अपुरे माझे स्वप्न राहिले,Apure Majhe Swapna Rahile

अपुरे माझे स्वप्न राहिले
का नयनांनो जागे केले ?

ओळख तुमची सांगुन स्वारी
आली होती माझ्या दारी
कोण हवे हो म्हणता त्यांना
दटावून मज घरात नेले

बोलत बसता वगळुन मजला
गुपित चोरटे ऐकू कशाला ?
जाण्याचा ते करुनी बहाणा
गुपचुप माझ्या मनात लपले

नीज सुखाची तुम्हा लागली
मंद पाऊली स्वारी आली
गोड खळीने चहाडी केली
अधरासी नच बोलु दिले



अपार हा भवसागर,Apar Ha Bhav Sagar

अपार हा भवसागर दु:स्तर
तुझ्या कृपेविण कोण तरे
जय जय दुर्गे शुभंकरे !

तुझ्या कृपेने संकट टळते
तुझ्या कृपेने वैभव येते
तुझ्या कृपेने पंगू देखिल
करी उल्लंघन गिरीशिखरे !

तुझ्या कृपेचा मेघ बरसता
आशेची उद्याने फुलता
ह्या संसारी, विश्वमंदिरी
आनंदाचा गंध भरे !

दुराचार दंभाच्या नगरी

अनाचार अवसेच्या तिमिरी
त्रिशूळ तव चमकता अचानक
दुरिताचा अंधार नुरे

अपराध मीच केला,Aparadh Mich Kela

अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी !
जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी !

जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा
डोळ्यांतुनी हळू या हृदयात पाय ठेवा
बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी !

राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा
भासात गुंतवावा मी जीव का कुणाचा ?
अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली!


तू लाख पीडितांचा आधार अन्‌ विसावा
हा पोच मूढ माझ्या प्रीतीस का नसावा ?
मी संत मोहवीला जो मग्न संतमेळी !

आता पुढील जन्मी संसार मी करीन
ही स्वप्नभेट वक्षी मी तोवरी धरीन
सद्‌भाग्य हे सतीचे मिरवीन नित्य भाळी !

अपर्णा तप करिते काननी, Aparna Tap Karite Kanani

भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी !

वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी !

त्रिशूल डमरू पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यांतुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी !

कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी !



अनृतचि गोपाला, Anrutachi Gopala

अनृतचि गोपाला मृत्यू आला, यश ना शिशुपाला ॥

कटु वार्ता ती ऐकता, हृदयी बोले सखा मज ’तुजला वरियले’ ॥

अनंता तुला कोण पाहु, Ananta Tula Kon Pahu

अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो

अनंता अंत नको पाहू, Ananta Anta Nako Pahu

आलासी तू ऐकूनि धावा, काय तुला देऊ ?
अनंता, अंत नको पाहू

अतिथी अचानक आश्रमि आले, ज्या समयी नच काही उरले
तशात म्हणती भूक लागली, कशि मी समजावू ?

दहि दूध लोणी मागु नको रे, रिते घडे तुज दिसतिल सारे
धुतल्या थाळीवरी पान ते नकोस तू ठेवू

कसे मागसी इतुके देवा? मजसि गमे ना कुठला कावा
योगेश्वर तू अंतर्ज्ञानी थोरवि किति गाऊ ?



अनुबंध, Anubandh

चालले होते सुखाने, वाहे उधाण वारे
पाऊले नेती कुठे ? हे रस्ते- अनोळखी सारे
कोणता करार ज्याचे बंधन झाले...
जीवघेणा हाच बंध...
अनुबंध !



ईश चिंता निवारील सारी ,Ish Chinta Nivaril Sari

ईश चिंता निवारील सारी ।

भाव निश्चल मनें ठेविं तूं त्यावरी ॥



संकटें शत जरी प्राप्त झालीं ।

सर्व संहारुनी योग्य कालीं ।


करिल कल्याण तो चंद्रमौली ।

पूर्ण विश्वास या विप्रवचनीं धरीं ॥

इंद्रायणी काठी ,Indrayani Kathi

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

लागली समाधी, ज्ञानेशाची



ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव

नाचती वैष्णव, मागेपुढे




मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड

अंगणात झाड कैवल्याचे



उजेडी राहिले उजेड होऊन

निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई


इंद्र जिमि जंभ पर ,Indra Jimi Jambha Par

इंद्र जिमि जंभ पर,

बाढव सुअंभ पर,

रावन सदंभ पर,

रघुकुलराज है !




पौन बारिबाह पर,

संभु रतिनाह पर,

ज्यों सहसबाह पर,

राम द्विजराज है !



दावा द्रुमदंड पर,

चीता मृगझुंड पर,

भूषन वितुंड पर,

जैसे मृगराज है !




तेज तम अंस पर,

कान्ह जिमि कंस पर,

त्यों मलिच्छ बंस पर,

सेर सिवराज है !


इवल्या इवल्याशा ,Ivalya Ivalyasha

इवल्या इवल्याशा

टिकल्याटिकल्यांचे

देवाचे घर बाइ, उंचावरी

ऐक मजा तर ऐक खरी !




निळी निळी वाट

निळे निळे घाट

निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट

निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी !



चांदीच्या झाडांना सोन्याची पाने

सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे

सोन्याची केळी, सोन्याचा पेरू

सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी !




देवाच्या घरात गुलाबाची लादी

मऊ मऊ ढगांची अंथरली गादी

चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी

चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी

इवल्या इवल्या वाळूचं ,Ivalya Ivalya Valucha

इवल्या इवल्या वाळूचं, हे तर घरकुल बाळूचं

बाळू होता बोटभर, झोप घेई पोटभर

वरती वाळू, खाली वाळू, बाळू म्हणे की, "इथेच लोळू"

उन्हात तापू लागे वाळू, बाळूला ती लागे पोळू

या इवल्याशा खोपेत, बाळू रडला झोपेत !




एक वन होतं वेळूचं, त्यात घर होतं साळूचं

साळू मोठी मायाळू, वेळू लागे आंदोळू

त्या पंख्याच्या वाऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात !

एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू, भिजले वेळू

नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डाराडूर



भुर्रकन्‌ खाली आली साळू आणि म्हणाली, "उठ रे बाळू"

बाळू निजला जैसा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा

साळुनं मग केलं काय ? चोचीत धरला त्याचा पाय


वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच

बाळूचं घरकुल वाहून गेलं, साळूचं घरटं राहून गेलं !



साळू आहे मायाळू, बाळू बेटा झोपाळू

वाळू आणि वेळूवर ताणून देतो खालीवर

साळू म्हणते, "गाऊ, खेळू", बाळू म्हणतो, "इथंच लोळू."

आमची गोष्ट आखुड, संध्याच्या पाठीत लाकूड

इवल्या इवल्या वाळूचं ,Ivalya Ivalya Valucha

इवल्या इवल्या वाळूचं, हे तर घरकुल बाळूचं

बाळू होता बोटभर, झोप घेई पोटभर

वरती वाळू, खाली वाळू, बाळू म्हणे की, "इथेच लोळू"

उन्हात तापू लागे वाळू, बाळूला ती लागे पोळू

या इवल्याशा खोपेत, बाळू रडला झोपेत !




एक वन होतं वेळूचं, त्यात घर होतं साळूचं

साळू मोठी मायाळू, वेळू लागे आंदोळू

त्या पंख्याच्या वाऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात !

एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू, भिजले वेळू

नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डाराडूर



भुर्रकन्‌ खाली आली साळू आणि म्हणाली, "उठ रे बाळू"

बाळू निजला जैसा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा

साळुनं मग केलं काय ? चोचीत धरला त्याचा पाय


वेळूवरती नेले उंच आणि मांडला नवा प्रपंच

बाळूचं घरकुल वाहून गेलं, साळूचं घरटं राहून गेलं !



साळू आहे मायाळू, बाळू बेटा झोपाळू

वाळू आणि वेळूवर ताणून देतो खालीवर

साळू म्हणते, "गाऊ, खेळू", बाळू म्हणतो, "इथंच लोळू."

आमची गोष्ट आखुड, संध्याच्या पाठीत लाकूड

इवले इवले जीवही येती ,Ivale Ivale Jeevahi Yeti

लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला

इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला !



महा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला

एक छोटासा उंदीर आला,


सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला !

सिंह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने,

म्हणे चिमुरड्या, "तुला फाडतो माझ्या या पंजाने."

थरथर कापे, उंदीर सांगे, "येईन कधितरी कामाला !"

इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला !



( या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला.

तो म्हणाला, "अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस !

चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे ?


चल, चालता हो इथून."

सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?)



कधी एकदा सिंह अडकला फसुनीया जाळ्यात

वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात !

हादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे

सिंहाला तो सांगे, "आता माझे शौर्य बघावे !

भिऊ नका हो, रडू नका हो, सोडवितो तुम्हाला.

नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला."


सर्व शक्तीने कुरतडुनीया उंदीर तोडी जाळे

पाहून सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे !

जीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला

इवले इवले जीव कितिदा येती मोठ्या कामाला !

इये मराठीचिये नगरी ,Iye Marathichiye Nagari

इये मराठीचिये नगरी

राम राम मंडळी, या हो

या हो अमुच्या घरी, घरी



गोड करा गूळ-पाणी, शाळूची भाकरी


कृष्णेच्या पाण्याला, गंगेची माधुरी



प्यार आम्हा त्यागाची, शौर्याची शाहिरी

भाव भुकेले आम्ही, आमुची भारत ही पंढरी

इथेच टाका तंबू ,Ithech Taka Tambu

चला जाउ द्या पुढे काफिला

अजुनी नाही मार्ग संपला

इथेच टाका तंबू !


जाता जाता जरा विसावा


एक रात्र थांबू-

इथेच टाका तंबू !


थोडी हिरवळ, थोडे पाणी

मस्त त्यात ही रात चांदणी

उतरा ओझी, विसरा थकवा

सुखास पळभर चुंबू

इथेच टाका तंबू !


अंग शहारे जशी खंजिरी


चांदहि हलला, हलल्या खजुरी

हलल्या तारा, हलला वारा

नृत्य लागले रंगू

इथेच टाका तंबू !


निवल्या वाळूवरी सावली

मदमस्तानी नाचु लागली

लयीत डुलती थकली शरीरे

नयन लागल झिंगू


इथेच टाका तंबू !



इथेच आणि या बांधावर ,Ithech Aani Ya Bandhavar

इथेच आणि या बांधावर

अशीच श्यामल वेळ

सख्या रे, किती रंगला खेळ !


शांत धरित्री शांत सरोवर


पवन झुळझुळे शीतल सुंदर

अबोल अस्फुट दोन जिवांचा

अवचित जमला मेळ.


रातराणिचा गंध दर्वळे

धुंद काहिसे आतुन उसळे

चंद्र हासला, लवली खाली

नक्षत्रांची वेल.


पहाटच्या त्या दवात भिजुनी


विरली हळुहळु सुंदर रजनी

स्वप्नसुमावर अजुनि तरंगे

ती सोन्याची वेळ.


इथे मिळाली सागर-सरिता ,Ithe Milali Sagar-Sarita

इथे मिळाली सागर-सरिता, ही प्रितीची एकरूपता

इथे मिळाली !


कमलफुलांचे सुगंध सिंचन, की भ्रमराला गोड निमंत्रण

मिटे पाकळी मीलन घडता, ही प्रितीची एकरूपता


इथे मिळाली !


या धरणीची हाक ऐकली, निळे गगन हे झुकले खाली

क्षितिजावरही प्रेम सांगता, ही प्रितीची एकरूपता

इथे मिळाली !


बांधु अपुले घरकुल चिमणे, तुझियासाठी माझे जगणे

मरणा येईल चिरंजीविता, ही प्रितीची एकरूपता

इथे मिळाली !

इतकेच मला जाताना Itakech Mala Jatana

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !



ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !




गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?



मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-

मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !



याचेच रडू आले की जमले न मला रडणेही

मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते


नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली-


नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते !



घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली-

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो-

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !

अनुपमेय हो सुरूं युद्ध,Anupamey Ho Suru Yuddha

नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

सशंख राक्षसगण तो दिसला

कष्णघनांवर बलाकमला
मुखांतुनी शत गर्जे चपला
रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

नाचत थय थय खिंकाळति हय
गजगर्जित करि नादसमन्वय
भीषणता ती जणूं नादमय
त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

दंत दाबुनी निज अधरांवर
वानरताडण करिती निशाचर
नभांत उडती सदेह वानर
शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

"जय दाशरथी, जय तारासुत"
प्रहार करिती वानर गर्जत
झेलित शस्त्रां अथवा हाणित
भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

गदा, शूळ वा लागुन शक्ति
राक्षस वानर घेती मुक्ति
रणांत पडती अपुल्या रक्तीं
'जय लंकाधिप' घोष घुमविती अरी वानरांचे

द्वीप कोसळे, पडला घोडा
वर बाणांचा सडा वांकडा
'हाणा मारा, ठोका तोडा'
संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे


रणांत मरतां आनंदानें
मांसकर्दमीं फुलतीं वदनें
तींहि तुडविलीं जातीं चरणें
रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

कलेवरावर पडे कलेवर
ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
मरणांहुनही शौर्य भयंकर
कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
पडलें तें शतखण्डित झालें
प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
काळमुखांतुन कोणी वांचे
कुठे कुणाचें कबंध नाचे
धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें

अनुपमा,Anupama

दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
अवचित येतो वादळ वारा, पसरूनी जातो दु:ख पसारा

ओंजळीतला दिवा फडकतो अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई आयुष्याची एक लढाई
अनुपमा ..... अनुपमा .....

अनाम वीरा जिथे जाहला,Anaam Veera Jithe Jahala

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

अन्‌ हल्लगीच्या तालावर,An Hallagichya Talavar

अवं लढाईवरनं आला ....... आला
माझ्या अर्जुनाचा गाडा ....... गाडा
त्याला बगायाला जमं ....... जमं
सारा धनगर वाडा ....... सारा धनगर ....... वाडा

अवं थांबा जरा, मागं सरा
रिंगण धरा अन्‌ बोला माझ्या भावांनो
'बिरोबाच्या नावानं चांगभलं'

अन्‌ हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अवं सोंड फिरं गरारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ प्वाट वाजं नगारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अवं लाडं लाडं मारतो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसा आबाळात फव्वारा ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ ढग्गाच्या या रूपानं ह्यो पानी पाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा


अवं ठुम्मक ठुम्मक बशितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ नादामंधी उठितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
आरं खेळाची ही नशा रं ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
कसं दोनी डोळं मिटितो ....... अरे हे ऽऽऽऽऽ हा
अन्‌ इंदराचा ऐरावत येला लाजतो गा
गज्जा नाचतो रं कसा गज्जा नाचतो गा

अर्धीच रात्र वेडी,Ardhich Ratra Vedi

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी

अधीर याद तुझी, Adhir Yaad Tujhi

अधीर याद तुझी, जाळितसे रे दिलवर
अशीच वाट तुझी, पाहु किती मी दिलवर ?

तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलून हासु कशी, एकटीच मी दिलवर ?

ते स्वप्न आज निखाऱ्यांत जहाले घायल्‌
हवा तुझाच बसंती, बहार रे दिलवर्‌

मदीर ध्यास तुझा, छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता, तुजवरती रे दिलवर्‌

अधिर मन बावरे,Adhir Man Bavare

अधिर मन बावरे, घेइ आंदोलने ।
विविध भावांवरि प्रेमशंकागुणें ॥

दयित हृदयांतले अणु जरी लाभलें ।

स्थल, विसावेल मन ।
कांतागुणचिंतने ॥

अधिक देखणें तरी, Adhik Dekhane Tari

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये ॥१॥

देहबळी देऊनी साधिलें म्यां साधनीं ।
तेणे समाधान मज जोडलें वो माये ॥२॥

अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें ।
सकळ देखिलें आत्मसवरूप वो माये ॥३॥

चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्यां देखिला निराकार वो माये ॥४॥

पुरे पुरे आतां प्रपंचा पाहणें ।
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये ॥५॥

ऐसा ज्ञानसागरू रखुमादेविवरू ।
विठ्ठलीं निर्धारू म्यां देखिला वो माये ॥६॥



अधांतर, Adhantar

नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबऱ्यावरी
गर्द घनाचे सावट पसरे शुभ्र गोजिऱ्या क्षितिजावरी
विणता-विणता का विखरावे नात्यांमधले चांदण-मोती
घडून गेला काय गुन्हा की क्रूर जाहली अगाध नियती
आयुष्याच्या सुखदु:खांची दिशा ठरवितो शुभंकर
मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते- अधांतर

अधमा केली रक्षा मम,Adhama Keli Raksha Mama

अधमा केली रक्षा मम सौख्याची सारी ॥

शोध तुझा लाविन धुंडोनी ।
पाप तिचें मापोनी । दवडिन बाहेरीं ॥

अदूर-दर्शित्वानें केवळ,Adur-Darshitvane Keval

अदूर-दर्शित्वानें केवळ ही स्थिति आम्हां आली ।
दोष तयाचा व्यर्थ ठेविसी नाट्यकलेच्या भालीं ।
कारण दुष्काळा । मानिल कोण कोकिलेला ॥

अर्थशून्य भासे मज हा,Artha Shunya Bhase Maj Ha

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म न्याय नीति सारा; खेळ कल्पनेचा

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा

अत्तराचा फाया तुम्ही,Attaracha Phaya Tumhi

अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया

नाही आग नाही धग, परी होइ तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया

सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया



अति कोपयुक्त होय परी,Ati Kop Yukt Hoy Pari

अति कोपयुक्त होय परी सुखविते मला ।
भृकुटि वक्र करुनि बघत ।
गाल लाल सर्व होत ।
थरथर तनु कांपवीत इंदुवदनिं घर्म सूटला ॥

जणु कनकाची मूर्ति अग्निमाजिं तावली ।
कीं नभ सोडुनि वीजचि ती खालिं उतरली ।
कीं ज्वलनाची ज्वाला कुंडात पेटली ॥

एक जगिं पद न ठरत ।
हृदय भरत रिक्त होत ।

अधरबिंब काय फुटत तेंवि वरी दंत रोंविला ॥

अताशा असे हे मला काय,Atasha Ase He Mala Kaay

अताशा असे हे मला काय होते ?
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दांत येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कुठले, न अवधान काही
कुठे जायचे, यायचे, भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे, न अनुमान काही


कशी ही अवस्था कुणाला कळावे ?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे ?

अता राहिलो मी जरासा,Ata Rahilo Mi Jarasa

अता राहिलो मी जरासा जरासा
उरावा जसा मंद अंती उसासा

कसा कोरडा कोरडा जन्म गेला
कसा रोज मी पीत गेलो पिपासा

कसे ओठ तू बंद केलेस माझे
करावा कसा आसवांनी खुलासा ?

असे हे कसे जीवनाचे दिलासे ?
दिलाशांस मी देत आहे दिलासा !

अणुरेणिया थोकडा,Anureniya Thokada

अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥

गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥

सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥

तुका म्हणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥

अजून नाही जागी राधा,Ajun Nahi Jagi Radha

अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.

मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
"हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव ...."

अजून त्या झुडुपांच्या,Ajun Tya Jhudupanchya

अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी, शेवंती लजवंती होते

तसे पहाया तुला मला ग, अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव अजून ताठर चंपक झुरतो

पाठ आठवुन तुझी बिलोरी, अजून हिरवळ हिरमुसलेली
चुंबायाला तुझी पावले फूलपाखरे आसुसलेली

अजून गुंगीमध्ये मोगरा, त्या तसल्या केसांच्या वासे
अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असते अपुले हासे

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे

अजून उजाडत नाही (२), Ajoon Ujadat Nahi (2)

अजून उजाडत नाही ग !

शून्य उभे या उगमापाशी शून्यच केवळ अंती ग
अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग
अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग
अंतरातल्या विश्वासाची आता नुरली द्वाही ग
अजून उजाडत नाही ग !

गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग
सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग
जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग
आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग
अजून उजाडत नाही ग !



अजून उजाडत नाही (१),Ajoon Ujadat Nahi (1)

अजून उजाडत नाही ग !

दशकांमागून सरली दशके अन्‌ शतकांच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग
पथ चकव्याचा, गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला ? फरफट अवघी, पान जळातून वाही ग
अजून उजाडत नाही ग !

कधी वाटते दिवस-रात्र हे नसते काही असले ग
त्यांच्या लेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता, कानी कूजन नाही ग
अजून उजाडत नाही ग !

एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतून उमलत नाही ग
अजून उजाडत नाही ग !

अजून आठवे ती रात,Ajun Aathave Ti Raat

अजून आठवे ती रात पावसाळी
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली

जरा स्पर्श होता सुटे कंप हाती
नको बंद आता अशा धुंद राती
लाजलाजुनी का आज दूर गेली

मिटून घेतले तू पंख पापण्यांचे
तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे
नको हा दुरावा अशा रम्य वेळी

अर्जुन तर संन्यासि हो‍उनी,Arjun Tar Sanyasi Houni

अर्जुन तर संन्यासि हो‍उनी रैवतकीं बसला ।
झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला ।
वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।
तत्वनिष्ठ वेदान्ती हो‍उनि तुच्छ मानितो विषयाला ।
प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला ।
सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला ।
ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ।
कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।
नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ।
भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ।

तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ।

अजुनी रुसून आहे, Ajuni Rusun Aahe

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना

धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !



अजुनि लागलेचि दार,Ajuni Lagalechi Daar

अजुनि लागलेचि दार, उजळे ही प्राची,
स्वेच्छ थंड गार झुळुक वाहतसे ताजी

जागवि जी रम्य वेळ
कमलादिक सुमन सकळ,
का न तुला जागवि परि, कमलनयन साची ?

देवि कांति, गीति, प्रीति

सकल मनी उत्सुक अति,
दारि उभ्या वाट बघति या तवागमाची

अरुणराग गगनि कांति
पक्षीगणी मधुर गीति
या हृदयी तशी प्रीति, तव पुरव हौस यांची

जीवित तुजवीण विफल
का मग हा विधिचा छळ ?

खचित तुझी मत्प्रीती छबि तव ही माझी

ऊठ रे मनोविराम
तिष्ठतसे मी सकाम
रुदन करी, कोठ परी मूर्ति ती जिवाची ?

अजुनि खुळा हा नाद,Ajuni Khula Ha Naad

अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।
नाटक झालें जन्माचें मनिं कां हो येइना ॥

व्यसनें जडली नवीं नवीं कुणि तिकडे पाहिना ।
नांव बुडविलें वडिलांचे कीर्ति जगीं माइना ॥

अजिंक्य भारत अजिंक्य,Ajinkya Bharat Ajinkya

अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाउल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळुनि पराक्रमाचे गीत गाउया रे

अजि सोनियाचा दिनु, Aji Soniyacha Dinu

अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।

प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥



अजि राधा बाला मीच, Aji Radha Bala Meech

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

आले चारायाला धेनूंना; मोहिले कंठ-मधुबले कृष्णाला ॥

अजि मी ब्रम्ह पाहिले, Aji Mi Bramha Pahile

अजि मी ब्रम्ह पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी,
कटिकर नटसम, चरण विटेवरी, उभे राहिले


एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड, आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरली
अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले

अजब सोहळा, Ajab Sohala

अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा !

मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा !

किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वाऱ्याचा हिंदोळा !

कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा !

मातीची धरती

देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा !

अचला विचला दाविल तव, Achala Vichala Davil Tav

अचला विचला, दाविल तव अचुक पद मार्गाला ॥

दिसत पंथ बहु, संशय आला; अचल धर्म तव प्रेमाला ॥

अग्निहोत्र, Agnihotra

अग्नि मिळे पुरोहितम् ।
यज्ञस्य देवाम् ऋत्वीजम् ।
होतारम् रत्नघातमम् ॥

कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणाऱ्या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निबीड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा

तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्निहोत्री
अग्निहोत्र, अग्निहोत्र .....



अग्गोबाई ढग्गोबाई, Aggobai Dhaggobai

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

अगा वैकुंठीच्या राया, Aga Vaikunthichya Raya

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

अगा करुणाकरा, Aga Karunakara

अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरी ॥१॥

ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।

व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥


उशीर तो आतां न पाहिजे केला ।
अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥

उरलें तें एक हें चि मज आतां ।
अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥

तुका म्हणे आतां करीं कृपा दान ।
पाऊलें समान दावीं डोळां ॥६॥



अगदिंच तूं वेडी, Agadich Tu Vedi

अगदिंच तूं वेडी ।
वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥

बघसि न दूरवरी ।
स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल, बोधाचे वैरी ॥

म्हणसी मी शहाणी,
सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥

अग पोरी संबाल दर्याला, Aga Pori Sambal Daryala

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी
लाट प्रितीची, भन्नाट होऊन आभालि घेई भरारी

नाय भिनार ग, येऊ दे पान्याला भरती
माज्या होरीचं, सुकान तुज्याच हाती
नाव हाकीन मी, कापीत पाऊसधारा
मनि ठसला रं, तुजा ह्यो मर्दानि तोरा
जाल्यांत गावली सोनेरि मासली
नको करू शिर्जोरी

तुज्या डोल्यांत ग, घुमतोय वादलवारा
तुज्या भवती रं, फिरतोय मनाचा भौरा
तुला बगून ग, उदान आयलंय मनाला
तुज्या पिर्तीचं, काहूर जाली जिवाला
सुटणार नाय ग, तुटणार नाय ग
तुजी नि माजी जोरी

मी आनिन तुला, जर्तारी अंजीरि सारी
मला पावली रं, पिर्तीचि दौलत न्यारी
मी झुंजार ! साजिरि तू माजि नौरी
तुज्या संगतीनं, चाखीन सर्गाची गोरी
थाटांतमाटांत गुल्लाबी बंगला-
बांदूया दर्याकिनारी

अग पाटलाच्या पोरी जरा, Aga Patalachya Pori Jara

अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून
बिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून

तुझ्या गालाचि खुलली लाली ग

जणु डाळिंब फुटतंय गाली
ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून

आलं ऊन ग भवती फुलुनी
कुठं जाशी तु ग फुलराणी ?
काटं ग बोचतिल बाई
नाजुक तुझ्या पायी
तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून !

रानी वाऱ्याची ऐकून गाणी
नाचे झऱ्याचं झुळुझुळु पाणी

ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात
चल जाऊ दूर मळ्यांत
संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून

आश्रम की हरिचे हे,Aashram Ki Hariche He

आश्रम की हरिचे हे गोकुळ
भासतसे वनवासही मंगल

गोधन देई अमृतधारा
मुरली घुमवितो मंजुळवारा
दूर सावळी सरिता यमुना
आठवणींची छेडित वीणा
जीवन रम्य निरागस निर्मळ

नंदनंदना भाऊराया
तुझिच छाया दिसे वनी या
वाऱ्यांनो, जा द्वारावतीला
निरोप सांगा श्रीकृष्णाला
संभ्रमी रे तव भगिनी प्रेमळ

आळविते मी तुला विठ्ठला,Aalavite Mi Tula Vitthala

आळविते मी तुला विठ्ठला
देहमनाला व्यापुन उरला तव चरणांचा लळा

रोज पहाटे नयनापुढती
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला

उपासनेची उटी लाविते
शुभनामांची माळ गुंफिते

निर्मोहाचा रेखुन देते तिलक तुझ्या भाळा

प्रेमघना रे कधि तू येशिल
ममजीवनवन फुलवुन जाशिल
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला

आसावल्या मनाला माझाच,Aasavalya Manala Majhach

आसावल्या मनाला माझाच राग येतो
नाही कशी म्हणू मी येईलही पुन्हा तो

आमंत्राणाविना तो या जीवनात आला
आला तसाच गेला भुलवून भाबडीला
त्या दुष्ट आठवाने हृदयात दाह होतो

आता पराजितेला आधार कोण आहे ?
ह्या पांगळ्या कथेचे होणार काय आहे ?
शिशिरास सावराया म्हणती वसंत येतो

ताटातुटी टिकावी आता नकोत भेटी
तुटतात का परंतु ह्या घट्‌ट जन्मगाठी
माझे मला कळेना हा भास काय होतो

आस आहे अंतरी या,Aas Aahe Antari Yaa

आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
साद देते मी तुला अन्‌ तू मला पडसाद दे

जुळविता तार विणेच्या, जुळविली आम्ही मने
प्रेमगीतांना प्रिया तू, आगळे संगीत दे

चांदवेडे हृदय माझे, ओढ घेई तुजकडे

विरहि जो अंगार आहे, गारवा तू त्यास दे

प्रीतिचे दोघे प्रवासी, मार्गि येथे भेटलो
यौवनाच्या मंदिरी या, चांदण्याचा स्पर्श दे

आवाज मुरलीचा आला,Avaj murlicha ala

आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला

मोहरुनि मनी लता विकसली

स्वरसुमने किती ती वरी फुलली
कशि भ्रांत पडे भ्रमराला

जळवंतीची मंजुळ गाणी
नादिति या खळखळातुनि
कशी येई लहर यमुनेला

नादब्रम्ही त्या भान हरपता
जिवा शिवाची एकरूपता
मग अंत न पार सुखाला

आवडसी तू एकच ध्यास,Aavadasi Tu Ekach Dhyas

आवडसी तू, आवडसी तू,
एकच ध्यास तुझा घेतला, आवडसी तू !

आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला,
वेष गडे घातला, आवडसी तू !

आवडते तुजसी तसे रूप दिसे साजरे
आवडते तुजसी तसे हास्य फुले लाजरे
गीत नव्हे, ओठातून भाव फुटे आतला
आवडसी तू !

माझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले

आगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले
आवडिच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला

तूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी
आधारा अधीर सख्या देहलता नाचरी
भेट ठरो जन्मागाठ शुभमुहूर्त साधला
आवडसी तू !

आवडती वस्तू लोभानें,Aavadati Vastu Lobhane

आवडती वस्तू लोभानें ।
पसरिला घ्यावयालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति ।

किं सविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां
अविरलनवदलपरि मी मानें ॥

आवडती भारी मला माझे,Aavadati Bhari Mala Majhe

आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता गाती माझे आजोबा

नातवंडा बोलावून
घोगऱ्याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती माझे आजोबा

रागेजता बाबा-आई
अजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा

खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा

आल्या नाचत नाचत,Aalya Nachat Nachat

आल्या नाचत नाचत मेनका रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा

कानात पाचुची कर्णफुले
कंठात हि-यांची माळ रूळे
नवरत्न कटी वर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा

स्वर किन्नर गाती सप्त सूरा
दशदिशा उजळती रंग जरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा

आलो कुठून कोठे,Aalo Kothun Kothe

आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट

काटे सरून गेले उरली फुले मनात



प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे

साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत



आले वयात मी बाळपणाची,Aale Vayat Mi Balpanachi

आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली
गोऱ्या गाली प्रीतिची लाली अवचित उठली !

निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते
ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते
जिव होतो गोळा
झोप नाही डोळा
येतो दाटुन गळा
सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली !

तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र
बोल हसुन जरा, बघ, फुलांत नटला चैत्र
एका ठायी बसू
गालागालांत हसू
डोळा मोडून पुसू
चारी डोळे भेटता दोन मने एकवटली !

आलीस सांजवेळी घेऊन,Aalis Sanjveli Gheun

आलीस सांजवेळी घेऊन स्वप्न माझे
तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे

किती लालबुंद होशी, भित्रीच तू अखेर
ओठांतुनी फुटेना तरी शब्द तो अधीर
डोळ्यांत गंधवेडी मुग्धा तुझ्या विराजे

तळव्यांवरी तुझ्या ग रंगेल धुंद मेंदी
माझ्याही या करांना लावी खुशाल नादी
हृदयी चितारलेले ते चित्र आज साजे

स्वप्नांतल्या छटांना गिरवून सांजतारा
लागे सूरात गाऊ फुलवूनिया पिसारा
तेजात नाहती त्या, स्वर मी तुला दिले जे

आली हासत पहिली रात,Aali Hasat Pahili Raat

आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात

प्रकाश पडता माझ्यावरती
फुलते बहरून माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन
नयनांच्या महालात

मोहक सुंदर फूल जिवाचे
पतिचरणावर प्रीत अर्पिता
मीलनाचा स्पर्ष होता
विरली अर्धांगात

लाज बावरी मी सावरता
हर्षही माझा बघतो चोरून
भास तयाचा नेतो ओढून
स्वप्नाच्या हृदयात



आली सखी आली प्रियामीलना,Aali Sakhi Aali Priya

आली सखी आली, प्रियामीलना !

काय पाहती व्याकुळ लोचन ?
कानोसा घे मध्येच थबकुन
आतुर अंतरि, कंपित अधरी
थरथरते कामना
आली सखी आली, प्रियामीलना !

काजळकुंकुम रेखुन ल्याली
साडी जांभळी, हिरवी चोळी
घेइ तनुवरी शेला भर्जरि
लपवी यौवनखुणा
आली सखी आली, प्रियामीलना !


बकुळफुलांनी गुंफिलि वेणी
कर्णभुषणे झुलती कानी
रुणझुणु गाती कंकण हाती
गुपित सांगती जना
आली सखी, आली प्रियामीलना !

आली माझ्या घरी ही दिवाळी,Ali Majya Ghari Diwali

आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धूंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे

जन्मजन्म रे तुझ्या संगती एकरूप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी


पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लावता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी



आली बघ गाई गाई,Aali Bagha Gai Gai

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली

म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे ?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

आली बाई पंचिम रंगाची,Aali Bai Panchami Rangachi

संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली
पुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली
अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची

आला तैसे जा परतून
फिरा नगरच्या पेठेतून
राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची
आली बाई पंचिम रंगाची

लेईन चोळी सजेन खूप
उरी जिव्हारी तुमचे रूप
शमेल लाही अंगाची,ग बाई अंगाची
आली बाई पंचिम रंगाची

फाल्गुनातली राजस रात
भिजुनी जाईल प्रीतरसात
जोडी कमळण भृंगाची, ग बाई दोघांची
आली बाई पंचिम रंगाची

आली प्रणय-चंद्रिका करी,Aali Pranaya Chandrika Kari

आली प्रणय-चंद्रिका करी
सुंदरी, मदनाची मंजिरी

जशी झळकते चटकचांदणी
कामिनी राजहंसगामिनी !

नवती नवनीताच्या परी
मुलायम माषुक मख्खन-परी !

जिचिया उरोज-बहरावरी
कंचुकी तटतटली भरजरी !

रसीली नयनांची चातुरी
कोवळी अधरांची माधुरी

चेतवी मदनरंग-दीपिका
दिलाच्या रंग-महालांतरी !

आली दिवाळी मंगलदायी, Aali Diwali Mangaldaye

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी

चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी

रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरू या
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी

चला चला त्वरा करा

अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी !
चला चला पहातरी

हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी,
आणा आणा निरांजना

आली दिवाळी दिवाळी, Aali Diwali Diwali

लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी ।
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी ॥

आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी ।
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली ॥

घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण ।
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण ॥

चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी ।

कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिर्शीरी ॥

आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा ।
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा ॥

तुझ्यामागुती बाबांनी दुःख दाखविले नाही ।
त्यांच्या पंखात वाढलो तुझा भाऊ आणि ताई ॥

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते ।
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते ॥


सासरीच्या या संसारी माहेराची आठवण ।
आठवती बाबा भाऊ आणि दारीचे अंगण ॥

अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी ।
दारी घालते रांगोळी माझ्यावाचून का कोणी ॥

आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन ।
जिथे उभे अंगणात तुळशीचे वृंदावन ॥

दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा ।

कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा ॥

शेजारच्या घरातली दळणाची घरघर ।
अजूनही येती कानी आठवणीतून स्वर ॥

आमच्या ग दारावरनं घोड्यांच्या गाड्या गेल्या ।
भावांनी बहिणी नेल्या बीजेसाठी ॥

आली दिवाळी आली दिवाळी,Aali Diwali Aali Diwali

आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळित मानवतेचे तेजाच्या पाउली

नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
दिव्य ज्योत ही आनंद-हृदयी
गोविंदे लाविली

रत्‍नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
बहीण लाडकी भाऊराया
ओवाळू लागली

हो‍उन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीच्या
हो‍उन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी

आली ठुमकत नार लचकत, Aali Thumakat Nar Lachakat

ग साजणी !
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,

मान मुरडत, हिरव्या रानी

खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग

सोसंना भार, घामाघूम झालं अंग
गोऱ्या रंगाचि, न्याऱ्या ढंगाचि
चोळि भिंगाचि, ऐन्यावानी

डाळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी

कवळ्यात घेऊनीया, अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीत, दहिवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या, काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं
जाउ जोडीनं, राजा-रानी



आली कोकण-गाडी दादा, Aali Kokan Gadi Dada

लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण-गाडी
आली कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी

ठाणे-मुंब्रा-कल्याणाची ओलांडुन खाडी
आली कोकण-गाडी दादा, आली कोकण-गाडी

जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेसन आले
ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी

आपट्यापासून गाठिल रोहे, तयार ठेवा नारळ-पोहे

स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी

कशासाठी पोटासाठी कोकणपट्टी घाटासाठी
आगीनगाडी नागीन जैसी, जाते नागमोडी

दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेइल पाउस-धारा
बघता बघता मागे टाकिल सावंताची वाडी


येथे डोंगर तेथे सागर, नारळ-पोफळ हिरवे आगर
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी

सरता कोकण पुढती जाते, गोव्यासंगे जुळवी नाते
कर्नाटक अन्‌ केरळ-तामिळ प्रेमे यांना जोडी

कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते द्वाही
सुखी होऊ दे गावीत-कोळी कष्टाळू कुळवाडी

शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या साऱ्या आशा
कोकणच्या कैवारी नाथा, आशिर्वादा धाडी

आली कुठूनशी कानी, Aali Kuthunshi kani

आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल, उठे रोमरोमांतुन

नभी तेजात नाहली, चंद्रभागा चंद्रायणी
बोले शब्दावीण काही, चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात, शहारले अंग‍अंग
मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग

वृक्ष दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा
जसे कटीवरी हात, युगे अठ्ठावीस उभा

भूक नयनांची सरे, मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू, तुकयाच्या अभंगात

आली आली हो भागाबाई, Aali Aali Ho Bhagabai

तिनं साडी आणा म्हंटली .... आणली !
तिनं चोळी आणा म्हंटली .... आणली !
तिनं नथ आणा म्हंटली .... आणली !
तिनं बुगडी आणा म्हंटली .... आणली !

अहो दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली,

माडीवरची मंडळी खाली आली,
आली आली हो भागाबाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई बोलली हटून,
आणि लग्नाला बसली नटून,
अन्‌ तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही,
आली आली हो भागाबाई !


भागाबाई निघाली जत्रंला,
शंभर रुपयं बांधलं पदराला,
तिथं मांजर आडवंच जाई,
आली आली हो भागाबाई !

भागाबाई पडली इरेला,
ह्यो बापई नवरा ठरिवला,
त्याच्या तोंडाला नाकच नाही,
आली आली हो भागाबाई !

अशी आमची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कड पात्तूर एकलीच ऱ्हाई
आली आली हो भागाबाई !



आली आली सर ही ओली, Aali Aali Sar Hi Oli

आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम्‌ छुम्‌ पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली !

मला प्रितीची झाली बाधा, गोकुळची झाले राधा
नंदनवन खुलले, फुलले माझिया हृदयात
आली आली सर ही ओली !

हसते मजला यमुनेचे जळ, कदंब हसतो गाली अवखळ
हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
आली आली सर ही ओली !

दृष्ट लागू नये सौख्याला, अनुपम या सौभाग्याला
मोद मनी मानसी दाटे मावेना गगनात
आली आली सर ही ओली !

आला स्वप्नांचा मधुमास, Aala Swapnacha Madhumas

आला स्वप्नांचा मधुमास
उमलवीत उरिचा उल्हास

निद्रेच्या भूमीवर फुलल्या
स्वप्न-सुमांच्या कळ्या कोवळ्या
मूक मनीषा अंतरातल्या उधळति स्वैर सुवास

ही नटवी प्रीतिची कलिका
घडिघडि दावी अनंतरूपा
धुंद करी अर्पुनि मनमधुपा अद्‍भुत प्रणयविलास

टवटवली मृदु शैशवसुमने
लेवुनि ते मधुमंगल लेणे
अनिर्बंध मन गुंगत गाणे, भोगी छंद-सुखास

जागृतीत जे जे वांछियले
ते ते या स्वर्भूमधि रुजले
रसरंगे अंतर्जग नटले नाचत जीवनरस

आला वसंत ऋतू आला, Aala Vasant Rutu Aala

आला वसंत ऋतू आला,
वसुंधरेला हसवायाला,
सजवीत नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतू आला

रसरंगांची करीत उधळण,
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला

आला, आला वसंत ऋतू आला

वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतुन अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
आला, आला वसंत ऋतू आला

व्याकुळ विरही युवयुवतींना,
मधुर काल हा प्रेममिलना

मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
आला, आला वसंत ऋतू आला

आला वसंत देही, Aala Vasant Dehi

आला वसंत देही मज ठाउकेच नाही !

भीतीविना कशाचा देहावरी शहारा ?
हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई !

ओठांत थांबते का हासू उगाच माझे ?
बाहेर डोकवीता का बोल आज लाजे ?
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई !

हे आज काय झाले ? माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना
ये गंध मोगऱ्याचा, आली फुलून जाई

आला पाऊस मातीच्या वासात, Aala Paus Maticha Vasat

आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग !

आभाळात आले काळे काळे ढग

धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग !

कोसळल्या कशा सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग !

लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली
वारा दंगा करी जुई शहारली
चाफा झुरतो फुलांच्या भासात ग !

झाडांवरी मुके पाखरांचे थवे
वीज लालनिळी कशी नाचे, लवे
तेजाळते उभ्या अवकाशात ग !

वीज कडाडता भय दाटे उरी
एकली मी इथे सखा राहे दुरी
मन व्याकूळ सजणाच्या ध्यासात ग !

आला जो मज प्रेमें वराया, Aala Jo Maj Prem Varaya

आला जो मज प्रेमें वराया ।
कां न करी सुशिला निज जाया ॥

कुमुदमोहें पंकात दिसला ।
करी मग विमल शशि तो कमला ॥

आला खुशीत्‌ समिंदर, Aala Khushit Samindar

आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !


हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देइ ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !
तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तावाणी चमक्‌ पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक्‌ होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

सूर्यनारायण हसतो वरी,
सोनं पिकलं दाहिदिशांतरी,
आणि माझ्याहि नवख्या उरी !
आला हासत समिंदर, डुलत फेसावर,
होडीशी गोष्ट करू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

गोऱ्या भाळी तुझ्या लाल्‌ चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी ?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,
चाले होडी भुरुभुरू,
सजणे, वाऱ्यावर जणु पाखरू !

आला किनारा आला किनारा, Aala Kinara Aala Kinara

आला किनारा, आला किनारा
निनादे नभी नाविकांनो इशारा

उद्दाम दर्यामध्ये वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा

प्राकाशे दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्यालाल हिंदोलती
तमाला जणू ये अग्नीचा फुलोरा

जयांनी दले येथ हाकारली
क्षणासाठी या जीवने जाळली
सुखैनैव स्वीकारून शूल-कारा

तयांची स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आला आला वारा, Aala Aala Vara

आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा

आजवरी यांना किती जपलं जपलं
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा

येगळी माती आता ग येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा



आला आला पाउस आला, Aala Aala Paus Aala

आला आला पाउस आलाबघा बघा हो आला आला
पाउस आला ..... पाउस आला

काळ्या काळ्या मेघांमधुनी,
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

हसली झाडे हसली पाने
फुले पाखरे गाती गाणे
ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला

धरणी दिसते प्रसन्न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा

लेवुनिया थेंबांचे मोती
तरारली गवताची पाती
वसुंधरेने पांघरिला जणु हिरवा हिरवा शेला

आला आला ग सुगंध मातीचा, Aala Aala G Sungadha Maticha

दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो
आला आला ग, सुगंध मातीचा
बघ पागोळ्या गळती थेंब अंगणी नाचती
आला आला ग, सुगंध मातीचा

श्रावणात सारे जीव झाले बाई ओले
ऊन हळदीचे पानापानातुन खेळे
उभी पिके हिंडोलती, बाळे झाडांची बोलती
आला आला ग, सुगंध मातीचा

वसुंधरा आज नवरसात बुडाली
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली
श्रियाळराजाचा सण चांगुणा मातेचा
नागपंचमीचा देव तो ग शोभला

कुणी गौरी ग पुजिती, गोफ रेशमी विणती
आला आला ग, सुगंध मातीचा

आरंभी वंदीन अयोध्येचा, Aarambhi Vandani Aayodhecha

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्ताचीया काजा पावत असे ॥१॥

पावत असे महासंकटी निर्वाणी ।

रामनाम वाणी उच्चारीत ॥२॥

उच्चारिता राम होय पाप चर ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥


पुण्यभूमी पुण्यवंतासीं आठवे ।
पापीयानाठवे काही केल्या ॥४॥

काही केल्या तुझे मन पालटेना ।

दास म्हणे जन सावधान ॥५॥

आयुष्यावर बोलू काही, Aayushawar Bolu Kahi

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन -
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

आम्हां नकळे ज्ञान, Aamhi Nakale

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।

शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥


चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

आम्हां घरीं धन, Aamhi Ghari Dhan

आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्नें ।
शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥

शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥

आम्ही हाव जातीचे कोली, Aamhi Hav Jatiche Koli

वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव

दरियावरी आमुची डोले होरी
घेऊन माशांच्या ढोलीन्‌
आम्ही हाव जातीचे कोली

वादलासो वाऱ्यानेतो पावसाच्या धारा
तुफान दरिया लाटांचा मारा
ह्यो कोली ने कोनाच्या धमकीस भिनारा

खंडू देवाचा लावून भंडारा
त्यावर भरवसा ठेवून की सारा
वादल वाऱ्यांशी गाठू किनारा

दर्या सागर हाय आमचा राजा
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवले नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा

आम्ही सारे खवैय्ये, Aamhi Sare Khavaiyye

आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही आम्ही सारे
ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे,
सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते-
आम्ही सारे खवैय्ये !

एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे
किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे
छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे
चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे
आम्ही सारे खवैय्ये !



आम्ही दैवाचे शेतकरी, Aamhi Daivache Shetakari

आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम, स्मरू नाम, मुखी राम हरी रे

प्रानावानि पिर्ती रानी
जुपुनिया बैल गुनी
कष्ट क्येलं नांगरुनी
द्येवाची स्वारी आली मिर्गावरी रे

धान्याची पेर झाली
लक्षुमिनं किर्पा केली
मोत्याची रास दिली
शिवारी पीक डोले राजापरी रे

नाचत्याती पोरं थोरं
बागडती गुरं ढोरं
चला जाऊ समद्या म्होरं
बिगी बिगी बिगी बिगी गाडी हाकू खळ्यावरी रे



आम्ही ठाकरं ठाकरं, Aamhi Thakar Thakar

आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर

या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर



आम्ही जातो आपुल्या गावा, Aamhi Jato Apulya Gava

आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥

आम्ही चालवू हा पुढे, Aamhi Chalau Ha Pudhe

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले

फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !


तुझी त्याग-सेवा, फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाहीदिशी
अगा पुण्यवंता, भल्या माणसा !

आम्ही गाई जातीच्या, Aamhi Gai Jatichya

आम्ही गाई जातीच्या । नाहीं अम्हां वाचा ।
ती असती तरी तुमच्या । भेदितेचि हृदया ॥

अंतरिं जें जें सलतें । सांगितले मग असतें ।
गुपित अशा मारातें । नसतें सोशियलें ॥

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, Aamhi Kolyachi Por Hay Ho

वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो, नाय हो, नाय हो

वर आभाळ भरलंय्‌ हो
जाळं जोरात धरलंय्‌ हो

कोण करील अम्हा काय हो, काय हो, काय हो ?
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो


लाटं जोसात येऊ द्या
झेप खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो, पाय हो, पाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेत पुढं जाय हो, जाय हो, जाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो

आम्हा नादी विठ्ठलु, Aamhi Nadi Vitthalu

आम्हा नादी विठ्ठलु आम्हा छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥

आम्हा धातु विठ्ठल मातु विठ्ठलु
गातु विठ्ठलु आनंदे ॥२॥

आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु
संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥


आम्हा ताल विठ्ठलु मेल विठ्ठलु
कल्लोळ विठ्ठलु किर्तने ॥४॥

आम्हा श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु
मत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥

आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु
एका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

आमुची वसने दे श्रीहरी, Aamuchi Vasane De Shrihari

झोंबती अंगा जललहरी
आमुची वसने दे श्रीहरी !

पळे पळाली गेली घटका
पुरे खेळ हा अवखळ, लटका
परत जाऊ दे घरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

जात आमुची अशी लाजरी
क्षणाक्षणाने पदर सावरी
सुवेश असला तरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

जळात बुडले देह तरी हे
उघडेपण मन विसरत नाही
लाज सले अंतरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

किती विनवावे किती रडवावे
असेच वाटे जळी बुडावे
तूच सुबुद्धी धरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

आमुचे नाव आसू ग, Aamuche Nav Aasu G

आमुचे नाव आसू ग !
गहिऱ्या गालावरल्या गुलाबांच्या कलिकांनो,
ऐका ग बाई ऐका ग !


कन्या सासऱ्याशी जाते ग बाई, मागे परतुनी पहात ही आई
पापणिच्या पालखीतुनी मिरवित मिरवित नेते ग

नयनांच्या नीरांजनी आम्ही जळतो वाती ग

बुबुळांच्या बागेमधली ही फुलपाखरे निळी
श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली
गवळणीच्या गळ्यांतले आम्ही हार झालो ग

बिंदुएवढ्या आम्हा मध्ये-
तरते जगही बुडते ग, बुडते जगही तरते ग
आमुचे नाव आसू !

आमची माती आमची माणसं, Aamchi Mati Aamchi Manas

ही काळी आई, धन-धान्य देई
जोडते मनांची नाती...

आमची माती आमची माणसं



आमचा राजू का रुसला, Aamcha Raju Ka Rusala

रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू
हाहा ..... ही ही ....... हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी या चंद्रमुखाचा, उदास का दिसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला

बावन पत्ते बांधु बाळा, शर्यत खेळू घोडा घोडा
घरादाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला

चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकीळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा, अबोल का बसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला

आभाळीचा चांद माझ्या, Aabhalicha Chand Majhya

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात
पंढरीचा राया दळी, जनीच्या घरात

किती करी काम देवा, घेई रे विसावा
हेच एक एवढे रे, मान किती घ्यावा
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या नाथा
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया
जरा थांबु दे रे देवा, कोमल हे हात

किती माझ्या संगे, गाऊनिया गाणी
भागलासि आता, तू रे चक्रपाणी
कटी पितांबर शोभे, गळा वैजयंतिमाला
असा हरी गरिबांच्या, झोपडीत झोपी गेला
सावळीच गोजिरी ही, मूर्ति सदा नयनात

आभाळमाया, Aabhalmaya

जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया......
आभाळमाया.......



आभाळ फाटलेले टाका कुठे, Aabhal Phatalele Taka Kuthe

आभाळ फाटलेले, टाका कुठे भरू मी ?
आता कसे करु मी ?

स्वप्नी चितारलेल्या झाल्या विराण जागा
वाहून पार गेल्या वाळूवरील रेघा
पाण्यात त्या मिळाल्या, त्यांना कशी धरू मी ?

जो मित्र पाठिराखा, तो होय पाठमोरा
साऱ्या मनोरथांचा तो ढासळी मनोरा
आयुष्य कोसळे हे, त्या काय सावरु मी ?

प्रीतीविना जीवाची पंखाविना भरारी
आधार ना निवारा आता दिशात चारी
ना अर्थ या जीण्याला, का व्यर्थ वावरु मी

आभाळ कोसळे जेव्हा, Aabhal Kosale Jevha

आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ?
सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे ?

छाया न पित्याची पाठी, आईची न दिसली माया
पालवीहि फुटण्याआधी वठलेली अमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे?

चत्‌कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही ?
आहेत साखळ्या भारी असहाय आमुच्या पायी

कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे?

बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा
तुटल्या माळेमधले मणि फिरुनी कसे जुळावे?

आभास हा छळतो तुला, Aabhas Ha Chalato Tula

कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा

कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा

छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते; तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा;
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू

पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !



आपली माणसं, Aapali Manas

ओले पाऊल, ओली माती
हिरवी चाहूल, अगम्य नाती
गंधामधुनी बहकत-बहकत
श्वासांमध्ये थबकत-थबकत

नात्यांभवती, नात्यांमधुनी
उगवून येती- आपली माणसे

आपदा राज-पदा भयदा, Aapada Raj Pada Bhayada

आपदा राज-पदा भयदा । नृपति कामभोग निरति ॥
लोपुनिया चिरसुखदा । दिव्य शीलसंपदा ॥

पापरता । पामरता । स्मरति, नरपति-
शिरि अरि सदा महा भया धरित- ॥

आनंदें नटती, Aanade Natati

आनंदें नटती । पाहुनि ज्या गृहमयूरपंक्ती ॥

गमनोत्सुक हे हंस असुनियां । धैर्य नसे त्यां गमन कराया ।
कामुकगगनासम रोधाया । मेघ पहा फिरती ॥

आनंदी आनंद गडे, Aanadi Aanada gade

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

आनंदाचे डोही आनंद, Aanadache Dhohi Aanada

आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥१॥

काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥

आनंदाचा कंद हरी हा, Aanadacha Kand Hari Ha

आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥
भक्तांसाठी । ठेऊनी कर कटीं । भीमानिकटीं राहिला ।

कंसभयानें । वसुदेवानें नंदयशोदें वाहिला ।
यज्ञ-याग-जप-तपासि न भुले । ध्यानें ना कळे ।
निश्चल साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणासीं मोहिला ॥

आनंदवनभुवनी, AanandvanBhuvani

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी

त्रैलोक्य चालिल्या फौजा

सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडली मोठी, आनंदवनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी

भक्तांसी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी

येथूनी वाचती सर्वे
ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी


उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

बुडाली सर्व ही पापे

हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी

आनंदकंद ऐसा, AanandKand Aisa

आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।

सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी ।
सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ।

जगदीश जन्म घेई । पदवीस थोर नेई ।
चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ।

गंगा हिमाचलाची । वसती जिथे सदाची ।
होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ।

तिलकादि जीव देही । प्रसवूनि धन्य होई ।
मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ।

पूजोनि त्यास जीवे । वंदोनि प्रेमभावे ।
जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ।

आनंद मनि माईना, Aanand Mani Maina

आनंद मनि माईना, कसं ग सावरू ?
घे गगन भरारी उडु पाहे पाखरू

भर दुपारची सावली
लपतसे जशी साउली
मी बाळ तुझे माऊली
सुख कै योगे रडले
कसं ग आवरू ?
घे गगन भरारी उडु पाहे पाखरू


किती फुले लते तळी गळली
किती पायदळी चुरगळली
खुडली ती उरलीसुरली
या जीवनी क्षण विरता
डोळे ये पाझरू
घे गगन भरारी उडु पाहे पाखरू

घे उडी मना घे उडी
आले रे मी रडकुडी
दे सोडुनी दुबळी कुडी
बघशी तरि ये ममता छाया ही धरू

आनंद सांगूं किती सखे ग, Aanada Sangu Kiti Sakhe G

आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति

सिंहसनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशील सीता
जरा गर्विता, जरा लज्जिता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति


गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांचीं जलें शिंपतिल
उभय कुळें मग कर्तार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची, तुज करणे स्वीकृति

तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं ?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिन्ही लोकीं भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणांसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहुं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींतही दिसतें सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति ?

आनंद सुधा बरसे, Aanand Sudha Barase

आनंद सुधा । बरसे, झाली धुंद अमृतघन बरसात
चरणी पावन फुले । स्वर्ग या विजनात
रसमय मंजुळ गीत गात मानस भरे
कमलदली जशी पुनवरात .....

आनंद पोटात माझ्या, Aanand Potat Majhya

हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठवासी रहातो तयाला
पत्राचा मजकूर वाचूनी पाहिला, भक्तसंकटी धावून आला
ही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेतील काय
आणि अज्ञानी मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरतील काय


हे तुझे भजना तूच कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही

कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पीता एक माय

दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
( आता लगीच काय ? ..... लगीच लगीच )

दत्ता दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
( आम्ही येणार ! )

अरे आनंद पोटात माझ्या ..... अरे वाडीला ?
अरे आनंद पोटात माझ्या ..... औदुंबुर ? ..... नरसोबाची वाडी राहिलीये
अरे आनंद पोटात माझ्या ..... अरे बाबा गाणगापूर ..... (हा तिकडंच जाऊया आपलं !)

अरे आनंद पोटात माझ्या माईना रे माईना
आनंद पोटात माझ्या माईना

गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट
या या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना रे

अरे आनंद पोटात माझ्या माईना

रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस आणिक काही येईना येईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना

नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्‌गुरू प्रेमळ
खेळ खेळिता खेळ पुरा होईना होईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना

हंडीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
या या भजनाची हौस पुरी होईना होईना रे
अरे आनंद पोटात माझ्या माईना

आधी रचिली पंढरी, Aadhi Rachali Pandhari

आधी रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥२॥


जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटी ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी ।
म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥

नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥

आधी बीज एकलें, Aadhi Beej Ekale

आधी बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें

एका बीजापोटीं, तरु कोटी कोटी
जन्म घेती, सुमनें फळें


व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती, ब्रम्ह एकलें



आधी गणाला रणी आणला, Aadhi Ganala Rani Aanala

आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा ब्रम्ह नायका, घेऊन येईल रूद्रविणा

साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, मेरूवरचा धुरू आणा आणा
ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

आधार तू जीवनी, Aadhar Tu Jivani

सोनफूल तू, रानवेल मी
सोड हा अविचार तू
आधार तू, जीवनी आधार तू !

कोठली मी? तू कुणाचा? योग आला दो जीवांचा
शून्य माझ्या अंतरीचा उजळला अंधार तू !

चांदण्याचा हा फुलोरा, रोमरोमी ये शहारा

दिवसरात्री उधळला रे आगळा शृंगार तू

तू विसावा प्राणनाथा, प्रीतिचा सौभाग्यदाता
सोनियाच्या पाउलांनी दिपविला संसार तू

आधार जीवाला वाटावा, Aadhar Jivala Vatava

वय तर माझे सोळा सत्रा
स्वभाव अगदी भोळा भित्रा

आधार जीवाला वाटावा
असा कुणी मज भेटावा


जो येतो तो भवती फिरतो
सौंदर्याचे कौतुक करतो
हा त्रास जयाने निपटावा
असा कुणी मज भेटावा


कुणी म्हणे मज गुलाब हसरा
कुणी म्हणे मज गुणी शर्करा
अभिमान जयापुढे फिकटावा
असा कुणी मज भेटावा

ब्रम्हचारी मज देतो टॉफी
गृहस्थ पाजितो काळी कॉफी
पण संसार जयासी थाटवा
असा कुणी मज भेटावा

एकोणिस वा वीस वयाचा
मलाच राहील वचक जयाचा
मन पतंग त्याने काटावा
असा कुणी मज भेटावा

आधार जीवा, Aadhar Jiva

आधार जीवा,
हात हा हाती असावा !

संचिताची गूढ भाषा
आज झाली दैव रेषा
झेलता आयुष्य सारे
एक द्या मजला विसावा !

आदिमाया अंबाबाई, Aadimaya Aambabai

आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई

साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर- त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर- उभे राहिले मंदिर
नाना देवके भोवती देवी मधोमध राही

आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
स्वत: तरली भक्तांना सई तारुनिया नेई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई

आतां राग देई मना, Aata Raag Dei Mana

आतां, राग देई मना शांततेला, वीर हा असुरसंहार झाला ॥

कोप दुर्गचि खरा दुर्बला जाहला, विजयदायक मला, बंदी याला ॥

आताच अमृताची बरसून, Aatacha Amrutachi Barsun

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

माझ्या मिठीत केली कुजबूज चांदण्याने
ते बोलणे तरीही समजून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

सांगूनही कुणाला कळणार काय आता ?
माझी कुंवार गीते उजवून रात गेली !

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?



आता वाजले कि बारा, Aata Vajale Ki Bara

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-

भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची)

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी,आता वाजले कि बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ...
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.




आता तरी देवा मला, Aata Tari Deva Mala

आता तरी देवा मला पावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का ?
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ?

आता जगायाचे असे माझे, Aata Jagayache Ase Majhe

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?

हदुयात विझला चंद्रमा .... नेत्री न उरल्या तारका ....
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा ?
अजुनी मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले ?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ....
मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले ?

कवटाळुनी बसले मला दाही दिशांचे हुंदके
माझे अता दुःखासवे काही न भांडण राहिले !

होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली ...
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले ?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !

आता कोठे धावे मन, Aata Kothe Dhave Man



आतां कोठें धांवे मन ।
तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला सीण गेला ।
अवघा जाला आनंद ॥२॥

प्रेमरसें बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाशी ॥३॥

तुका म्हणे आम्हां जोगें ।
विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥

आता कसली चोरी ग, Aata Kasali Chori G

त्याची माझी प्रीत अलौकीक दिशा जाणती चारी ग
आता कसली चोरी ग

तो नगरीचा झाला राजा
मी म्हणते पण केवळ माझा
त्याच्या भवती धरिती फेरा स्वप्ने माझी सारी ग
आता कसली चोरी ग

फुलात दिसती त्याचे डोळे
सुगंधात सहवास दरवळे
स्मरणे त्याच्या घेई लालिमा कांती माझी गोरी ग
आता कसली चोरी ग

वावरता मी त्याच्या मागे
पदापदावर सुदैव जागे
सप्तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग
आता कसली चोरी ग

आता कशाला उद्याची बात, Aata KAshala Udyachi

आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात

आता उठवू सारे रान, Aata Uthavu Sare Raan

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे

तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

आणायचा माझ्या ताईला, Aanayacha Majhya Taila

"आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा !"
"नको बाई नको, मला नवरा नको."

"त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला बाक,
दोन्ही डोळ्यांनी चकणा शोधायचा !
माझ्या ताईला नवरा आणायचा !"

"माझ्या दादाला बायको आणायची !"
"नको बाबा नको, मला बायको नको."

"लाटणं तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी
भोपळा टुणुक टुणुक तशी चालायची.
माझ्या दादाला बायको आणायची !"

"माझ्या ताईला नवरा आणायचा !
घट राहील अशा, मोठ्या दाढी-मिशा
बायको उडून जाईल असा घोरायचा.
माझ्या ताईला नवरा आणायचा !"

"माझ्या दादाला बायको आणायची !
तिचा घसा कसा ? गाढव गाई तसा.
लाडे लाडे तुझ्याशी बोलायची.
माझ्या दादाला बायको आणायची !"

आठशे खिडक्या नवशे, Aathashe Khidakya Navshe

आठशे खिडक्या नवशे दारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

पैठणी नेसून झाली तयार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

ठुमकत मुरडत आली सामोरं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

बोलण्यात दिसतीया खडीसाकार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

हातात वाक्या न्‌ दंडात येळा
वाऱ्यासंगं बोलुतुया बागशाही मळा
आलं कसं गेलं कुठं, सळसळ वारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

नाकात नथणी न्‌ कानात झुबं
रखवालदार साज जणू बाजुला उभं
डौलानं डुलतोया चंद्रहार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

करंगळ्या मासोळ्या जोडवी जोड
पैंजण रुणझुण लावतंया याड
पाडाचा अंबा जणू रसरसदार
कुण्या वाटेनं बा गेली ती नार

आठवे अजुनी यमुना तीर, Aathave Ajuni Yamuna Tir

आठवे अजुनी यमुना तीर
तुझ्या मुरलीचे सूर मनोहर, शीतल सांज समीर

कळते मज की मी पर-नारी

सुखी असावे मी संसारी
पुन्हा न दिसणे सखा श्रीहरी
भासामागे तरीही धावे वेडे चित्त अधीर

प्रीती पतिची लाभे निर्मळ
घरात नांदे भरले गोकुळ
तरी न विसावे हे मन चंचल
सौख्य छळे मज दु:खासम हे डोळा दाटे नीर

हरपुन गेले त्याच्यासाठी
खुळा हुंदका येतो ओठी
उरी ठरे ना, ठरे न पोटी
गूजासह या कैसी गाठू या जन्माचे तीर

आठवतो का बालपणा, Aathavato Ka Balpana

आठवतो का बालपणा तुज ?
बालपणातील सहवासाच्या थोर जाहल्या आज खुणा

उद्यानातील ही पुष्करणी
हळूच खुडली कमळे कोणी ?
कुणी गुंफिला हार मनोहर आणि वाहिला सांग कुणा ?

इथे रुजविली कुणी मालती ?
कुणी घातला मांडव भवती ?
कळ्यांस पण या सुबक दिसतो अबोल सुंदर गोडपणा

झुके डहाळी तरू मोहरला
त्यास बांधला कुणी हिंदोला ?
कुणी चढविला वरती झोला हात लावण्या रे गगना ?
आठवतो मज बालपणा

आठवते ती रात अजुनी, Aathavte Ti Rat Ajuni

आठवते ती रात अजुनी आठवते ती रात

त्या रात्रीला पंख लाभले, स्वप्नांचे हळुवार चिमुकले

इंद्रधनुचे रंग मिसळले अनोळखी चित्रात

त्या रात्री हा चंद्रही नव्हता, नव्हते तारे; निर्झर नव्हता

ओळख नव्हती, धीरही नव्हता, लाज उभी नयनांत

त्या रात्री ती किमया झाली, आली उमलून मूक अबोली

धीट पापणी वळली खाली क्षणभर जुळता हात

आठवणींनो उघडा डोळे, Aathavanino Ughada Dole

घरास माझ्या परतुनि आले
आठवणींनो उघडा डोळे

गौरीहर तो इथे पूजिला
वाजतगाजत सासरी गेले

मिठी मारता कर थरथरता
आसवांचे अमृत प्याले

मोठ्यांची मी सून होता
नाही बघवले ह्या दैवाला
आठवणींनो नयनी बघु द्या
कशी वागले कशी मी चुकले

आठवणी दाटतात, Aathavani Datatat

आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे

विसरावे नाव-गाव आणि तुझे हावभाव
मूक भाव नजरेतिल हृदयाला उमजावे !
आठवणी दाटतात !

रात्र अशी अंधारी, उरलेली संसारी
सोबतीस पहाटेस विरहाचे स्वप्न हवे !
आठवणी दाटतात !

स्वप्नातिल जादु अशी, मज गमते अविनाशी
प्रेम तुझे सत्य गमे, त्यास कसे विसरावे ?
आठवणी दाटतात !

आज हृदय मम, Aaj Hriday Mam

आज हृदय मम विशाल झाले
त्यास पाहुनी गगन लाजले

आज माझिया किरणकरांनी
ओंजळीमधे धरली अवनी
अरुणाचे मी गंध लाविले

या विश्वाच्या कणाकणांतुन
भरुन राहिले अवघे जीवन
फुलता फुलता बीज हरपले

आज सुगंधित झाले, Aaj Sugandheet Jhale

आज सुगंधित झाले जीवन
वसंत फुलले तव स्पर्शांतून

फुले सुगंधित, लता सुगंधित
कोकिलकूजित- कथा सुगंधित
सौख्य सुगंधित, व्यथा सुगंधित
सुगंध सुटतो उच्छवासांतुन

गगन सुगंधित, मेघ सुगंधित
स्थैर्य सुगंधित, वेग सुगंधित
मम भाग्याची रेघ सुगंधित
सुगंध हिरवा झरे धरेतुन

हार सुगंधित, जीत सुगंधित
उष्ण सुगंधित, शीत सुगंधित
प्रीत सुगंधित, गीत सुगंधित
सुगंध गळतो या नयनांतुन

आज सुगंध आला लहरत, Aaj Sugandh Aala Laharat

आज सुगंध आला लहरत !

जेवि उपवनी माधवी
मी तेवी धुंद !

मधुमासातील सुख नवे तैसा
हा वाहे आनंद माझा !

आज राणी पूर्विची ती, Aaj Rani Purvichi Ti

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको

कालचे वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको



सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे

पानजाळीतून झिरपे, बावरेसे चांदणे


त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको



पाकळ्यांचे शब्द होती, तू हळू निःश्वासता

वाजती गात्री सतारी, नेत्रपाती झाकता

त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको



रोखूनी पलकांत पाणी, घाव सारे साहीले

अन्‌ सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले

या घडीला मोतियाचा घास तू मागू नको




काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?

उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?

नीत नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको

आज या एकांत काली, Aaj Ya Ekant Kali

आज या एकांत काली, मीलनाची पर्वणी

दूर का तू साजणी, दूर का तू साजणी



सोड खोटा राग रुसवा, हा बहाणा काय फसवा

लाजरी मूर्ती तुझी ही, अधिक वाटे देखणी


देखणी हे साजणी, दूर का तू साजणी



दो जीवांच्या संगतीने फुलून येती फूल पाने

दिवस होई रात्र येथे, रात्र वाटे चांदणी

चांदणी हे साजणी, दूर का तू साजणी



हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे, हास थोडे

स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी

मागणी हे साजणी, दूर का तू साजणी

आज मी शापमुक्त जाहलें, Aaj Mi Shap Mukta Jahale

रामा, चरण तुझे लागले
आज मी शापमुक्त जाहलें

तुझ्या कपेची शिल्प-सत्कृति
माझी मज ये पुन्हां आकृति
मुक्त जाहले श्वास चुंबिती पावन हीं पाउलें

पुन्हां लोचनां लाभे दृष्टि
दिसशी मज तूं, तुझ्यांत सृष्टि
गोठगोठले अश्रू तापुन गालांवर वाहिले

श्रवणांना ये पुनरपि शक्ति
मनां उमगली अमोल उक्ति
"ऊठ अहल्ये"- असें कुणीसें करुणावच बोललें

पुलकित झालें शरिर ओणवें
तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे
चरणधुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागलें

मौनालागी स्फुरलें भाषण
श्रीरामा, तूं पतीतपावन
तुझ्या दयेनें आज हलाहल अमृतांत नाहलें

पतितपावना श्रीरघुराजा !
काय बांधुं मी तुमची पूजा
पुनर्जात हें जीवन अवघें पायांवर वाहिले

आज मी तुझ्यासवे, Aaj Mi Tujhyasave

आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले

सतत तुझ्या मीलनि, गंध धुंद दरवळे



फूल हे मनातले, मिठीत ते तुझ्या हसे

या सुखात भिजताना लागले तुझे पिसे


राजसा तुझ्यामुळे भाग्य मला लाभले



राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले

दोन मने जुळताना कधी न मी पाहिले

नाही येत सांगता कोण कधी हरवले

आज मी आळविते केदार, Aaj Mi Aalavite Kedar

फुले स्वरांची उधळित भवती गीत होय साकार
आज मी आळविते केदार !

गोड काहि तरि मना वाटले
अबोध सुंदर भाव दाटले
मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार

जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार

आज प्रीतिला पंख हे, Aaj Preetila Pankh He

आज प्रीतिला, पंख हे, लाभले रे
झेप घेउनी, पाखरू, चालले रे

उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्न सुखाचे
तुझी हो‍उनी, आज मी, राहिले रे

असा लाजरा, बावरा, प्रणय असावा
तुझी सावली, त्यात मी, घेत विसावा
असे आगळे, चित्र मी, पाहिले रे

दोन जिवांनी, एक असावे
मस्त हो‍उनी, धुंद फिरावे
पंचप्राण हे, पायि मी, वाहिले रे

आज दिसे का चंद्र गुलाबी, Aaj Dise Ka Chandra Gulabi

आज दिसे का चंद्र गुलाबी ?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नी माझी फुलली प्रीती

अर्धे मिटले, अर्धे उघडे
ह्या नयनांतुन स्वप्न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती

स्वप्नि तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्न देखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोती

अर्धी मिटली, अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती

या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मिलीत अपुली नाती

आज तुजसाठी या पाउलांना, Aaj Tujsathi Ya Paulana

आज तुजसाठी, या पाउलांना, रे पंख फुटले
झनक झन झन, मदिर सरगम, अधिर मन झाले

प्रीती अनोखी आली बहारा
देही नशेचा नाचे पिसारा
धुंदीत जग हे आता नहाले
प्रीती अनोखी आली बहारा

आतूर धरणी भेटे नभाला
आता किनारा नाही सुखाला
नाते युगांचे फुलले निराळे
आतूर धरणी भेटे नभाला

आज चांदणे उन्हात हसले, Aaj Chandane Unhat Hasale

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले, तुझ्यामुळे !

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते करी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे !

करात माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले, तुझ्यामुळे !

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिर परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे !


आज गोकुळात रंग, Aaj Gokulat Rang

आज गोकुळात रंग खेळतो हरी;
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी !

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी !

सांग श्यामसुंदरास काय जाहले ?
रंग टाकल्याविना कुणा न सोडिले:
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी !

त्या तिथे अनंगरास रंगला;
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला;
तो पहा मृदुंग मंजिऱ्यात वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी !

आज गूज सांगते तुला, Aaj Guj Sangate Tula

आज गूज सांगते तुला
छंद एक लागला मला
पहाटची उठुन मी, उगिच चुंबिते फुला फुला

धुक्यात धुंद हिंडते, स्वप्नलोक धुंडते
हळुच फुंक घालुनी, फुलविते दला-दला

फुलापरीस कोमले, चुंबितेस तू फुले
सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला

त्या फुलात कल्पना दावि दोन लोचना
याही लोचनास सखी, तोच ध्यास लागला

आज कां निष्फळ होती बाण, Aaj Ka Nishphal Hoti Baan

आज कां निष्फळ होती बाण ?

पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण ?



शरवर्षावामाजीं दारुण

पुन्हां तरारे तरुसा रावण


रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण ?



चमत्कार हा मुळिं ना उमजे

शीर्ष तोडितां दुसरें उपजें

रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण ?



शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं

नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं

पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान




इंद्रसारथे, वीर मातली

सांग गूढता मला यांतली

माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान



वधिला खर मी, वधिला दूषण

वधिला मारिच, विराध भीषण

हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण



ज्यांच्या धाकें हटला सागर

भयादराचे केवळ आगर


त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण ?



सचैल रुधिरें न्हाला रावण

सिंहापरि तरि बोले गर्जुन

मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान ?



सचिंत असतिल देव, अप्सरा

सुचेल तप का कुणा मुनिवरा ?

व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान ?

आज कुणीतरी यावे, Aaj Kuni Tari Yave

आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे

सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे


आज कळीला एक फूल भेटले, Aaj Kalila Ek Phool Bhetale

आज कळीला एक फूल भेटले
हृदय चोरिले, कुणी हृदय चोरिले

असा कसा लपुन-छपुन, चोर घरी आला
अजाणतेपणी कसे न्याहाळिले त्याला
काही कळेना मला काय वाटले

बावरली, आतुरली, मोहरली प्रीति
पंख फुटे, लहर उठे, गीत जुळे ओठी
प्रणयसुखाचे मनी भाव साठले

घडोघडी, मनोमनी, भास नवे नवे
जवळ दिसे दूर असे तेच मला हवे
एक हरवले, आज एक शोधिले

आज अंतर्यामी भेटे कान्हो, Aaj Antaryami Bhete Kanho

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो

फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग
आज अवघे अंतरंग ओसंडले हो

मिटूनही डोळे दिसू लागले आकाश
आज सारा अवकाश देऊळ झाला हो

काही न बोलता आता सांगता ये सारे
आतली प्रकाशाची दारे उघडली हो

आज एकांतात हळवी, Aaj Ekantat Halavi

आज एकांतात हळवी वेदना गंधीत झाली

अंगप्रत्यंगात हलके चांदण्यांची हाक आली



आर्जवी डोळ्यांत माझे गीत रेंगाळून होते

त्याच डोळी हळद होरी रात्र शृंगारात न्हाली




ती दिवा विझवून होती, मी पहाटे जागलो

ठेऊनी ओळी दिव्यांच्या ती पुढे मार्गस्थ झाली



एकदा हिरव्या ऋतूचा बहर स्वप्नांतून आला

हरवल्या दिवसास माझ्या साक्ष कवितेची मिळाली

आज उदास उदास दूर, Aaj Udas Udas Dur

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या



काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना

बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना


असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा



चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी

निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूतल्या ग गवळणी

दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी

दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

आज आपुल्या प्रथम प्रितीचा, Aaj Aapulya Pratham

आज आपुल्या प्रथम प्रितीचा संगम हा झाला
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा ॥

नाचति झाडे, नाचति हो वेली,
रानपाखरे वेडी झाली !
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला,
भेटाया आला !

पहा कोयना इकडून येई
समोरून ही कृष्णामाई !
प्रीतीसंगम सखे असा हा,
जगामध्ये पहिला !

आज अचानक गाठ पडे, Aaj Achanak Gatha Pade

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे

आकाशी फुलला चांदण्याचा, Aakashi Phulala

आकाशी फुलला चांदण्याचा मळा
बाग तो आगळा चंद्रम्याचा

घेउनिया संगे लाटांचे संगीत
सागर नाचतो किनाऱ्याशी

सुगंध लेऊन उभी जाईजुई
देवा ही पुण्याई तुझीच रे

आकाशी झेप घे रे, Aakashi Zep Ghe Re

आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा



आकाश पांघरूनी जग, Aakash Pangharooni Jag

आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तिरी या जळ संथ संथ वाहे

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काहि धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे

आईसारखे दैवत साऱ्या, Aai Sarakhe Daivat Sarya

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई

आईचा छकुला चिमुकला, Aaicha Chakula Chimukala

आईचा छकुला, चिमुकला
आईचा छकुला !

चपल खरा रुसलेला दिसला
आईचा छकुला !

वाहिली राहिली माया
डोळां ज्या पहाया
का हळु हसला
माया जीवाला लावियलेला !

आई होऊन चुकले का मी, Aai Houn Chukale Ka Mi

आई होऊन चुकले का मी

पोर पोटची देत न ओळख, आईपणाला मुकले का मी ?



नऊ मासाचा पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला

पदराआडून अमृत पान्हा या मायेने जीला पाजिला


तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी



पति विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी

आई म्हण तू या आईला; सांगायाची झाली चोरी

अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का

आई व्हावी मुलगी माझी, Aai Vhavi Mulagi Majhi

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई

नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई



सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी

आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिक्केकाई




'केस कोरडे कर ग पोरी', सात हात त्या जटा विंचरी

'नको पावडर दवडू बाई', कोकलते ही आई



शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी

लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

आई माझी कोणाला पावली, Aai Majhi Konala Pavali

आई माझी कोणाला पावली गो कोणाला पावली

पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला

आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी

आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट

आई तुझं मलवली ठेसन गो मलवली ठेसन


आई तुझा गुल्लालु डोंगर गो गुल्लालु डोंगर

आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो डोंगर कुणी बांधिला

बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी

आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो देऊळ कुणी बांधिले

बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी

आई माझी कोंबऱ्यावर बैसली गो कोंबऱ्यावर बैसली

आई तुला नवस काय काय बोलु गो नवस काय काय बोलु

आई भवानी तुझ्या कृपेने, Aai Bhavani Tujhya Krupene

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

अग सौख्यभरीला माणिक मोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं

सप्तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं


आई बघ ना कसा हा, Aai Bagha Na Kasa Ha

आई, बघ ना कसा हा दादा ?
मला चिडवायचं हाच याचा धंदा !

बाहुलीचं लग्न लावता आम्ही
म्हणतो, "नवरदेव आहे मी
आता मलाच मुंडावळी बांधा !"

कधी मोठेमोठे करतो डोळे
कधी उगाच विदुषकी चाळे
भारी खट्याळ, नाहि मुळि साधा

दादा भलताच द्वाड आहे आई
खोड्या करून छळतो बाई
याला ओवाळायची नाही मी यंदा

आई तुझी आठवण येते, Aai Tujhi Aathavan Yete

आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते

वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते

आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें

हांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येते

सुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतें

नको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातें

आई कुणा म्हणू मी, Aai Kuna Mhanu Mi

आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई ?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई ?

तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई ?


रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई ?

चुकतो अजून मी गे, म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परी का, होऊन माझी आई ?

आई उदे ग अंबाबाई, Aai Ude G Ambabai

आई उदे ग अंबे उदे, उदे

आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आईची मूर्ति स्वयंभुवरि शोभली, सिंहावरी साजरी
सिंहावरी साजरी, हिऱ्यांचा किरिट घातला शिरी
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी
आई उदे ग अंबे उदे, उदे

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई




आई आणखी बाबा यातुन, Aai Anakhi Baba Yatun

सांग मला रे सांग मला

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?



आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी

तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !


आई आवडे अधिक मला !



गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई

शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !

आवडती रे वडिल मला !



घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही

चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !

आवडती रे वडिल मला !




कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही

मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !

आई आवडे अधिक मला !



निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी

मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !

आवडती रे वडिल मला !



आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते

तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !


आई आवडे अधिक मला !



त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती

कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !

आवडती रे वडिल मला !



बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी

रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !

आई आवडे अधिक मला !




बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !

बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !

आवडती रे वडिल मला !



धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा

म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !

आवडती रे वडिल मला !

अत्तराचा फाया तुम्ही

अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई

धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया

नाही आग नाही धग, परी होइ तगमग

विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया

सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद

देहभान मी विसरावे, अशी करा माया

अगा करुणाकरा

अगा करुणाकरा करितसें धांवा ।


या मज सोडवा लवकरी ॥१॥





ऐकोनियां माझी करुणेचीं वचनें ।


व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥





मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव ।


ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥





उशीर तो आतां न पाहिजे केला ।


अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥





उरलें तें एक हें चि मज आतां ।


अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥





तुका म्हणे आतां करीं कृपा दान ।


पाऊलें समान दावीं डोळां ॥६॥

अगदिंच तूं वेडी

अगदिंच तूं वेडी ।

वयांत या अविचार मदादिक पुरुषां बहु खोडी ॥



बघसि न दूरवरी ।

स्वयंमन्य ते, व्यसनी चंचल, बोधाचे वैरी ॥




म्हणसी मी शहाणी,

सांग टाकिल्या अशा पिशांनीं रडति किती तरुणी ॥

अग पोरी संबाल दर्याला

अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी

लाट प्रितीची, भन्नाट होऊन आभालि घेई भरारी



नाय भिनार ग, येऊ दे पान्याला भरती

माज्या होरीचं, सुकान तुज्याच हाती


नाव हाकीन मी, कापीत पाऊसधारा

मनि ठसला रं, तुजा ह्यो मर्दानि तोरा

जाल्यांत गावली सोनेरि मासली

नको करू शिर्जोरी



तुज्या डोल्यांत ग, घुमतोय वादलवारा

तुज्या भवती रं, फिरतोय मनाचा भौरा

तुला बगून ग, उदान आयलंय मनाला

तुज्या पिर्तीचं, काहूर जाली जिवाला


सुटणार नाय ग, तुटणार नाय ग

तुजी नि माजी जोरी



मी आनिन तुला, जर्तारी अंजीरि सारी

मला पावली रं, पिर्तीचि दौलत न्यारी

मी झुंजार ! साजिरि तू माजि नौरी

तुज्या संगतीनं, चाखीन सर्गाची गोरी

थाटांतमाटांत गुल्लाबी बंगला-

बांदूया दर्याकिनारी

अग पाटलाच्या पोरी जरा

अग पाटलाच्या पोरी जरा जपून जपून

बिगिबिगी कुठं ग जाशि शेतामधून



तुझ्या गालाचि खुलली लाली ग

जणु डाळिंब फुटतंय गाली


ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात

चल जाऊ दूर मळ्यांत

संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून



आलं ऊन ग भवती फुलुनी

कुठं जाशी तु ग फुलराणी ?

काटं ग बोचतिल बाई

नाजुक तुझ्या पायी

तुझं चंद्रावाणी मुख जाईल सुकून !




रानी वाऱ्याची ऐकून गाणी

नाचे झऱ्याचं झुळुझुळु पाणी

ल‌इ घुटमळतंय्‌ माझ्या मनात

चल जाऊ दूर मळ्यांत

संगं पिर्तीचं गाणं गाउ दोघं मिळून

अजून उजाडत नाही

अजून उजाडत नाही ग !



शून्य उभे या उगमापाशी शून्यच केवळ अंती ग

अज्ञाताच्या प्रदेशातली संपेना भटकंती ग

अज्ञानाच्या सौख्याचाही इथे दिलासा नाही ग


अंतरातल्या विश्वासाची आता नुरली द्वाही ग

अजून उजाडत नाही ग !



गूढ सावल्या काही हलती देहाला ओलांडून ग

सरकत येते अंधाराची लाट अंगणी दाटून ग

जिथवर पणती तिथवर गणती, थांग तमाचा नाही ग

आडून आडून साद घालते अदृष्यातील काही ग

अजून उजाडत नाही ग !


अ आ आई, म म मका

मी तुझा मामा दे मला मुका



प प पतंग आभाळात उडे

ढ ढ ढगांत चांदोमामा दडे


घ घ घड्याळ, थ थ थवा

बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा



ह ह हम्मा गोड दूध देते

च च चिऊ अंगणात येते

भ भ भटजी, स स ससा

मांडिवर बसा नि खुदकन हसा



क क कमळ पाण्यावर डुले

ब ब बदक तुरुतुरु चाले


ग ग गाडी झुक झुक जाई

बाळ माझे कसे गोड गाणे गाई