Deva Janma Ha

दे मज देवा, जन्म हा ।
भासे जरी मी पतिता कुणा ॥

असुनि कलंकित अंतरि अपुल्या
मिरविती कां हे व्यर्थचि कुलशिला ॥

दे कंठ कोकिळे मला,De Kantha Kokile Mala

मूर्तिमंत भगवंत भेटला
दे, कंठ कोकिळे मला

मधुमास जीवनी आज अचानक आला
आम्रतरु मोहरला

पर्णपाचूच्या पडद्याआडून
भक्तिभाव हासला

या अभागिनीने, प्रसन्न प्रभुला
या नयनी पाहिला
कृपा तयाची मिळता मजला
भाग्य अर्पिते तुला

दूर व्हा सजणा येऊ नका,Dur Vha Sajana Yeu Naka

दूर व्हा सजणा येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

भिंतीला कान या बोलू नका बाई
नजरेनं सांगा हितगूज काही
धरु नका हात माझा पिचतील ना चुडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

लालरंगी फूल तुझ्या गालावरी फुले
पहिली वहिली लाज माझी पाकळीत खुले
बघु नका डोळियांत पापणी ही उडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

पाठमोरी नागीन ही केसाळ काळी
चाफ्याच्या मोहानं धुंदफुंद झाली
नका येऊ मागेमागे येऊ नका पुढे
मन माझे सजणी तुजवरी जडे

गोड तुझी मूर्त अशी एकदाच पाहू दे
पाहू नको मोहुनीया सोड मला जाऊ दे
बंडखोर पदर तुझा सोडू कसा गडे
मन माझे सजणी तुजवरी जडे

दूर राहुनी पाहु नको रे,Dur Rahuni Pahu Nako Re

दूर राहुनी पाहु नको रे,
प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे,
प्रिया जाऊ नको रे

कसा इशारा तुला कळेना
शब्द मिळाले सूर जुळेना
कळली तुझी कला
घे ना जवळ मला
नखऱ्याचा रंग मला दावू नको रे,
प्रिया जाऊ नको रे

अवती भवती बहर फुलांचा
भ्रमर लुटेना थेंब मधाचा
लाजे कळी कळी

गाली पडे खळी
फिरवून पाठ असा जावू नको रे
प्रिया जाऊ नको रे

भाव मनीचे जाणुन घ्यावे

दोन जीवांचे धागे जुळावे
सांगू कशी तुला
माझ्या प्रीत फुला
हुरहुर आज अशी लावू नको रे
प्रिया जाऊ नको रे

दूरदेशी गेला बाबा,Dur Deshi Gela Baba

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभर दमवला
"आता पुरे ! झोप सोन्या.." कुणी म्हणतच नाही

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही.. कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

दूर दूर चांदण्यात मी,Dur Dur Chandanyat Mi

दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो !
तारकांस हालचाल मी तुझी विचारतो !

वाटते कधी चुकून

भेटशील तू अजून
थांबतो पुन्हा मधून
अन्‌ उगीच सावल्यात सैरभर पाहतो !

चाललो असेच गात

ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे नभात
अन्‌ इथे फुलाफुलात मी तुलाच शोधतो !

वेड लागले जिवास

हे तुझे दिशात भास
हा तुझा मनी सुवास
आपल्याच आसवांत मी वसंत ढाळतो !

दूर कुठे राउळात दरवळतो,Dur Kuthe Raulat Darvalato

दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया !
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !

असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या !

दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही नसे, काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया !

सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे, मूक भाव लाजरा
फुलात गंध कोंदला, वाट ना उरे तया !

दूर आर्त सांग कुणी छेडली,Dur Aart Sang Kuni Chedili

दूर आर्त सांग कुणी छेडली आसावरी
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

एकाकीपण सरले
मी माझी नच उरले
भान असे हरले अन्‌ मी झाले बावरी

यमुनेचे हे पाणी
चकित होय मजवाणी
कानांनी प्राणांनी प्रशियली माधुरी

कुठुनी हे येति सूर ?
लावितात मज हुरहुर
फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी


मी मजला विसरावे
बुडुनि सुरांतच जावे
बासरी न दूर सखे, ती माझ्या अंतरी

दु:ख हे माझे मला,Dukha He Majhe Mala

आसवे डोळ्यात माझ्या, बोल हे येती मुखी
दु:ख हे माझे मला, हो सुखी, तू हो सुखी !

सूर सनई गुंफिते, फुलतात आशा अंतरी
सोनियाच्या पावलांनी येतसे लक्ष्मी घरी
धाडिते शुभकामना मी, ही जरी वाणी मुकी

मी मनाने पाहते तो मंगलाचा सोहळा
अक्षता त्या, मंत्र ते, वरमाळ ती पडते गळा
मी जरीही जाहले भाग्यास ऐशा पारखी

पावलांची सात तुजला साथ कोणी देतसे
लाजुनीया हातही हातात कोणी देतसे
त्या कुणाला यापुढे मी मागते सौभाग्य की

होम पेटे, त्यात माझा स्वार्थ सारा जाळिते
पाच प्राणांची तुला मी आरती ओवाळते
मी मनाने रंगले त्या मंगलाच्या कौतुकी

दुःख ना आनंदही,Dukha Na Aanandahi

दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा

याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती

नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना

दुभंगून जाता जाता,Dubhangun Jata Jata

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो


ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो

दुनियेच्या अंधेर नगरीचा,Duniyechya Andher

दुनियेच्या अंधेर नगरीचा न्यायच सारा उलटा
सती घळघळा रडती येथे, मजेत हसती कुलटा

चोर सोडुनि संन्याशाला सुळी चढविते जनता
इथे कोठली गरूड-भरारी, मान मिळतसे चिलटा

दीपका मांडिले तुला,Dipaka Mandile Tula

दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला, घडविला, चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ

दारी आलेल्याची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु-काऊ-चिऊ-भाऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये ! कुलदेवी !

दीनांचा कैवारी दु:खिता,Dinancha Kaivari Dukhita

दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठ्ठल साजिरा

वेदनेत जन्मे हरी, संकटात रांगे

दरिद्र्याच्या झोपडीत गीता नित्य सांगे
दलितांच्या माथा धरितो मायेचा पिसारा

शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग
घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग
ऊब देतो थंडीमाजी पिऊनी निखारा

देव नाही राऊळात, नाही त्या आकार
देव आहे तुमचा-आमुचा मानवी आचार
तापलेल्या पाऊलांना होई जो आसरा

दीनबंधु तू गोपाला रे,Deen Bandhu Tu Gopala Re

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आतादीन पतित अन्यायी,Deen Patit Anyayi

दीन पतित अन्यायी ।
शरण आले विठाबाई ॥

मी तो यातिहीन ।
न कळे काही आचरण ॥


मज अधिकार नाही ।
भेट देई विठाबाई ।

ठाव देई चरणापाशी ।
तुझी कान्होपात्रा दासी ॥

दिसं जातील दिसं येतील,Disa Jateel Disa Yeteel

तुज्यामाज्या संसाराला आनि काय हवं
तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं

घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पानी ?
राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी ?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

ढगावानी बरसंल त्यो, वाऱ्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जीवाचा त्यो आरसा असंल

उडूनिया जाईल ही आसवांची nरात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव

दिसलीस तू फुलले ॠतू,Disalis Tu Phulale Rutu

दिसलीस तू, फुलले ॠतू
उजळीत आशा हसलीस तू

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होऊनिया आलीस तू

जाळीत होते मज चांदणे जे
ते अमृताचे, केलेस तू

मौनातुनी ये गाणे दिवाणे
त्याचा अनामी स्वरभास तू

जन्मात लाभे क्षण एकदा हा
ते भाग्य माझे झालीस तू

दिसलि पुनरपी गुप्त जाहली,Disali Punarapi Gupt Jahali

दिसलि पुनरपी गुप्त जाहली प्रिया सुभद्रा घोर वनीं ।
येथें सुंदरि कैशी आली हेंचि कळेना मज अजुनी ॥


माझ्या वेषा खरें मानुनी हलधरही लागत भजनीं ।
त्रिकालज्ञ परि मोह पावले कैसे न कळे गर्गमुनी ।

कपटी कृष्णाचीही बुद्धी गेली कैशी ती भुलुनी ।
या सर्वांचा विचार करितां जातों मूढचि होवोनी ॥

दिसला ग बाई दिसला,Disala Ga Bai Disala

ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसंच्या भयाण राती
काजवा उडं, किर्किर किडं, रानात सुरात गाती

दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं ?

दिसला ग बाई दिसला
मला बघून गालात हसला ग बाई हसला

गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला

माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय्‌ कौल
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला ग बाई बाई भाला उरी घुसला

अंगा-अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा
उडंल भडका, चढंल धुंदी
जीव जीवा फसला, ग बाई बाई जीव जीवा फसलादिसते मजला सुखचित्र,Disate Majala Sukhchitra

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते !

प्रीत तुझी-माझी फुलावी या फुलत्या वेलीपरी

भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते !

हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी
तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते !

स्वर्ग मिळे धरणीस येथे रंग नवे गगनांगणी
सप्तसुर लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित मागते !दिसत न कशी ममता,Disat Na Kashi Mamata

दिसत न कशी ममता ? कवि पिता हो माता ॥

दु:खित जगासि दयार्द्रलोचन कविजन ।
विकसवि आतां नयना ।

दिस नकळत जाई,Dis Nakalat Jai

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई


असा भरून ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
जशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरून राही

दिस चार झाले मन,Dis Char Jhale Man

दिस चार झाले मन, पाखरू होऊन
पानपान आर्त आणि झाड बावरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले

वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरूनदिव्या-दिव्यांची ज्योत सांगते,Divya Divyanchi Jyot

तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न माझी प्रिती

समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लागल्या ज्योती
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती

आज उगवला दिन सोन्याचा हितगूज येई ओठी
पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी
दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी

तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया
पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया
तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती,Divyatvachi Jeth Prachiti

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती

दिव्य स्वातंत्र्य रवि,Divya Svatantrya Ravi

दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी

शौर्यसागर-लहरि गगन-मंडळ महा

भेदिता कवण त्या अबल कर थोपवी ?

दिवे लागले रे दिवे,Dive Lagale Re Dive

दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना

उरी गंध कल्लोळुनी फाकले

उभ्या रोमरोमातुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्‌
उषासूक्त ओठांत ओथंबले

दिवाळी येणार अंगण सजणार,Diwali Yenar Angan Sajnar

दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

देवापाशी मागेन एकच दान
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट
नको करू ताटातूट
चंद्र ज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

दिवा लाविते दिवा,Diva Lavite Diva

नवीन आले साल आजला
उजेड पडला नवा,
दिवा लाविते दिवा

घरी पाहुणे आले मामा
धरणीच्या घरी जसा चंद्रमा
अंधाराला येई उजाळा,
थंड सुवासिक हवा

दिव्या-दिव्यांच्या लावून ओळी
करिन साजरी आज दिवाळी
आकशीही दिवा चढविला,
आभाळा दे दुवा

लाख दिव्यांनो उजेड फेका
अंधाराचा उरो न ठिपका
कोना कोना आज उजळु द्या,
इडापिडा शांतवा

दिवसभर पावसात असून,Divasbhar Pavasat Asun

दिवसभर पावसात असून, सांग ना आई
झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई
वारा कसा जराही दमत नाही ?

रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई
बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?

रात्रभर जागून सुद्धा, सांग ना आई
चांदोबा झोपी कसा जात नाही ?

दिवसभर काम करून, सांग ना आई
तुला मुळी थकवा कसा येत नाही ?

दिवस तुझे हे फुलायचे,Divas Tujhe He Phulayche

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे
वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे

मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे

माझ्या या घरच्यापाशी
थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे

दिवस आजचा असाच गेला,Divas Aajacha Asach Gela

दिवस आजचा असाच गेला उद्या तरी याल का ?
राया अशी, जवळ मला घ्याल का ?

पैठणी जांभळी जरीबुंद नेसुनी
मी वाट पाहते केव्हाची बैसुनी
ही घडीमागुनी घडी जातसे सुनी
जागरणाने जळती डोळे काजळ घालाल का ?

किती किती योजिले होते बोलायचे
मज गूज मनीचे होते खोलायचे
संगतीत तुमच्या होते उमलायचे
कळ्या आजच्या शिळ्या उद्याला ओठाशी न्याल का ?

या सरत्या राती तळमळते मी अशी
लोळते पलंगी पुन्हा बदलते कुशी
मज रुते बिछाना, नको नको ही उशी
हवा वाटतो हात उशाला सजणा तुम्हि द्याल का ?
आल्यावरी, जवळ मला घ्याल का ?

दिवस असे की कोणी माझा,Diwas Ase Ki Koni Majha

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कोणाचा नाही .....

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही ! .....


प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे;
परि मजला गवसत नाही .....

मी तुसडा की मी भगवा बैरागी ?
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी ?
अस्तित्वाला हजार नावे देतो;
परि नाव ठेववत नाही .....

डोळ्यांमधुनी भिरभिर बघतो सगळे
निरर्थकाचे खेळ चालले नकळे !
बघता बघता पाणी दाटून येते;
त्या अश्रू म्हणवत नाही .....

मम म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही .....

दिल्याघेतल्या वचनांची,Dilya Ghetalya Vachananchi

दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे

बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात
त्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे

शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"
फुलांतल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे

भुरभुरता पाउस होता सोनिया उन्हात
गवतातुन चालत होतो मोहुनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटुनि येती असे अंतरंगी
या उदास आभाळाची शपथ तुला आहे

दिल्या तरुणां तरि होति,Dilya Taruna Tari Hoti

दिल्या तरुणां तरि होति किती रंडा ।
जरठ पतिही किति बघति नातवंडा ।
सौख्य संतति सौभाग्य देव देई ।
आम्हां हातीं त्यांतील कांहि नाहीं ॥

दिलवरा दिल माझे ओळखा,Dilvara Dil Majhe Olakha

राम राम घ्या, दूर करा जी भवतीचा घोळका
दिलवरा, दिल माझे ओळखा !

( प्राण प्रियकरा, अरे दिलवरा, राज‍अंबिरा )
दिलवरा दिल माझे ओळखा !

बांधला बादली साफा जरी मी वरुन
रुळतात केस हे कुरळे भाळावरुन
बघताच तुम्हाला डोळे आले भरुन
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

ही पैरण मेली चोळीहुन काचली
हलचाल कटीची शेल्याने जाचली
पाऊले महाली कशीबशी पोचली
सोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळ का ?
दिलवरा दिल माझे ओळखा!

तुजसाठी दौड मी केली घोड्यावरुन
मर्दानी वेष हा दुनियेसाठी करुन
चोरूनि निघाले रात्री माझ्या घरून
एकांती मज घेई जवळी सख्या, असा वेळ का ?
दिलवरा दिल माझे ओळखा !दिलवर माझा नाही आला,Dilvar Majha Nahi Aala

दिलवर माझा नाही आला
चांद चवथीचा मावळला

किती समजावू विकल मनाला
मन समजावी फिरुनी मजला
आणि घालुनी गळ्यांत गळा
अश्रुफुलांच्या गुंफित माळा

उभी लोचनी व्याकुळलेली
अधीरताही शिणली थकली
वाट बघुनिया नीज निजली
पापणीच्या पायतळाला

नयन कवाडे उघडी अजुनी
कशी घेउ मी बंद करुनी
त्रिभुवन धुंडुन नजरा परतुनि
येतिल जर का घेउन त्याला

दिलरुबा मधुर हा दिलाचा,Dilaruba Madhur Ha Dilacha

दिलरुबा मधुर हा दिलाचा ।
छेडित राग गोड प्रीतिचा ॥

करित साथ संसार-संगीता ।
नाद सुखद तव हृदयाचा ॥

दिनरात तुला मी किती,Dinrat Tula Mi Kiti

दिनरात तुला मी किती स्मरू
जन हसती मला मी काय करू ?

भरल्या नयनी हात जोडुनी
सांगु कुणाला काय म्हणोनी ?
काहुर मनिचे येता दाटुनि
माझि मला मी कशी सावरू ?

कितीकदा मज बघुनी कष्टी

जे येती ते वेडी म्हणती
मुग्ध कळीपरि मिटल्या ओठी
ध्यानि मनी मी अशि किती झुरू ?

निराधार मी धुळीस मिळुनी
गेले वेढुनि चहु बाजूनी
खिन्न जगी या बंदीवान मी
तुला नव्हे तर कुणा विचारू ?

दिन तैसी रजनी झाली गे,Din Taisi Rajani Jhali Ge

दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥

पडीले दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥

अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥

गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरू श्रीविठ्ठला ॥४॥

दिन गेले भजनाविण सारे,Din Gele Bhajanavin Sare

दिन गेले भजनाविण सारे

बालपणा रमण्यात गमविला
यौवनात धन-लौकिक प्यारे


मोहापायी मूळ हरपले अजुनी शमेना तृष्णा का रे
म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ,Digambara Shripad Vallabha

दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो
दत्तगुरूंचे भजन करा

हे नामामृत भवभयहारक
अघसंहारक त्रिभुवनतारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हाति धरा

दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे
कळिकाळाचे भय न जरा

हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता
योगज्ञान-उद्गाता, त्राता
दत्तचरित मधु गाता गाता
भवसागर हा पार करा

दासी ऐसें मानुनियां,Dasi Aise Manuniyaa

दासी ऐसें मानुनियां कार्य मला सांगतसे ।
सुदिन काय उगवला आज मनीं वाटतसे ॥

मधुर जातिसुमनांचा वास यास येत असे ।
यौवनभर म्हणुनि याचा खास अजुनि पूर्ण असे ॥

दावा नयनी यशोदेचा,Dava Nayani Yashodecha

दावा नयनी यशोदेचा सुकुमार

मस्तकी मुकुट, कानी कुंडल शोभे
गळा वैजयंती हार

सावळी तनू कटी पीत वेष लागसे
रूपसुंदर अनिवार

माणिक याचा प्रभु नाटकी गिरीधारी
करी दुष्ट संहार

दारुणा स्थिती,Daruna Sthiti

दारुणा स्थिती । ती जाचि तयांप्रती ॥

प्रियजनपक्षा स्वीकारावे । न तरी मुख पुढती ॥


प्रतिपक्षाते मिळता न मिळे । अंगा स्पर्श रती ॥

दारीच्या देवळीत जळो पणति,Darichya Devalit Jalo Panati

दारीच्या देवळीत, जळो पणति सारि रात
प्रगटले न अजुन कांत, अंधकार अंतरात

रात्रंदिन वाट बघत, घालुनी पळी कडीत
येइ ना अजून मूर्त, माघारी मंदिरात

रांगोळी अंगणात, अश्रुबिंदु घालतात
गाल ओठ भिजुन जात, ओघळत्या काजळात

वृंदावनि सांजवात, नि:श्वासे विझुन जात
तुळशिच्या प्रदक्षिणांत, चर्र होत काळजात

नाथांची झालि साथ, फक्त सात पावलात
आज ऊर-तारु फुटत, विरहाच्या वादळात

कुंकवाच्या कोयरीत, रोज थबकतोहि हात
वैरी जे जे न चिंति, ते ते ये मनात

दारीच्या देवळीत, उजळवली कुणि ग वात ?
इश्श ते, तेच कांत, प्रगटले प्रकाशात

दास्यमुक्ति-संगरात, विजयी झालेहि कांत
मजसि मात्र अडवितात, प्रीतीच्या शृंखलात

दारा बांधता तोरण,Dara Bandhata Toran

दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले

भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली

सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी

भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशिर्वाद केळ म्हणाली हासून


येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी

सोनचाफ्याची पाउले आज आलीत अंगणी

दामिनी,Damini

दामिनी ..... दामिनी ....

सत्यता शोधण्या घेउनी लेखणी
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी
दामिनी ..... दामिनी ....

प्रेम, दया-माया मनी न्यायदेवताही
वादळास तुडवीत जाई धीर जगा देई

दु:खिता सावली देत ही स्वामिनी
दामिनी ..... दामिनी ....

दाम करी काम येड्या,Daam Kari Kaam Yedya

बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वाणी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे

पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय्‌ झेप, पैशाच्या मागूनी धाव
जल्मापासनं सारी माणसं ह्या पैशाची गुलाम रे

कुनी जुगार सट्टेबाज कुनि, कुनि खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनि घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला, फेकला त्यानं लगाम रे

ह्या कवडी दमडी पाई, कुनि राकूस घेई जीव
कुनि डाका दरोडा घाली, कुनि जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शिरिमंतीनं, हातात नाही छदाम रे

वाड्यात पंगती बसल्या लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन, कुनी टिपावा घाम रे

नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खुस, पैशानं बोलते पिरती
ह्या पैशाच्या बादशहाला, दुनिया करते सलाम रे

दान देवूनी सर्वस्वाचे,Daan Deuni Sarvasvache

दान देवूनी सर्वस्वाचे, कुबेर मी अंतरी
प्रीतीची रीतच ही न्यारी

मम हाताचा करीन कणा मी
जशी कैकयी रणसंग्रामी
दो हातांनी कष्ट उपसता, गोडी संसारी

वनात जैसी सीतामाई
रामरूप ती हो‍उन राही

पतीसंगती पुष्पताटवे कुंपण काटेरी

मनी जागवीन सावित्रीला
परतुन लावीन यमदूताला
पतीप्रेमाहुन दुजे न मोठे भरल्या संसारी

दान करी रे,Daan Kari Re

दान करी रे गुरूधन पावन ।
श्रेयभाग जाण हा कुठुनि तुजसी लाभला ॥

देत हात तोच घेत ।
सांगतसे तानसेन ।
जात न शिव विलयाला ॥

दादाचं घर बाई उन्हात,Dadacha Ghar Bai Unhat

तुझी नी माझी गंमत वहिनी, ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या ग, दादाचं घर बाई उन्हात

उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग
तुला चिडवतो मला रडवितो, आणिक हसतो गालात

खेळ मला ग आणी ना, साडी तुजला देईना
ऐट दाखवी वरती आणिक , सदाच तो अपुल्या तोऱ्यात

वहिनी का ग हिरमुसली? नको ग का शिक्षा असली ?
फितूर होशिल दादाला, ही शंका येते मनात

दादला नको ग बाई,Dadala Nako Ga Bai

बया बया बया !
काय झालं बया ?

दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई !
( अग पर असं का ? )

मोडकंच घर, तुटकंच छप्पर
( मग असं ना ! )

अवं मोडकंच घर अन्‌ तुटकंच छप्पर
( मग ऱ्हा की त्यात ! )

अवं पन ऱ्हायाला घरंच नाही
मला दादला नको ग बाई !


फाटकंच लुगडं तुटकीच चोळी
( अग ती तरी कुठं मिळती ? )

अवं फाटकंच लुगडं अन्‌ तुटकीच चोळी

( मग शिऊन घे की )

पण शिवायला दोरा न्हाई
मला दादला नको ग बाई !

कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
( अग ती तर लई ग्वाड वाटती )

अवं कळण्याची भाकर अन्‌ नुसतीच अंबाड्याची भाजी
( मग काय झालं त्यात )

वर तेलाची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !

एका जनार्दनी समरस झाले
( अग झालीस न समरस )

पण तो रस येथे न्हाई
मला दादला नको ग बाई !

नगं, नगं, नगं !
का ग बाई, का ग बाई, का ग बाई ?दाटे कंठ लागे,Date Kantha Lage

दाटे कंठ लागे डोळियां पाझर ।
गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥

तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा ।
होऊनि निराळा पापपुण्यां ॥२॥

तुझ्या मोहें पडो मागील विसर ।
आलापें सुस्वर करिन कंठ ॥३॥


तुका म्हणे येथें पाहिजे सौरस ।
तुम्हांविण रस गोड नव्हे ॥४॥

दाटून कंठ येतो,Datun Kanth Yeto

दाटून कंठ येतो ओठांत येइ गाणे
जा आपुल्या घरी तू जा, लाडके, सुखाने !

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी या गोड आठवाने !

बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

घेऊ कसा निरोप ? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे !
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

दाटला चोहिकडे अंधार,Datala Chohikade Andhar

दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार

आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध, ती मृगया भीषण
पारधींत मी वधिला ब्राम्हण
त्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार

त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानीं
यमदूतांचे शंख हो‍उनी
त्याच्यासम मी पुत्रव्योगें तृषार्तसा मरणार


श्रीरामाच्या स्पर्षावाचुंन
अतृप्तच हें जळकें जीवन
नाहीं दर्शन, नच संभाषण
मीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार

मरणसमयिं मज राम दिसेना
जन्म कशाचा ? आत्मवंचना
अजुन न तोडी जीव बंधना
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे दार?

कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदनसुधाकर

फुलेल का या गाढ तमावर?
जातां जातां या पाप्यावर फेकित रश्मितुषार

अघटित आतां घडेल कुठलें?

स्वर्गसौख्य मी दूर लोटले
ऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,
भाग्यासह तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार


पाहतील ते राम जानकी
देवच होतिल मानवलोकीं
स्वर्गसौख्य तें काय आणखी?
अदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार?

क्षमा करी तूं मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती उर्मिले
क्षमा प्रजाजन करा, चाललों सूखदःखांच्या पार

क्षमा पित्याला करि श्रीरामा
पतितपावना मेघश्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार

श्री राम-श्री-राम-रा-म

दाटतो हृदयी उमाळा,Datato Hridayi Umala

दाटतो हृदयी उमाळा खोल फुटतो हुंदका
प्राण कंठी येति तरिही ओठ माझे बंद का?

मिटुन ओठ कुठवर मी मूक अता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा
नाकारित माझे मज कोठवरी राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी
रात्रंदिन सलत व्यथा, सांग, कशी साहू ?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

कोसळु दे नभ माथा, कोसळो धरा ही
तुजपासून दूर अता राहणार नाही
तुटलेला पाश पुन्हा जोडुनिया घेऊ
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

दळिता कांडिता,Dalita Kandita

दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥


नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥४॥


लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

दहा वीस असती त्या रे,Daha Vees Asati Tya Re

दहा वीस असती त्या रे, मने उद्धवा !
एक मात्र होते ते मी दिले माधवा

पाच इंद्रियांचा मेळा दास त्या मनाचा
तना-मना एकच माझ्या ध्यास मोहनाचा
कुणितरी मेघःश्यामा इथे आणवा

नसे देव ठावा मजला, राव द्वारकेचा
बाळकृष्ण ओळखते मी, सखा राधिकेचा
फेर धरा यमुनातिरी, गोप नाचवा

एक स्पर्श व्हावा, यावा, वास कस्तुरीचा
एक हाक द्यावी प्यावा सूर बासरीचा
लोचनांस माझ्या यावा पूर आसवां

दहन खर हृदया,Dahan Khar Hridaya

दहन खर हृदया । महाघोर रणरणक करित कृष्णासि ।
बहु आकुल भावमा सभय ॥

आधार विश्वासि । मंगल सांधनासि ।
विकृत होतां तथा । आगत हा महाप्रलय ॥

Dahati Bahu Mana Nana, दहती बहु मना नाना

दहती बहु मना नाना कुशंका ॥

विपदा विकट घोर । निकटी विलोकी ।
मन कंप घेत । गणिते ना विवेका ॥

दर्शन देरे देरे भगवंता,Darshan De Re Bhagavanta

दर्शन देरे देरे भगवंता
किती अंत आता पहासी अनंता

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ति पाहिली तू गोऱ्याकुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ति विठ्ठलाची

ऐसे दान देसी तुझ्या प्रीय संता

तूच जन्मदेता तूच विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता

दशरथा घे हें पायसदान,Dasharatha Ghe He

दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलें हा माझा सन्मान

तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान

श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान

राण्या करितिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान

प्रसवतील त्या तीनहि देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान

कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान

दशदिशांस पुसतो,Dashdishas Pusato

दशदिशांस पुसतो, पुसतो वेड्या नभा
ती कुठे राजसा माझी प्रियवल्लभा ?

क्षण दिसली, लपली फिरुनी मृगलोचना
का करिसी दैवा क्रूर अशी वंचना ?
ते स्वप्न संपले, स्तिमित इथे मी उभा !

मज क्षणाक्षणाला रूप तिचे भासते
छळतात जिवाला दाहक आभास ते
तिमिरांध सूर्य मी शोधित फिरतो प्रभा !

दर्यावरी रं तरली होरी,Daryavari Ra Tarali Hori

दर्यावरी रं तरली होरी रं
तुझीमाझी जोरी बरी
साजणा होरीतून जाऊ घरी

पान्यावानी पीरत तुझी

झाला माझा जीव राजी
धावलं, मन येड्यापरी
मायेच्या रं घराच्या या वाटंवरी
साजणी आता नको जाऊ दुरी

मासोलीचं डोलं तुझं
जाल्यावानी मन माझं
घावलं, परडी भरली
गोमुच्या ग पिरतीच्या मासोलीनं
साजणा जाऊ नको दुरी

शिडातुनी आयला वारा
होरीला गो न्हाई थारा
नाखवा घोर नको कालजाला
कोलीवाडा अंगाशी रं आता आयला
साजणी होरीतुनी जाउ घरी

दयाछाया घे निवारुनिया,Dayachaya Ghe Nivaruniya

दयाछाया घे निवारुनिया ।
प्रभु मजवरि कोपला ॥

जीवनासि मम आधार गुरु जो ।
तोहि कसा अजि कोपला ॥

दयाघना का तुटले,Dayaghana Ka Tutale

दयाघना,
का तुटले चिमणे घरटे ?
उरलो बंदी असा मी !

अरे, जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास
आता बंदी तुझा मी
दयाघना !

दहा दिशांची कोठडी
मोह-माया झाली वेडी
प्राण माझे ओढी
झालो बंदी असा मी
दयाघना !

बालपण उतू गेले
अन्‌ तारुण्य नासले

वार्धक्य साचले
उरलो बंदी पुन्हा मी
दयाघना !

दमलेल्या बाबाची ही,Damalelya Babachi Hiकोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरलेले तोंड; डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही,

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत,
निजेतच तरी पण येशील खुशीत

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला..
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी,
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले,
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी,
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी,
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला..
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून,
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून,
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे,
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे,
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी,
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी


दर्पणी बघते मी गोपाळा,Darpani Baghate Mi Gopala

दर्पणी बघते मी गोपाळा
साज सुगंधी करू कशाला ?

कोमल माझ्या प्रतिबिंबातुन,
बिंब तयाचे बघते न्याहाळुन
नेत्र फुलांची होता पखरण,
फुलवेणी ही घालु कशाला ?

स्वैर अजाणु पाठीवरती,
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती,
मोहबंधनी बांधु कशाला ?

भरता चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधुन पैंजण,
लोकरंजनी नाचु कशाला

दत्तराज पाहुनी आज,Duttaraj Pahuni Aaj

दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी

औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरवितसे
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी

अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी

विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी

दत्तदिगंबर दैवत माझे,Dutta Digambar Daivat

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे

त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे

त्वरा करा नाथा,Tvara Kara Natha

त्वरा करा नाथा, तुझिया नावा मळवितो राहू खरा ॥

जगविल आशा मजला नच आता, गमविता वेळ जरा ॥

त्यानीच छेडिले ग,Tyanich Chedile Ga

त्यानीच छेडिले ग, माझ्या मनी न होते
ओढून ओढणीला, दारी उभी मि होते

करपाश तोचि आले, कंठी गडे तयांचे
भारावल्या मनाने, मी ग अबोल होते

अपराध काहि नसता, शिक्षा मला मिळाली
माझ्याच मंदिरी ग, मी बंदिवान होते

दिनरात साजणाचे, बेबंद वागणे हे
असते सुखात जर का, मी बालिकाच होते

त्याची धून झंकारली,Tyachi Dhoon Jhankarali

त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत

चांदण्यांची लुकलुक झुले गगनी

बासरीने भारावून गेली रजनी
रासरंग उधळला कोनाकोनांत

दूर यमुनेच्या काठी पाय वाजले
दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे
चैतन्याचे वारे आले वाळवंटात

सावळ्याची खूण सखे, टाळी वाजली
धावू लागे मन आता आनंदमेळी
नुरले ग माझेपण माझ्या देहांत

त्यागभाग सांग,Tyagbhag Sang

त्यागभाग सांग तव दीन कोणता ? ॥

पूर्ण विरागी निजसुख भोगी ।
परानुरागी होसि देवता ।।


विश्वपित्यासी चिंता न अशी ।
गणि सृष्टीशी । तोहि भिन्नता ॥

त्या सावळ्या तनूचे,Tya Savalya Tanuche

त्या सावळ्या तनूचे
मज लागले पिसे ग
न कळे मनास आता
त्या आवरू कसे ग !

ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग !

हलतो तरू-लतांत
हा खोडसाळ वात
आलाच वाटतो 'तो'
मी सारखी फसे ग !

खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा
हृदयात जो वसे ग !

त्या व्याकुळ संध्यासमयी,Tya Vyakul Snadhya Samayi

त्या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो.


तू आठवणीतुन माझ्या
कधि रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधि असते माझ्यापाशी .....

पदराला बांधुन स्वप्ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई .....


तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा .....
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाऊस यावा !

त्या मदनमनोरमरूपीं,Tya Madan Manoram Rupi

त्या मदनमनोरमरूपीं, मन माझें गुंतुनि गेलें ।
कधिं वाहिन काया त्यासी, प्रेमें ही ऐसें झालें ॥

दिवस तो पूर्ण सौख्याचा, येइल मज कवण्या काळें ! ॥

गुणरूपचिंतनीं पाही । झोंप मज नाहीं ।
शयनिं मी निजलें । किति तरंग हृदयीं उठले ॥

त्या फुलांच्या गंधकोषी,Tya Phulanchya Gandha

त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी हो‍उनीया गीत का ?
गात वायूच्या स्वरांने, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का ?

जीवनी संजीवनी तू, माउलीचे दूध का ?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?

मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन्‌ त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?