पैठणी बिलगुनी म्हणते,Paithani Bilagun Mhanate
पैठणी बिलगुनी म्हणते मला
जानकी वनवास ग संपला
हर्षिता होऊनिया सुंदरी
वल्कले फेकुन दे तू दुरी
गोजिरा गजरा माळून शिरी
लाव तू भाळी कुंकुम-टिळा
पाहुनी रूप तुझे देखणे
जाहली लज्जित ही भुषणे
पतिप्रेमाचे उधळित हे सोने
प्रीतीचा दिवाळसण तो आला
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment